Friday, 24 June 2016

Dejected...

Medha Padhye feeling dejected !!!
नवीन घर रहाण्यायोग्यतेच लावून गेल्या आठवड्या पासून १मेच्या 'अभिजात महाराष्ट्र' च्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोंचत आहे.Sponcerership साठी माणसं-कंपन्या शोधून..reference घेऊन लोकांचा पाठपुरावा करत आहे.
पहिल्या भेटीनंतर बर्यापैकी आश्वासन देणारे नंतर ताकास तुरही लागु देत नाहीत...फोनही उचलत नाहीत...मेसेजेस पण बघत नाहीत...बघीतल तरी respond करत नाहीत. तरीही चिकाटीने सकाळ-दुपार-संध्याकाळ कधी तरी गाठता येईल म्हणून sms करत आहे...खुप निराशा पदरी पडते आहे...वेगवेगळ्या पातळ्यांवर मनस्ताप होतोय...
पहिलं म्हणजे स्वतःच स्वतःची बनवलेली POP ची प्रतीमा छीन्न झाल्यासारखं वाटणं...पैसे मागीतले की आपल्या स्वतःच्या so called देखण्या कतृत्वाला..धडाडीला कोणी भिक घालत नाही हे कळणं...नेहमी आब राखून वागणार-वागवणारे  जवळचे सुध्दा टाळतात...मनापासून सांगते सपशेल पाणउतारा झाल्यासारखा वाटतो!
सगळ्यांना सामावून घेणारा एक चांगला कार्यक्रम आपण इनिशियेटीव्ह घेऊन करत आहोत का लोकांना ह्याचं मर्म कळत नाहीये ? Why cant we all come together and share a little burden of this event individualy ?
इतक्या अटी-तटीच्या वैयक्तिक आर्थिक पाठबळावर आपण काय कार्यक्रमाचं नियोजन करणार व कलावंतांना माफक आदरणीय मानधन ते काय देणार ?
जसा जसा १मे जवळ येतोय तसा तसा ताण वाढतोय!
दुष्काळाची व ऊन्हाची तापदायक फोडणी आहेचं सर्वांवर कडी करायला.
पार्या बरोबर मनस्तापही वाढतोय !

No comments:

Post a Comment