गेले आठ दिवस नुसती घर-घर लागलेली...तीही ऊन्हाळ्यात! घरचे बाकीचे लागले रुटीनला. माझंच एकटीचं घरादाराचं, परिसराचं, सेवकांच तंत्र आटोक्यात आलेलं नाही.
घराच्या आसपास काही छोटी मोठी मंदिरं...त्यामुळे रामनवमी,हनुमान जयंतीच्या घाऊक कार्यक्रमांची रेलचेल...
नेमकं जवळच्याच ज्योति मंदिरात नांदेडच्या चमुचा गीत रामायणाचा कार्यक्रम.. संध्याकाळचा...चला त्या निमित्ताने बाहेर पडू...आता आपलंच असलेलं मंदिरही बघू... कोणी ओळखीचं भेटेल सुध्दा...व गीत रामायणही ऐकणं होईल.
मला हिरण्य फाऊंडेशनतर्फे एक वार्षिक कार्यक्रम दौलताबाद व पंचक्रोशीतल्यांसाठी करायचा आहे. शुभारंभ गीत रामायणाने करावा असा मानस आहे. आणी आपल्याच मराठवाड्यातल्या माणसांचा कार्यक्रम सादर करता आला तर अजून छान.
So I went to Jyoti Mandir...
मोठा मोकळा परिसर... मधे रोषणाई केलेले मंदिर... कोपर्यात शाळकरी मुलं चक्क पकडा-पकडी व तत्सम हलके-फूलके मैदानी खेळ खेळताहेत...वा ! छान वाटलं !
सभामंडप सज्ज आहे..खुर्च्या, बाकडे, सतरंज्या...झाडून सगळे वयस्क...भावुक आतुरतेने बसलेले...
ग.दि.माडगुळकरांनी १९५५ साली ह्या अजरामर गीत रामायणाची गीतं लिहीली तर सुधीर फडकेंनी स्वरात बांधली. म्हणजे सध्या या गीत रामायणाची एकषष्ठी सुरू...पण जनमानसावर अजूनही जबरदस्त भुरळ !
एकुण गाणी ५६...पण नेहमी निवडकंच गाणी सादर केली जातात.
स्वये श्रीरामचंद्र ऐकती...कुश-लव रामायण गाती...या पहिल्याच सुप्रसिद्ध व श्रवणीय गाण्याने माझ्या व श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला...दशरथा घे हे पायसदान या गीतावर पुरुषवर्ग मंत्रमुग्ध झाला तर राम जन्मला गं सखी राम जन्मला वर तर तमाम स्त्री/मातृ वर्ग हेलावून गेला...
इतरही भावुक गाण्यांवर श्रोते ताल धरू लागले...बहुतेकांना गाणी तोंडपाठ!
व्हायोलीनच्या आर्त सुरांवर तरंगत आलेलं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा वर अख्खा परिसर गहीवरुन आलेला...गायकही जीवनरस ओतुन गातोय...
गा..बाळांनो श्री रामायण..या गीताने भावपुर्ण सांगता झाली.
मी आयुष्यातील दुसरं रंगमंचीय गीत रामायण अनुभवतीयं...
नेहमीच असा भावविभोर अनुभव येतो. गाणारे-ऐकणारे एका अपूर्व भावबंधनात बांधले जातात...एक विस्मयकारी अनुभव.
या रामचरित्राचे व गीत रामायणाचे भारतीय-मराठी मनावरचे गारुड पाहिले की थक्क व्हायला होतं.
रामायणाचा काळ साधारण ५-६हजार वर्षांपुर्वीचा मानला जातो. कीती पुरातन पण अजूनही दशरथ,कौसल्या,कैकयी,राम,लक्ष्मण,भरत,जनक,सीता, रावण,हनुमान...कीती ओजस्वीपणे जिवंत आहेत प्रत्येकाच्या मनात! तेही आपापल्या गुणवैषिष्ट्यांसह. आजही आपण आपल्या रोजच्या व्यवहारात, भाषेत, साहित्यात अगदी सहजपणे या व्यक्तीरेखांचा चोख दाखला देतो. वाल्मिकींनी सुध्दा कीती व्यापक व गहराईने हे महाकाव्य लिहिले आहे. हजारो वर्षानंतर सुध्दा प्रत्येकाला ते भावतंय.
आणी ही चिरंजीव कथा गदिमांनी काय चितारली आहे काव्यामधुन...प्रत्येक ओळन् ओळ मनाचा वेध घेणारी...विचार करायला लावणारी..गर्भित अर्थाची.
काय गम्य असेल या रामायणात की हजारो वर्षांचा घमासान पल्ला पार करत आजही हिंदु घराघरात...भारतीय मनामनात आदर्शतेचा सेतु बांधायचं कार्य ही रामकथा अविरत करत आहे?
आणी फक्त भारतच नाही तर इतर शेजारी राष्ट्रांपर्यंतही ही किर्तीवंत रामनौका पोहोंचलेली !
मला ह्या बहुरंगी-बहुढंगी महाकाव्यांच्या(रामायण-महाभारत)
कालातीत प्रवासाबद्द्ल फार औत्सुक्य व आदर आहे.
संपुर्ण भारतीय उपखंडाला आपलंस करणारं असं काय आहे यात ? का प्रत्येकाची नाळ जुळते या कथांशी..या व्यक्तीरेखांशी ?
माझ्या मते खुप मुळाशी,गाभ्याशी आपण सर्व एक आहोत...एकाच मातीचे आहोत व एका समान आदर्शस्थितीचे स्वप्न पाहतो आपण ! नसता संपूर्ण भारतखंडात या कथा,व्यक्ती, विचारधारा इतक्या खोलवर रुजल्याच नसत्या...व आजही २१व्या शतकात तमाम भारतीयांनी रामराज्याचं स्वप्न पाहीलंच नसतं !

No comments:
Post a Comment