एकतर औरस-चौरस रणरण उन्हाळा..भरीसभर पाच रविवार पोटाशी घेऊन ऐस-पैस पसरलेला कहरी मे महिना..
त्यातला आजचा शेवटचा कंटाळवाणा रविवार..
घरी एकटीचं..चटचट उन.....
morning walkला दांडी मारत व्हरांड्यात चहा घेत निशब्द बसलेले..मांजरीने ३-४शिकारी केल्या पासुन पक्षीही कमी झालेत.. हवाही नाही..निरव शांतता...
शांततेचा भंग करत ताना घेत बाबा अंगण झाडायला हजर..सवयीने मी चहा जास्त करून ठेवलेला.
बाबा चहा घ्या आज..
.....नगं..नगं च्याहा नको..आता रोजचंच हाय नव्ह येनं कामाला..च्याहा-गिह्या नगं...झाडणं सुरू...
अहो घ्या चहा...
च्या नगं..लयी च्या होतोया सकाळपत्तूर ३-४ येळेला होतो...
कधी उठता ?
.....म्या का ? उठतो लगी साडे पाचाला..उठलं की ह्यो गाड्या पुशीतो..झाडीतो..पानी चढवत्यो..मंग नाताला खेळीवतो..आता रांगाया बघतीया..पन म्या तिला खाली सोडीतंच ना. त्ये काय हाय आमच्या रुमाची फरशी अशी गुळगळीत न्हाई नां! आबड-धबड हाय..त्यी रांगली की गुडघे फुटत्येत, बोटातून रगत येतया. म्या म्हन्लं तसं जमनां..न्हाय रांगली तर बी चाललं पन म्या तिला कडेवरंन खाली सोडीतंच नां ! जवळंच ठेवितो माझ्या. मंग काय आपल्या लेकराच्या जीवापुढे बाकी काय नाय.लेकरं हाय तं सगळं हाय.
बरुबर नां ?
घ्या हो चहा..तुम्हाला लागते तशी भरपूर साखर टाकते बघा..
.....आता हाय का ? येवढं झाडीतो मंग घ्येतो...
बाबा..चहा.....
आलो..आलो..आलो..आलो..आलो.....
बाबांची एक खासीयतंच आहे. बोलताना ते शेवटचे १-२ अक्षरी शब्द मोजून पाच वेळा रिपिट करतात.
बरं..बरं..बरं..बरं..बरं...
नातीला खेळवताना..या..या..या..या..या...ईत्यादी.
त्यामुळे मी त्यांच नामकरण पंचमबाबा केलं आहे.
चहाचा कप घेऊन बसले गप्पा मारायला.बोलतं केलं की
इकडचं-तिकडचं खूप बोलतात..बसले की रमतात.
बोलायची ढबही मस्त आहे.
बीड जिल्ह्यातले..थोडे कमी व्यवहारी..त्यामुळे कारभारणीचं भारी लक्ष असतं म्हतार्याकडे. गोरीपान,सडसडीत,देखणी, मोजकेचं पण रुपाला झळाळणारे दागिने, रोखठोक..
काम बघायला..मोबदला ठरवायला बाई पुढे,बाबा मागे.
समोरचं दोन छोट्या खोल्यांच्या आऊट हाऊस मधे रहातात. शिकलेला मुलगा स्कोडा कंपनीत परमेनेंट ! सुन,बाळ नात असे रहातात.सध्या खेड्यावरंन मुलगी नातवंड आली आहेत.
मुलीचं फेमिली प्लॅनींगचं ओपरेशन करून घेतलेलं त्यामुळे तिचा मुक्काम वाढलेला.
बाबा भजन,किर्तन करता का हो तुम्ही ? नेहमी ताना घेता...
.....आता कसं बोल्लात !तिकडं गावी लई भजनं किर्तनं असत्यात. सारखं चालुचं र्हातया काईनं काई...
प्येटी,तब्ला,पख्वाज..लई ब्येस किर्तन र्हातया..लगी गांव जमा होतया यकादशीला...
बाबा आता इथेचं रहायला आवडतंय का जायचं गावी ?
.....आता बगा..आपलं गावं ते आपलं गावं..पन आपलं पोरगं आलं नव्ह इथं..तिथे बी मजुरीचं करीत व्हतो मी..श्येती-ब्यीती काय न्हाय आपल्याला..कारखान्यात व्हतो तिथं..
मपल्या प्वोरामुळं आलो इथं..आता नाय जायचं बगा गावाकडं..
जिथं आपलं ल्येकरू तिथं आपन..हाय ना बरूबर ?
आपलं ल्येकरु ब्येस शिकेल बगा..त्याच्या मामानं शिकिवलं त्याला..मास्तर हाय त्येचा मामा..द्युस्री-त्येस्रीतंच त्याला लगी तालुक्यालाचं घ्येऊन ग्येला त्ये शिक्युनंच पाठीवला परत त्याला गावी..आपल्याच्यानं काई झालं नस्ता बगा असं काई..
सगळी त्या मामाची क्रिपा...मरुन सुद्दा न्हाई उपकार फिटायचे त्यान्ले.
मला अजूक दोन पोरी हायीता. म्या मोप शेती-भाती बघून दिलया त्यान्ला..पन शेतीत लयीचं काम कराया लागतं बापा!
पैका दिसतोया पन माग्ले कष्ट लयी असत्यात. मह्या पोरींना लयी कामं असतं बा !दिसभर चुटू-चुटू कामंच करत्यात.
दिड-दिड लाख हुंडा देवुनश्यान दिल्या नं हो पोरी.
धाकलीचं तं मामानंच क्येलं सगळं.त्याच्याच गावात बार उडीवला लगीनाचा..लगी येक बस,येक ट्रक पाठीवला नं आमच्या गावी..वर्हाडासाठी.पोरांचा मामा लईचं चांगला हाय बगा..खोटं कश्याला ब्वोला ? आमच्या कारभारणीची मान्सं लईचं ब्येतशीर हाईता...मह्या घरंच कोनी बरं न्हाई..
मी तं थोरला हाई..मह्या पाठी दोन भाऊ..पन कोनी कुनाला पुसत न्हाई बगा..पन ही मान्सं लयी चांगली..त्यान्चे पायं धुवून पानी प्यालं तरी पूरनार न्हाई...
बरं जातो आता..आमची नातबाई उठली आसल..म्या नाई दिस्लो की लयी किरकिरती..आजचा च्या जमला बगा..बेत्तानं साखर हायं..तुमी शेहर्यातले लयी फिकी च्या प्येता..ती वरली बाई पण........
बाबांना इतकं बोलतंं केलं होतं ना..मला सगळं संगतवार शब्दबध्द करायचं होतं..चहाही संपला होता पण बाबांची गप्पा गाडी थांबेचना !
बाबा...नात...(आठवण करून दिली)
आरं तिच्या हावं की ! चला..चला..चला..चला...चला.....

No comments:
Post a Comment