कुठलीही व्यक्ती थोडीफार ओळखीची,परिचयाची झाली की त्या व्यक्ती विषयी आपण बर्यापैकी अंदाज बांधू शकतो की या व्यक्तीच्या आवडी-निवडी, छंद काय व कसे असू शकतील याचा. बहुदा लोकंच स्वतःच्या छंदाविषयी भरभरून बोलतात.
माझा एक आवडीचा पण जीवघेणा छंद आहे व त्या बद्दल माझ्याशिवाय कोणीही ब्र उच्चारणार नाहीत याची मला खात्री आहे. कारण स्वतःवर शिंतोडे उडवुन घ्यायला कुणाला आवडणार ? नाही का ?
आता गहन विचारात पडला असाल, असला कुठला छंद असेल ह्यांना? तो ही जीवघेणा व दुसर्यांना अळीमिळी गुपचीळी करायला लावणारा ?
हं...तो छंद आहे उवा मारण्याचा !
कशी सुरुवात झाली माहीत नाही पण मला छंद कम् वेडंच आहे उवा मारायचं. शाळकरी वयात मैत्रीणींच्या डोक्यात उवा दिसल्या की सरसरुन काटा यायचा माझ्या अंगावर. वाटायचं यांना,यांच्या आयांना काहीच कसं वाटत नाही आपल्या, आपल्या मुलीच्या डोक्यात उवा-लिखा आहेत याचं.
शाळेत माझ्यासमोर एक मैत्रीण बसायची तिच्या डोक्यात नेहमी उवा असायच्या. तर शिकणं सोडून त्या वळ-वळ उवा बघुन मीच फार बैचेन व्हायची. एकदा काहीतरी बोलुन तिचा रोषही ओढवून घेतला होता. I just cant stand that sight of lices in anyone's head.
डोक्यात किडे आणी त्यांची अंडी ? Absolutely no way! असली डोकी पाहिली की माझंही डोकं वळवळतं.उगाचंच भास होतात आपल्याही डोक्यात उवा असल्याचे. Actually I always had pretty short hair so lices had no scope. पण नाही, भास झाला की संपलंच. घरी येऊन खर-खर डोकं खरडून काढायचं. हाती काही लागलंच तर खातमा करायचा. बहिणीचे केस लांबसडक.उवा पटकन दिसण्यासाठी जुन्या पांढर्या चादरी, परकर, अभ्रे अंगा-खांद्यावर टाकून, काढायचं डोकं खरडून.
निघाल्याच २-४ महामाया तर अत्यानंदाने मारायच्या, जिवंत लिखा टचकायच्या, मेलेल्या ओरबाडायच्या. एक समर प्रसंगच साजरा करायचा. मग सगळं झटक-फटक करून तेल लावून स्वच्छ आंघोळ करायची. मला ह्या इतरांना घाण व किळसवाण्या वाटणार्या कामाचा कधीही कंटाळा आला नाही किंवा येत नाही. त्यामुळे शाळकरी वयापासून बोधडी टु बंबई कुठेही जा दिसल्या कुणा नातलगाच्या डोक्यात उवा की धरलंच समजा मी त्याचं डोकं. येता-जाता डोकं विंचरायचं. कोरडे केस,ओले केस, तेली केस..सगळ्या प्रकारांनी त्या उवांना अगदी दे माय धरणी ठाय करून सोडायचं. त्यांचा पुरता नायनाट झाला की लिखांवर हल्ला चढवून शत्रूला पार नामषेश करून टाकायचं.
नातलगांच्याही हे फारंच पथ्यावर पडायचं!
होना..असल्या कामाला इतके उत्साही व चिकाटीचे कार्यकर्ते कुठले मिळायला ?
तारुण्यात पदार्पण केल्यावर असे समर प्रसंग वाट्याला फार कमी आले. पण मला मुलं झाल्यावर कधी-कधी त्यांच्या डोक्यात उवा यायच्या कुठून तरी. मग काय आपल्याचं बछड्यांवर बांका प्रसंग म्हटल्यावर बाई पेटूनंच उठायच्या. केसातुन आईचा हात फिरू लागला की मुलंही गुंगून बिनबोभाट झोपायची. माझंही काम फत्ते व्हायचं.
