थोडं ऊन तापलं की आमच्या गावात..कोलनीत..
फिरते ऊसरस विक्रेते ढकल चरखा गाडी घेऊन..आवाज देत..घुंगरं वाजवत दिवसभर फिरतात.
ह्या कोलनीत आल्यापासुन आम्ही नियमीत हा दारावरचा ऊसाचा रस घेतो..and yes गप्पा पण मारतो :)
नेहमीचे गिर्हायीक असले की तेही आशेने रेंगाळतात..ताई-मावशी करुन आवाज देतात..
नेहमी एक तरुण जोडपं फिरतं...कधी त्यांच लहान मुलं पण असतं बरोबर..
बहुतांश नगर-बीड कडचे असतात हे शेतकरी..
1-2 महिन्यासाठी औरंगाबादला उपरं राहून
2-4पैसे गाठीला मारुन भर ऊन्हाळ्यात गावी परततात..शेतातली पावसा आधीची कामं करायला.
अधुन-मधुन त्यांना ice cubesदेणे तर कधी फ्रिजमधलं गार पाणी देणे अश्या गोष्टी आम्ही करतो.
कोलनीतले कीती जण हा दारावरचा रस घेतात
माहीत नाही पण आमच्या कडे येणारे सगळे
रोटरी युथ एक्सचेंज मधली परदेशी मुलं
ह्या ऊसाच्या रसाच्या अगदी प्रेमात असतात...
2-4 glasses at one go म्हणजे बाएं हाथ खेल! कीत्येकांना तर त्यांच्या देशात जाऊन ऊसाची लागवड करायची असते व खर्या अर्थाने स्वतःच्या पोटापाण्याची सोय लावायची असते.
तशीच ती इराकी मुलं..
तुफान आवडतो त्यांना ऊसाचा रस!
एकमेकांशी पैजा मारत येता-जाता 4-5 ग्लास गटकावतात.
केनभर पेट्रोलच्या बदल्यात केनभर ऊसाचा रस द्या म्हणतात.
तर त्या उलट पश्चिमेला तोंड करून उभी असलेली आपली शहरी सुसंस्कृत प्रजा!
TVवरच्या कोकच्या तडाखेबंद फिल्मी जाहिराती...
Malls मधले real-fresh juices चे भव्य displays..offers..says it all !
प्रत्येक सिझन प्रमाणे wardrobe व cosmetics
बदलायची मानसिकता असणार्या संपन्न तरूण भारतीयांना सिझनल..लोकल व ताज्या ऊसाच्या रसाचं महत्व कसं पटवून देणार ? आणी पटेल तो सुदिन !
Why cant we all make a seasonal resolution ? Like this summer I will drink only fresh juice or sugarcane juice !
I think that will make a lot of positive difference in everyones life !
No comments:
Post a Comment