१४ दिवसांचा टूर..८ दिवस पोंडेचेरीतल्या साकार (Sri Aurobindo Center for Advanced Research) मधल्या शिबीराचे. घरच्या सुखासीन सवयी तर इथल्या अध्यात्मिक वातावरणातील तोकड्या सोयी, त्यामुळे स्थितप्रज्ञतेचा अगदी रोज कस लागला. आणी ह्या स्थितप्रज्ञतेचा कळस म्हणजे माझ्या अपरोक्ष तिकडे औरंगाबादला भाड्याचं दुसरं घर फायनल करावं लागलं...
करा म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटतय ते !
शेवटी सुख काय अन् समाधान काय ? सगळ्याच मनाच्या समजूती...जाऊ तिथे carry करायच्या...
तर आज ते आमचं नवीन घर बघून आले.
स्वतंत्र मोठा बंगला. चारी बाजुंनी बाग. 4 bedrooms, hall,kitchen, dining, store,sitouts,wash area,toilets...देवघर,गोल जिना,geometric fall ceilling,lightingच्या गमती,डबल लेयर्ड पडदे,झिरमाळ्या,गोंडे,टकाटक बेसिक फर्निचर,रंगीत भिंती,चारी दिशांना दारं,गच्ची,बंगई...अबबब...दमले.
हे झेपणार आहे का आपल्याला आवरायला आणी आवडणार आहे का आपल्या मनाला रहायला ?
मला मुळातच अलिशान बडेजावी घराची हौस नाही व आल्या-गेल्यांच्या बडदास्ती आदरातिथ्याची तर मुळीच नाही. त्यामुळे आपल्या सोईचं-आटोक्यातलंच घर असाव असं मला नेहमी वाटतं व आवडतही. घर आपल्यासाठी आपण घरासाठी नाही हा महामंत्र!
आता हा भाड्याचा बंगला मी सजवू कीती व आवरू कीती ?
असल्या घरांसाठी जातीचे हौशी व मनमौजीच पाहिजेत. नाही म्हणायला माझ्या स्टुडिओला झकास जागा आहे पण ते देवघर...कुठून देव आणू बाई ?
घरात माणसं तिन...आणी ह्या ८-९ खोल्या! तसं पाहीलं तर आमचे पसारे अख्खा बंगला ऐस-पैस व्यापतील म्हणा...पण तरीही अवघडंच वाटतंय!
आणी खरं सांगू ? हे मुंडण केल्यापासुन माझ्या नर्मदा प्रदक्षिणेला चांगलंच बळ मिळालयं ! Yes...I want to do it and I will do it ! पण आता हा औरस-चौरस संसारी गुंता...काय करू ? सुटसुटीत व्हायच्या ऐवजी आपण जास्तच गुंतत आहोत.
माझा भांबावलेला चेहरा बघून नवरा वैतागला...भगवद् गीतेतील स्थितप्रज्ञतेचा पाठ आठवत शांत राहिले.
चलो अच्छा है...दोनंच वर्षाच एग्रिमेंट आहे नं ?
No problem...I will adjust !

No comments:
Post a Comment