आमच्या North Karnatakaa ट्रिपचा शेवटचा halt म्हणजे मालवण...मुलाचे bikersमित्र आधीचं परस्पर पोहोंचलेले...त्यामुळे मुलं खुष...गेले ४ दिवस बरचं ताणलं होत त्यांना !
हंपी-मालवण पोहोंचे पर्यन्त अंधारलेलं....समुद्र किनार्या लगतचं मराठी माणसाचं छोट रिसॊर्टस...
फ्रेश होऊन १० मिनिटात बिचवर गेलो...
थोडी सामसुमचं पण नुकतीच एक मच्छीमार नौका किनार्यावर परतलेली...
३०-४० जणांची टिम कामात गर्क...
जाळं ओढुन किनार्यावर आणलेलं...काही जण जाळ्यातले मासे सोडवुन क्रेट मधे भरताहेत...तर तेच क्रेट दोघंजणं उचलुन पाण्यात बुचकळुन किनार्यावर अंथरलेल्या पथार्यांवर उपडे करताहेत...काही जणं वेगवेगळ्या माश्यांच सेग्रीगेशन करताहेत...न बोलता काम सुरु...
बघता-बघता दोन्ही पथार्यांवर कारली माश्यांच्या राशी बनल्या...
मंद चंद्रप्रकाश...समुद्राची रौरवी गाज...चमकणार्या दुधाळ लाटा...तर खाली हे रुपं लखलख चमचमतयं...
सगळे खुश...मच्ची चांगली गावलेली...४-५ कुत्रे हुंगत फिरताहेत...गावातले काही गिर्हाईकं ताज्या माला साठी आलेले...पाण्यात मोहक व तरल दिसणारे squids इथे मरणासन्न अवस्थेत फारचं कुरुप दिसताहेत...
मच्छीमारांशी थोड्या गप्पा मारल्या...हा माल लगेच ट्रक्स मधुन गोव्याच्या मार्केटमधे जाणार...ह्या माश्यांपासुन तेलं काढतात...औषधात वापरतात...
एकानंतर एक काम सुरुचं ! क्षणाचीही उसंत नाही कुणाला...
उद्या परत पहाटे ५ला निघणार मासेमारीला...
विचारलं मला न्याल का उद्या तुमच्या बरोबर नावेत? आवडेल मला...
आधी हो म्हणाले मग लावल्या वाटाण्याच्या अक्षता...मुलांनी मित्रांबरोबर कधीच पोबारा केलेला...
रुममधेच घरगुती जेवण मागवलं...मी माझ्यासाठी अख्खा पापलेट मागवला खरा...पण ताटातल्या त्याच्या निस्तेज पण वटारी डोळ्यांकडे कानाडोळा करत कसाबसा संपवला...तर जोडीदार डोळे वटारुन बघतचं राहिले...
मनात बोटीवर जायची आशा ठेवुनच सकाळी लवकर उठून बिचवर गेले तर मंडळी कधीच समुद्रात गेलेली...त्याच्या परतीची वेळ झालेली...किनार्यावर हालचाल...जडशिळ जाळं ओढायला ३०-४० जणांची फौज तयारचं होती...
जाळं टाकायला १२ जणं जातात तर जाळं ओढायला ३०-४० जणं लागतात...
गावलेल्या माश्यांनी जड झालेले जाळे, जाळ्याच्या दोन तोंडांना दोन्ही टिम्स ने ओढायला सुरुवात केली...
दोन्ही एन्ड्स मध्ये १००-१५० फुटांच अंतर व त्या एरियातचं पाण्यात गोलाकार जाळं पसरलेलं...
जाळ्याच्या शेवटाला शीडी सारख्या बल्ल्या बांधलेल्या...प्रत्येकाने म्हणजे ६-८ जणांनी त्या बल्ल्या आपल्या कमरे मागे ठेवुन मागे उलटे चालत जाळं किनार्याशी खेचायचं व हे करता करता किनार्यावरची जाळ्याची दोन्ही टोकं जवळ आणायची...आपण पुर्चुंडी बांधतो ना तशी...
वाळुत घट्ट रोवलेले पाय...बल्लीला कमरेने रेटतांना तिरपा झालेला देह...टरारलेल्या शिरा...भल्या पहाटेचं घाम निघतोय...जाळं टप्प्यात आले तसे दोन माणसं दोन्ही बाजुंनी पाण्यात उतरले..जाळं किनार्यावर येतांना शक्य तितकी जास्त मासळी जाळ्यात फसण्यासाठी जाळ्याची रुंदी हातांनी जास्त रुंद ठेवू लागले...
