Thursday, 12 May 2016

Coffee with kurkure...

घ्या ना...coffee थंड होतीयं...मस्त पाऊस पडतोय नाही. छान वाटतंय बाहेर झडझडून शिडकावा व हातात वाफाळलेली coffee...
हो...होना...गारवाही कीती पडलायं...छान झाली आहे हं coffee...अहो दुबईवाला मुलगा येतोय पुढच्या आठवड्यात.इतकं संकटात टाकलय ना त्यानी (नक्कीच मुस्लिम मुलगी आवडलेली दिसतेयं) म्हणला आई दिवाळीची खरेदी या वेळेस औरंगाबादलाचं करु...आता कुठे नेऊ हो मी त्याला खरेदीला ? इथे काही मिळत नाही. येऊन-जाऊन ते मेलं प्रोझोन..तेही अर्ध्याच्यावर बंद...ह्या गावात branded काही मिळतंच नाही..टेंशनंच आलयं मला.....

मला नेहमी अश्या पाचट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. Non marathi, मोठ्या शहरातून आलेले मराठी आणी चक्क गाववाले सुध्दा अश्याच तक्रारींचा पाढा वाचतात.
मी आताशा reactचं करत नाही.
वयाच्या मध्यावरसुध्दा अजूनही तुम्हाला जर फक्त multi plex, malls,fine dineचे jointsचं लुभावत असतील ना तर really I dont have anything to share with you. But yes, your coice of entertainment-recreation says a lot about you for sure.
मला दिसतंय की औरंगाबाद दिवसेंदिवस बकाल होत चाललंय.रस्ते, पाणी, खडकाळ,वैराण, धुळ, अस्वच्छता. सगळ्या स्तरांवरनं दुर्लक्ष.अगदी नकोशी वाटण्यासारखी बेवारशी परिस्थिती.But still I love my city and I try my best to make most of it.
आपला संबंध फक्त याच गोष्टींशी येतो का ?
३६५ दिवस खाणं-पिणं-फिरणं-खरेदी हेच का आपलं आयुष्य असतं ? आपल्या वैयक्तिक रोजच्या सुख-सोई,आपल्या माणसांत रहायची उब,ओळख देणारे दवाखाने,-शाळा,आटोक्यातली अंतरं,स्वस्ताई,शांत दिनचर्या ई. ह्यातलं काहीचं तुम्हाला गृहिणी म्हणुन सुखावत नाही ?
सार्या जगातले लोक कुठून-कुठून अजिंठा-वेरुळ बघायला येतात इथे.आणी आपण त्याच्या अंगणात नांदतोय याचं आत्मीक समाधान नाही?
अगदी पाठीशी असलेले डोंगर, शुध्द कोरडी हवा, सुर्यप्रकाश, टिपूर नभांगण, आपल्या मातीचा सहवास...
ताज्या गावरान भाज्या, आठवडी बाजार, वैयक्तिक ऋणानुबंध निर्माण करणारं shopping, उशीरा का होत नाही पण झट-पट व स्वस्तात बघता येतील अशी नाटकं-सिनेमे-प्रदर्शनं...
I think positive points are too many.
One has to be very sure about what they want in life,so they can change their point of perspective !
आता ह्या अश्या कुरकुर्यांपैकी कीती जणांनी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात मकबरा पाहिला असेल, सुखना जलाशयावर आलेले फ्लेमिंगोज पाहिले असतील,पैठणी विवींग सेंटरला भेट दिली असेल वा आपेगाव-नेवास्याला भावपुर्णतेने नतमस्तक झाले असतील हा एक गहन प्रश्नचं आहे.
वैयक्तिक सुखासिनतेच्या पलीकडे तर फार मोठं आव्हान ऊभं असतं समाज-परिसर परिवर्तनाचं. पण असो ज्याचा-त्याचा पिंड असतो.

निदान पोटा-पाण्यासाठी जे करावं लागतं ते तरी आनंदाने स्विकारावं व आपल्या वयाप्रमाणे बदलत्या गरजा-अपेक्षांचा पाठपुरावा करावा.आहे त्या परिस्थितीतं आपण कीती समृध्द होऊ शकतो ते बघावं, समाधानानं जगावं व दुसर्यांनाही जगू द्यावं.

No comments:

Post a Comment