@पुणे एअरपोर्ट...
अक्षरशः झाडू मारायला आल्यासारखी 3 तास आधी पोहोंचले...एकटीच...डायरेक्ट औरंगाबाहून...
पोर्चच्या ओट्यावर निवांत बसले...बस प्रवासात सुचलेलं...लिहून काढलेलं fbवर पोस्ट केलं...
व stylish 'Tiwlya-bawlya' करत बसले.
विमानांची वेळापत्रकं गाठण्यासाठी सटासट गाड्या,टेक्सीज् ,रिक्षा येताहेत...पोहंचवायला आलेल्यांचे व प्रवासाला निघालेल्यांची निरोपांची देवाण-घेवाण टिपतीयं...
निसंग व्यावसायिक झटपट आत शिरताहेत...
अविवाहित-विवाहित मुलींना सोडायला आलेल्या आयांना मुली मिठ्या मारताहेत...आया नातवंडांचे पापे घेताहेत...अर्थातंच आतून ढवळून निघालेले वडिल बेअरिंग सांभाळत बाजूला उभे...
कबुतरी जोड्या येऊ घातलेल्या विरहाने जास्तचं कबुतरी झालेल्या.
भाच्या-पुतण्यांना सोडायला आलेले काका-मावश्या-आत्या पुन्हा-पुन्हा आमंत्रण देत-घेत आनंदाने निरोप घेताहेत...
एक बंगाली कुटुंब आलंय...8-9 जण आहेत...
चाळीशीतला एक स्थानिक बंगाली मुलगा-गृहस्थ त्यांना सोडायला आला आहे. बहुधा दुःखद कारणामुळे मंडळी पुण्यात आली असावीत. त्यातली एक साठीच्या पुढची स्त्री पुन्हा-पुन्हा त्या चाळीशीच्या मुलाला स्पर्श करत डोळे पाणावत आहे...as though she is touching the lost one! Has she lost her sister ? (his mother) तो मुलगा बराच तटस्थ आहे पण बाई बर्याच व्याकुळलेल्या. बाईंच जिवाभावाचं भावंड हरवलेलं दिसतयं...कदाचित पुण्यातलं हक्काच माहेर संपल्याचे, हरवल्याचे अश्रू असावेत.टर्मिनलमधे शिरे पर्यंत त्या बाई त्या मुलाला स्पर्श करत घुटमळताहेत...
माझ्या आईच्या निधनानंतर सैर-भैर होऊन विमनस्कपणे परतणार्या मावश्या आठवल्या...
खरंच भावंडांच्या नात्याचं पोतंच जरा वेगळं असतं नाही!
एकत्रित पाहिलेले, अनुभवलेले अनेक पावसाळे...
पाणी मुरून भरणार्या सुती कापडासारखं घट्ट-मुट्ट झालेलं नातं-पोतं !
बहुधा म्हणूनंच उतारवयात आपल्या मुलांपेक्षा आपली समकालीन भावंड जास्त जिव्हाळ्याची वाटत असावीत.
कुठल्याही भावंडाच बोट धरावं व भुतकाळात एक रम्य फेरफटका मारावा व आठवणींच्या इंद्रधुनी रंगात मनसोक्त न्हावं!
हे लिहीतांना मला माझ्या दिवंगत भावाची खुप आठवण येत आहे. Many of my memories are just incomplete without him.
जसं मोठी चादर, सतरंजी पसरवायला काहीजणं लागतात तसंच बालपणीच्या आठवणींचे गालीचे अंथरायला देखील समअनुभवी असले की जास्त रंगत येते नाही.
कधी वाटतं त्या अलिबाबासारखं बसावं सगळ्यांसह कोंडाळ करून या magic carpet वर व
निघावं परतीच्या अदभूत प्रवासाला.

No comments:
Post a Comment