ज्या बोटीतुन जाळं टाकलं ती नाव व एक नाविक समुद्रात एकटेच निवान्त आहेत...त्यांना सध्या काहीचं काम नाही...डुलत डुलत डोलकर होताहेत...
जसंजसं जडावलेलं जाळं किनार्याशी येउ लागलं तसं तसं त्याला खेचणं अवघड होऊ लागलं...किनार्यावर आलेलं जाळं सुध्दा एका शिस्तीत पसरवुन टाकलेलं कारण परत काही वेळाने ते गोळा करायचं व बोटीत ठेवायचं.परत उद्या समुद्रात एका शिस्तीत पसरवुन यायचं...
आता अगदी थोडं जाळं पाण्यात राहीलेलं...माश्यांनी गच्च भरलेलं...
माश्यांनाही आता प्राक्तन कळलयं...पाण्यातुन.....पाण्याबाहेर बेधडक सुर मारत जीवनदान पदरात पाडुन घ्यायला आकांताने धडपडताहेत...मच्चीमार आनंदाने आरोळ्या ठोकताहेत...
कोवळ्या उन्हातली ती जीवघेणी उडती चमचम कीतीही मोहक वाटली तरी तो जिवन-मरणाचा संघर्ष बघुन मनात कालवा-कालव होतेचं...
एव्हाना सर्वांना आज कीती मासळी गावली याचा अंदाज आलेला...कालपेक्षा कमीचं तरीही उत्साहात अख्खं जाळं किनार्यावर आणत दोन्ही टीम्स एक झालेल्या...
पाण्यातलेही बाहेर आलेले...दम काढतं किनार्यावर थोडे विसावले...
इकडे १००-१२५ फुट लांब पसरवलेल्या अजगरी जाळ्यात तडफड करत हजारो मासे प्राण सोडताहेत...
लप-लप...फुक-फक...लपक-लपक.....असे जिवघेणे आवाज काढत..जागच्या जागी उडत... उड्यामारत...शेवटची लढाई हरताहेत..तोंडातुन फुस्स-फुस्स असे जोरात आवाज काढत तोंडातुन पाण्याचे जोरदार फवारे उडवत squids गतप्राण होताहेत...अख्खा किनारा एका सामुहिक मरण घटनेचा मुक साक्षीदार झालेला...कसंतरीचं झालं...भडभडुन आलं !
दबकत कुत्रे-कावळे जमले...घारी झेपावल्या...त्यांना हुसकत...दोन्ही टिम्स...दोन्ही बाजुंनी...जाळ्यात अडकलेले मृत मासे सोडवु लागल्या...परत क्रेट्स मधे मासे भरणं...समुद्रातुन बुचकळुन आणणं...व थोड दुर पथार्यांवर उपडे करणं...segregate करणं...आज जरा कमी मच्ची गावली त्यामुळे लवकर आटोपलं.
दुरवर निवान्त पहुडलेली नावं आता किनार्याला येऊ लागली...नावं वा बोट किनार्यावर आणणं /चढवणं सुध्दा एक खुप कष्टाचं व तांत्रिक काम आहे...या रापणं नौकेच्या एका बाजुला एक लाकडाचा गोलाई असलेला दांडा/shaft असतो...त्या दांड्याला मानेवर घेउन पुढे ढकलत व दुसर्या बाजुने बोटीला हाताने ढकलत पाण्यातुन नावं बाहेर आणणे...आता अख्खी फौजचं या कामात जुटली...हंबवण्या/आरोळ्या देत देत जोर लावत फुटा-फुटाने नाव किनार्यावर चढतेयं...नाव वाळु पासुन उचलेली रहावी व पुढे सरकवायला सोपं जावं म्हणुन
तिच्या तोंडाकड्च्या खालच्या तळाच्या भागा समोर लाकडी फळ्या oil/grease लावुन अतंरा-अंतरावर ठेवतात जेणे करुन boat will move fast and smoothly...५-६ ओंडके आलटुन-पालटुन ठेवले जातात....
परत एकदा ओल्या वाळुत रुतलेले पाय...बांकदार पाठ...मानेवर नावं ओढायचं जोखड...टरारलेल्या शिरा...
घामाची निथळण...
ऐ देवा...पाव...हैया...हैया....
हलौंबे...हैले...याल्ला....
चाली वल्ला...थांबा नाका...हैया...