माझी भाची माझ्या मुलांच्याच बरोबरीची. माझ्या भावाला बरंच बरं नसायचं.घर,नवर्याचं आजारपण,दवाखना,नोकरी..माझ्या भावजयीची खुप ओढाताण व्हायची. साहजिकच मुलीच्या असल्या स्वचछतेकडे तिचं दुर्लक्ष व्हायचं. मग तिलाही पकडायची मी की तुझ्यामुळे सगळ्यांना उवा होतात. ये बस, खरडते तुझं डोकं. फण्या, पांढरी जुनेरी (खास या कामासाठी बाजूला ठेवलेली) असायचीच हाताशी. गोर्यापान भाचीचचं बिचारीचं डोकं,मान लाल व्हायचं जमके खरडल्यामुळे पण शत्रुचा पुर्ण निषेश झाल्या शिवाय सुटकाच नसायची तिची आत्याच्या तावडीतुन.
माझे बाबा वयस्क झाल्यानंतर भावाच्या मुलींना खुप सांभाळायचे.त्यामुळे एखादी उ वाट चुकून त्यांच्या डोक्यात यायची. आधीचं पुरुष त्यात वयाने केस विरळ झालेले. बैचेन व्हायचे. घरी आले की म्हणायचं "मेधे... आधी डोकं खरड बरं...मनीच्या उवा आल्या वाटतं माझ्या डोक्यात. आमच्याकडे फणी सापडेल तर शपथ"
हो..कशाला असतील तुमच्याकडे फण्या ? मी बसलेयं ना इथे..दुर्गेच्या अवतारात..आठही हातात फण्या घेऊन..
उवांचा संहार करायला!
अस्मादिकांची या कामाची इतकी ख्याती आहे की
कुणाही भाचरांच्या डोक्यात उवा झाल्या की बहिणी मला चिडवायच्या...अगं मी म्हटलंच तिला जा बैस जरा मेधा मावशी पुढे जाऊन...
आपल्या,आपल्या मुलांच्या डोक्यात अस्वच्छतेमुळे किडे झालेत याचं खरंच या आया-बायांना काहीचं वाटत नसेल का ? वैयक्तिक श्रुंगार व टिव्हिपुढे तासंतास बसणार्या बायकांना मुलांकडे असं दुर्लक्ष करणं कसं योग्य वाटतं कळत नाही.मी तर फटकारतेचं अश्या आयांना.
आता सगळ्यांचीच मुलं मोठी झाली आहेत. तरीपण मुलगी कधी लाडात येऊन मांडीवर डोकं ठेवून पहूडली की म्हणते आई उवा बघ नां !
अगं काय हे ? एकही उ-लिख नाही तुझ्या डोक्यात आता.
No job satisfaction. चल दूर हो.
अगं उवा असल्याचं पाहिजे का ? तु फक्त उवा पाहिल्या सारखं केसातंन हात फिरवं..छान झोप लागते बघ !
What else you want in life ?
P.S. आता उवांचा संबंध पूर्णतः संपूष्टात आला आहे तरी किर्ती अजून टिकून आहे.सगळे जमले की they make fun of this eccentric bend of mine.
घरात आजही वेगवेगळ्या दातर्यांच्या २-४ फण्या आहेतंच.
ऐन्टिक्स फण्यांचं पण मला फार अप्रुप आहे.
कृपया माझं मुंडण व वरचा लेख याचा दुरन्वायेही संबंध नाही हे लक्षात घ्यावे. माझा फेसबुकवरचा प्रोफाईल फोटो महाबलीपुरमच्या शिल्पासमोरचा आहे. दोन माकडं आहेत व एकजणं दूसर्याच्या उवा बघत आहे असं ते शिल्प आहे.
Very apt for the hidden aspect of my personality !

हा लेख वाचताना डोक्यात वळ्वळले..असा आगळा छंद असणे आणि त्यावर लिहिणे धाडसी काम आहे....'उवां'वरचे 'लिखा'ण आवडले...
ReplyDelete