Saturday, 25 June 2016

निरोप...

जून महिना आला की रोटरीमधे नवीन येणार्या परदेशी exchange studentsच्या स्वागताची तयारी सुरू होते. भारतीय मुलं जुलै-ओगस्टमधे परदेशी जातात, त्यामुळे ज्यांच्या घरी ही परदेशी मुलं येणार आहेत त्यांच्या घरी उत्साही उत्सुकतेचं वातावरण असतं. पण गेले १० महिन्यांपासून इथे असलेली परदेशी मुलं मात्र फार अस्वस्थ असतात या कालावधीत.
बघता-बघता त्यांच्या इथल्या वास्तव्याचे १०-११ महिने संपतात व १-२ आठवडे..काही दिवसांवर यांच्या प्रयाणाचा दिवस येतो व ही मुलं फार भावूक होतात.
भारतात आल्या आल्या १-२ दिवसातंच कुटुंबीयांच्या आठवणीने एकांतात,अंधारात रडणारी ही १५-१६ वर्षांची कोवळी मुलं आता भारत,भारतीय कुटुंब, मित्र सोडताना मात्र उघडपणे भावविवश होतात.

गेल्या वर्षेभरापासून झेपेल तसं शिंगावर घेतलेलं भारतीयपण,
अंगावर पांघरल्या गेलेली उबदार कुटुंब व्यवस्था,फिरस्तलेला आडमाप इंद्रधनुष्यी भौगोलिक भारत,देशी-विदेशी मित्र, कौतुक, आदरातिथ्य..सगळं नकळत फार भिनलं जातं अंगात.
राहू ते घर आपलं मानणं..पालकांना आई-बाबा म्हणणं.. भारतीय संस्कृतीत समरस होणं..जगरहाटी डोळसंपणे टिपणं..चांगलं-वाईट मनात ठरवणं...एकूणंच हा अनुभव त्यांना जगावेगळं परिमाण देऊन जातो.

कोण-कुठली ही मुलं..आपल्या घरात येतात..आपली मुलं बनून राहतात.खरंतरं आई-बाबा म्हणत एक जबाबदारीचं टाकतात आपल्यावर.बरेचदा आपलाही कस लागतो. आपणही पालक म्हणून.. व्यक्ती म्हणून समृध्द होत जातो.
या अंतर्बाह्य बदलवून टाकणार्या अनुभवानंतर परत मायदेशी जाऊन शिक्षणाची कास धरणं..परत नवं आयुष्य सुरु करणं..
They feel totally lost and confused..and take a long time to settle back home.

आमच्याकडे या वर्षी फ्रांसचा लुईस गेल्या दोन महीन्यांपासून रहात आहे..एवढ्यातंच माझ्या मुलांबरोबर हिमालयात जाऊन आला..प्रयाण पाच दिवसांवर..खूप अस्वस्थ झालाय..
neither he is sad nor happy पण डोळ्यात मात्र पाणी !
Aai..when I came to India, very next day I cried..I felt so lost and out of place... but today I am sad because I am leaving India..
I just dont want to leave India..I love you all!

तारुण्यात पदार्पण करणारी ही काटकोळी सूकुमार मुलं..भारतात आपल्या नजरेसमोर अंगाखांद्याने भरतात..आपल्याच मुलांसारखे तारुण्यसुलभ वाद घालतात..तश्याच बेफिकीर चुका करतात..
मग काय कधी आपल्याच मुलांसारखं कधी आंजारायचं-गोंजारायचं-फटकारायचं..मुख्य म्हणजे मनमोकळा संवाद साधायचा ! And that makes them most comfortable and at home.
थोड्या काळासाठी आपल्या घरात आलेली ही मुलं निशंकपणे आई..आई करत कधी आपल्या मनात व आयुष्यात रूजतात हे आपल्यालाही कळत नाही.
त्यामुळे निरोपाच्या वेळी खरंच मन सैर-भैर होतं..
अरे..नको इतकं वाईट वाटून घेऊ..कधीही ये परत..आता मी पण तुझी इंडियन आईचं आहे असं म्हणत त्याची समजूत घालतांना आपले डोळे मात्र झर-झर पाझरतात !

No comments:

Post a Comment