एकजुटीच्या श्रमीक सुरावटीत एकदाची ती बोट चढली किनार्यावर...हुश्श्य...
परत थोडा दम काढुन मंडळी लागली ना शिस्तीत जाळं गुंडाळायला...जाळं बांधुन लगेच बोटीत टाकलं...
परत लगेच निघता येईल इतपत बोट up to date केली...झटपट पसारा आवरला...व मागे वळुनही न पाहता बरीच मंडळी दिसेनाशी देखील झाली...५-६ जणं थांबले...गावलेली मच्ची अजुन ट्रक मधे चढवायची होती.
नकोशी मच्ची तिथेचं वाळुत पुरली( १०-१५ किलो)...
मंडळी थोडी निवान्त झाली...जुझे फ्रान्सिस फर्नांडिस यांच्याशी गप्पा मारल्या...
हा मालवण चा चिवला बिच...खुप सुरक्षित पर्यटकांसाठी...तार्कर्ली पेक्षा...चांगली मच्ची मिळते...
कार्ली,पेडवा,टोकी,बांगडा,माकुल,चेंटी अश्या विविध जातीचे मासे मिळतात...पण वर्चस्व कार्लीचचं...
माल गोव्यात जातो...squids ला भाव छान मिळतो...पण सगळं उप्परवाले के हाथ मे...
थोडे आडाखे असतातचं पण तरीही बेभरवसा...
आधुनिक ट्रोलर्सशी स्पर्धा...महिन्याला सरासरी २५-३० टन माल निघतो...५० वर्ष जुनी मालवण मच्छीमार संघटना आहे...८०-९० सभासद आहेत...हळदणकर,मंचेकर,मांजरेकर, फर्नांडिस,डिसुझा,अलमेडा अशी मंडळी एकोप्याने व्यवसाय करतात...काल मच्ची चांगली गावली त्यामुळे प्रत्येकी ३०० रु.मिळाले तर आजच्या मेहनतीचे फळ फक्त रु. १०० मिळणार...ऐकुन आम्ही दोघही थक्क झालो...पहाटे ५ ते सकाळच्या १० पर्यन्त ३०-४० जणं अक्षरशः क्षणाचीही उसंत न घेता कष्ट करताहेत आणी मिळणार काय तर फक्त शंभर रुपये...
प्रत्येकाचे भाजीपाला विक्री...घरं ठीकठाक करुन रुम्स भाड्याने देणे असे जोड व्यवसाय सुरु...नवीन आधुनीक बोटींमुळे मच्ची कमी मिळतीय...पोट भरणं अवघड जातयं...जो तो पर्यटन पुरक उद्योगाकडे वळतोय...संघटने कडे ७-८ बोटी...वेळापत्रक करुन त्याप्रमाणे बोटी पाण्यात टाकतात...पाळी-पाळीने मच्चीमार कामाला येतात...उत्तम संघटन...अतिशय नियोजन व शिस्तबध्द कामाची आखणी व करणी...
team work मधे सर्कशिनंतर यांचा नंबर दुसरा...
कामावर कुणीही विडी-काडी-पुडीचा सहारा घेतांना दिसला नाही..अफाट कष्ट...निसर्गाशी रोजच झुंजणं...मोजका बेभरवशी मोबदला...त्यामुळे २घोट काय ४ घोट ताडी सपशेल माफ ! Justified...
शहरातले आपले माफक कष्ट व उत्तम मोबदले....खरोखर मनोमन खजील झालो...
सावलीत उभं रहात यांचे हे चाली वल्ला, थांबा नाका वरचे अथक कष्ट बघुन थक्क झालो...
एका व्यवसायाची माफक समज व कष्ट-मोबदल्याचं गणित....एक नविन जाणीव निर्माण झाली...
मनातल्या भावना जुझे फर्नांडिस यांना बोलुन दाखवल्या...आमच्या कडुन तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला तिळमात्र दाद म्हणुन काही पैसे उस्फुर्तपणे दिले....
म्हटलं सांगा सगळ्यांना...चहा-ताडी...whatever you prefer...Enjoy !
निघायची वेळ झालेली...निरोपाचे नमस्कार केले -घेतले...
चढलेलं उन...सुनसान किनारा...आपल्याच लेकरांच्या ओटीत जमेल तेवढ दान घालत शांत झालेला समुद्र...
चाली वल्ला...थांबा नाका...उमजुन जुझे फर्नांडिस कामाकडे वळलेले...
आम्हीही प्रस्थान ठेवले !

No comments:
Post a Comment