Sunday, 8 November 2015

हिंदोळे....

सकाळी उठल्या-उठल्या net on करुन mobile check केला तर
६.१७ ला left म्हणुन माझ्या २० वर्षाच्या मुलीचा msg...
शेजारी उद्देशुन...अरे ही निघाली बरका...
...हो...
शेवटी स्कुटरनेचं का?
...हं...
अरे तिचं पक्क ठरलेलं सांगायचं तरी मला...मीही विसरुन गेले काल विचारायला...
आता पोहोंचे पर्यन्त टेंनशनचं ! आणी तु तरी कसा हो म्हणालास ?
...मुलगा असता तर काय म्हटल असतसं तु ? आणी आपला मुलगाही येतोचं ना
पुण्याहुन औरंगाबादला नेहमी बाईकवरचं ! येईल ती व्यवस्थित...
अरे हो...मला खात्री व कौतुकचं आहे तीचं ! Adventure...धाडसं...वगैरे सगळं मान्य...पटतं पण !
पण तुमच्या काळजाच्या दारात ह्या अश्या चिंता उभ्या राहिल्या नं की अगदी बैचेनी येते बघ...

ऊठले...दिवस सुरु...
मुलगी पुण्याहुन स्कुटरवर औरंगाबादसाठी निघाली आहे...एकटीचं ! मी कीतीही बिनधास्त असले तरी काळजीच्या भुंग्याने जेवढं कुरतडता येईल तेवढं काळीज कुरतडलंच...
घरातले बाकीचे कामाला बाहेर पडले...एकटीनेचं घालमेलीचा सामना करत कामात रमले...
फर्माना प्रमाणे तीच्या आवडीचा साधं-वरण, भात करुन ठेवला...

मधेचं माझ्या बहिणीचा सहज फोन आला...बोलता-बोलता तीला सांगीतले की निर्मीका थोड्यावेळात पोहंचतेचं आहे घरी...स्कुटरवरुन येत आहे...
काय स्कुटरवर ? काय कमाल आहे गं तुमची...काय ? एकटी येत आहे ? तुम्ही नेहमी अश्या
त्रासदायक गोष्टीचं कश्या करता गं ? आणी तु इतकी शांत कशी ? मी तर रडलेचं असते !
तुम्ही ना मुलं डोक्यावर बसवुन ठेवली आहेत...मागे कन्हाय काय बाईकवर लेह-लडाखला जाऊन आला...
तु ऐकतेसचं कसं मुलांच ? सरळ नाही म्हणजे नाहीचं असचं ठणकवायचं !
आता आली स्कुटरवर म्हणजे परत जाणारही असेल स्कुटरवरचं ?
हो... मग काय ?
पोचली की कळव मला लग्गेच ! आता मलाच टेंशन आलयं...आणी तीला माझ्याशी बोलायला सांग...
चांगली रागावते तीला !

आता तर काय चिंतेच्या भुंग्यांना tonicचं मिळालं या फोन मुळे...
आत-बाहेर करत...घालमेलीला बाजुला सारत...कामं संपवत वेळ घालवत बसले..तासा-दिड तासाने परत बहिणीचाच फोन...आली का गं ? मलाच इथे बसल्या बसल्या त्रास होतोय...तुझं तर काय होत असेल ?
हं...ते माझं मलाच माहित...वैरी न चिंती ते मन चिंतीचा अनुभव घेतेय...हो..हो..कळवते !
माझी बहिण मुंबईकर...
छान पैकी सुखवस्तु व स्वखुशीने सुखासीन झालेल्या तमाम मुंबैकर जनतेचं प्रतिनिधीत्व करणारी...
त्यामुळे मुल्ला की दौड मत्जीद तक सारखं मॆडम की दौड मॊल तक सारखं आयुष्य...
over bridge वरुन येणार्या-जाणार्या ५-१० लोकल्स नुसत्या पाहिल्या तरी यांना गरगरणार !
त्यामुळे अश्या आशयाचे संवाद आमच्यात नेहमी घडतात...पण ते सगळे आलबेल झाल्यानंतर
so we always make fun of each other...पण आज मात्र मुलगी अजुन पोचायची होती...
अख्खा पुणे-औरंगाबाद रस्ता डोळ्यापुढे आला... रस्ता खराब तर हीला two wheelerचालवायला त्रास होणार आणी रस्ता चांगला असेल तीथे जो तो सुसाट पळणार...छाप-काटा दोन्ही टेंशनचं देणारे...अस्वस्थ झाले...
नवर्याशी बोलुन whatsappवर तीचे location track करत थोडी निर्धास्त झाले...

शेवटी बाईसाहेब दिडच्या सुमारास आल्या... सुखरुप !
तग-मग करणारा काळजीचा जीव भांड्यात पडला...तीला मिठी मारतांना उर अभिमानानी फुलुन आला !
केवढीशी ही मुलगी...केवढ्या हिंमतीने by choice आली स्कुटरवर इथपर्यन्त!
कीती सहजपणे व एकटी ! कौतुकचं वाटलं...
माझा मुलगाही बाईकवरुन ४०००किमी चा प्रवास करत लेह-लडाख करुन आलेला...
ही आणी इतरही बरीच अशी adventures संपली की या मुलांच कौतुक व अभिमानचं वाटतो पण
मधला काळ मात्र त्रासदायक परिक्षा घेणारा असतो...
माझ्या दृष्टीने हा काळ म्हणजे आईपणाचा कस पहाणारं adventureचं असतं नाही !
वरुन शांत पण आतुन ढवळुन काढणारं ! एकाकी !

आपल्याला आपल्या स्वतःच्या धाडसाची...धैर्याची...निर्णय घेण्याच्या क्षमतेची बर्यापैकी खात्री असते.
आणी ठीक आहे...जे होईल ते होऊ दे असं म्हणत संकटं शिंगावर घ्यायची
आपली कितपत तयारी आहे याचा देखील आपल्याला अंदाज असतो.
पण स्वतःच्या मुलांच्या बाबतीत मात्र आपण फार सांभाळुन व जास्त धोके नसलेला
सुरक्षीत विचारचं कायम करतो...
खरंतर तुमची मुलं तुमच्याचं कुशीतुन आलेली असतात व तुम्हीच ठरवलेल्या मुशीत घडलेली असतात त्यामुळे हमखासचं ती तुमच्या पेक्षा ४ पावलं पुढेचं टाकणारी होतात...
पण तुम्ही पालकांच्या भुमीकेत आलात की समीकरणं बदलतात व ह्या अश्या भावनांचे हिंदोळे अनुभवावे लागतात !


No comments:

Post a Comment