ऊन्हाचा..उकाड्याचा कहर आणि कामवाल्यांच्या बेभाव सुट्ट्या...वैतागले ४-५ दिवस स्वैपाक करून.. गेस जवळ उभं राहून..उन्हाळ्यात तर भाजी काय करायची हा UPSCच्या ताकदीचा प्रश्न असतो.शेवटी रामबाणी रेसिपी 'खिचडी' करायला खाली आले तर एक बाई डोक्यावर ओझ घेउन बिनदक्कत आवारात शिरलेल्या...
कोण आहे ?
.....ताई तुप घ्या गाईचं-म्हशीचं...गावरान आहे..त्या तिकडल्या ताईंनी पाठवलं हो तुमच्याकडं...घ्या नं ताई चांगलं तुप आहे..
आम्ही राजस्तानी न्हाई ताई ब्राह्मण आहोत...
अडुळची हो ताई मी...बोलता-बोलता आवाज बदलला..
हुंदके आले..पदरानी कोरडे डोळे टिपले..प्वोराला ठोकल हो काल यका मोट्रसायकलवाल्यानं...एडमिट हाय..लयी लागलयं डोक्याला...शुद्दीवरपन न्हाय..आपरीशन करायचं म्हनत्यात...
ह्ये येवड त्वुप विकलं की मी चाल्ली बघा दवाखान्यात..यम्जीयम् का काय हाय नां...
घ्या वो तुपं...त्येवडंच गरीबाच्या प्वोटाला..माझ्या लेकराकडं बगा हो ताई...लयी आसिर्वाद लागल तुमाला...
परत कंठ दाटुन आला..पदर डोळ्याशी..
आणा नं हो डब्बे...घ्या १-१ किलो.. जाऊद्या हो लवकर...लेकरात जीव गुंतलाय माझा...आणा डब्बे.
एवढं लागलय मुलाला तर नवरा कुठे तुमचा ? माझा सावध पवित्रा. कारण अशा नाटकबाजीला आम्ही बरेचदा फसलो आहोत..स्त्री-पुरुष दोघांकडूनही.
.....त्ये दवाखान्यामंदी हायेती..ताई कुण्या मैत्रीणीचा ठेपा द्याहो..लयी चांगलं तुप हाय..जाऊ द्या हो घरला पटकीनी.
सावळा,शेलाटा बांधा..गोल साडी..ठसठशीत जोडवी, पैंजण..
पिशवी,केन,फडकी,तराजू,मापं,दगडं..सगळं तुपकट झालेलं.
तुप घेतेय म्हटल्यावर आवाजात तरतरी..चेहर्यावर हसू..
फोटो काढायला लागले तर फोटू काहो काढता ? माज्यावर विश्वास न्हायी का तुमचा ? मी नेहमीचं येते ताई इथं...
My god ! सिक्युरिटी साठी मी तीचा फोटो काढत आहोत असं तीला वाटलं. जरा घाबरली पण.
मला दया आली.
काय हे गरिबांच जिणं? गरिबाला वाली नाही हेचं खरं !
नाही हो मला तुमचे जोडवे आवडले म्हणून काढला फोटो.
हे बघा...
आता माय..लयीचं नादर आला की वो...
बोलत-हसत-खेळत आवरा-आवरी केली..चपला सरकवल्या..बाई गेल्या.
पण साजूक तुपाचा वास दरवळत राहीला.
मला माझी सगळ्यात लहान आत्या आठवली. माझ्या वडिलांची सगळी भावंड देखणी शिवाय ही आत्या.
उंचीपुरी,सावळी,पुरुषी,थोराड..रजाकारांचा काळ..अत्यंत गरीबी.. आजीचं वैधव्य..मुलीला शिकवणं तर अशक्यचं..आटोक्यातला ब्राह्मण मुलगा बघून हिचं लग्न उरकलं..मामा पण गरीबंच पण सुस्वभावी..हाता तोंडाशी गाठ..मुल झालं नाही..बाबांची हीच्यावर फार माया..
परिस्थितीमुळे तीच्यावर फार अन्याय झाला असं त्यांना कायम वाटायचं..त्यामुळे तिच्या बाबतीत बाबा फार सढळ व हळवे होते.पण सगळं चांगलं असुनही गरीबी व निपुत्रीक असल्यामुळे आत्या कायम मागे रहायची..राह्यली.
आत्या औरंगाबादला आली की महिनाभर रहायची..
आई-बाबा खाणं-पिणं,कपडालत्ता,दवाखाने खुप करायचे तिचं.अगदी न बोलता..न जाणवू देता. आत्याला पण याची खुप जाणीव होती, कौतुक होतं. त्यामुळे ती तीच्या मराठवाड्यातल्या खेड्यातनं औरंगाबादला येतांना गावरान तुपातले बेसन लाडू खास आमच्यासाठी आणायची.तीला बहूदा तेवढंच शक्य होतं असावं. आणी आम्ही भावंड त्या लाडवांना येणार्या तुपाच्या विशिष्ट वासामुळे फार नाकं मुरडायचो...यांक..यांक करत थुंकायचो..आम्हाला नको असले घाण वासाचे लाडू असं तिच्यासमोरंच अजाणतेपणे म्हणायचो.
ह्या तुपाच्या वासाचा मी आणी बहीणीने इतका धसका घेतला होता की यापुढे आपलं घर वगळता मराठवाड्यात-खेड्यात कुठेही तुप खायचंच नाही असं आम्ही ठरवलं होतं.
त्यामुळे गावरान तुप म्हटलं की कृष्णा आत्याचं आठवते.
बहीण-भावाचं प्रेम..समजदार भावजय..व फुल न फुलाची पाकळी असं म्हणत प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन
गावरान तुपातल्या..प्रवासात पिघळलेल्या बेसन लाडवांची लादी आपल्या भाच्यांसाठी आणणारी आत्या...
कीती साजूक भावबंधन.
तुम़्हारी़ या़दें यु़ही़ मह़का कऱे ।

No comments:
Post a Comment