डॊ. रविंद्र व स्मिता कोल्हेंच्या मेळघाटच्या कार्यक्षेत्राला धावती भेट...
कोलुपूरला स्मिताताईंबरोबर हिवाळी शिबिरार्थिं समवेत संवाद व वनभोजनाचा आनंद...
खेड्यापाड्यातील पण पुण्यात शिकणारी ८० युवक-युवती शिबीरासाठी स्वतःहुन आलेली...
रस्ता रुंदीकरणारात अडचण ठरणारी धार्मिक स्थळे, गिरणी संपानंतरचे जनमानसावरील चांगले-वाईट परिणाम,ढासळती कुटूंब व्यवस्था अश्या अनेक विषयांवरची चर्चा सत्र...
सामुहीक स्वैपाक,स्वावलंबनाचे धडे...कौतुकचं वाटलं !
आमच्या Project Godhadi मधल्या गोधड्यांचा स्मिताताईं कडुन आनंदाने स्विकार...
पुढे डॊ. रविन्द्र कोल्ह्यांच्या MP border वरच्या बैरागडच्या घरात पाहूणचार...
अत्यंत साधे व नितळ डॊ. कोल्हे...त्यांच्या निवासाला घर म्हणावं की झोपडी अशी द्वीधा...
त्यांच्या कलंदरपणाची साक्ष देणारे अडगळीत धुळ खात पडलेले अनेक अवार्डस !
नेमका बैरागडचा संसारी आठवडी बाजार भरलेला...चटपटीत रंगांच्या कपड्यातील काटक अदिवासी...
दिवाळी नंतरचा पहिलाचं बाजार त्यामुळे जास्तचं रंगीत व तेजीत...
पुरूषांची घुंगुरबाजा, खाटबाजा अशी दिवाळी निमीत्यची नृत्य जागोजागी सुरु...
अर्थातचं तमाम पुरुष टुंग झालेले...
गावात मुस्लिमांच प्राबल्य...रंगवलेली बुटकी घरं...खिडक्या-दारं पडदानशीन...
उत्सुकतेने लपून बघणार्या व फोटो काढायला गेलं की धुम नाहीश्या होणार्या मुली...
चांदी-रुप्याच्या दागिन्यातल्या, चटकदार रंगांच्या साडीतल्या,शिसवी रंगाच्या अदिवासी स्त्रिया...
ओहोहो...रस्ताभर ख्यातनाम भारतिय चित्रकार रामचंद्रन व अमृता शेरगिल आठवत...
मेळघाटच्या पळत्या घनदाट वृक्षांमधुन लपंडाव खेळणारी बीजकोर बघत...
कोल्हे दाम्पत्याला मनोमन सलाम करत चिखलदर्याला परतलो.

No comments:
Post a Comment