Thursday, 22 October 2015

सुख...समृध्दी आणी सौख्यभरा दसरा !

पहाटेचं फिरुन आले...ड्रायव्हरकाका पण आज लवकर येऊन गाड्यांना चकाचक करताहेत...
त्यांनीच काल आणलेल्या झेंडु फुलांचे मी तगडे ४-५ हार केले...त्यांनीच गाडया-दारांना ते लावले...
पुण्याहुन मुलगी पोहोंचतीयं म्हणुन माझी लगबग सुरु...
चहा घेता घेता पेपेर चाळत FBवर व whatsappवर डोकावले...
दसर्याच्या शुभेच्छ्यांच्या मेसेजसची टांकसाळ सुरु...दुपारी revert करु म्हणुन उठले व कामाला लागले...
घरात तिघं...सकाळची वेळ ...जाम शांतता...घरातले इतरजणं इतरांना शुभेच्छा पाठवुन दुनियादारी निभावण्यात अति गर्क...totally lost in their mobiles...ज्याच्या त्याच्या मोबाईल्स वरुन फक्त msgsच्या
receive-send चे वैताग आणणारे आवाज...टुक..टक...टण....टुण...टक....टुकटुक......
हल्ली ते स्मार्ट फोन्स आल्यापासुन असचं होतं...घरातल्यांची दखलही घ्यायची नाही व
दुनीयेला मात्र good morning करत सुटायचं...
एकतर आधीच मर्यादीत कुटुंबातील कुठलाही सण म्हणजे रांगोळ्या...तोरणं...मिष्टांन्नाच जेवण
इतपतंच मर्यादीत झालेला...त्यात राजाला कसली दिवाळीच्या थाटात खरेदीतलाही आनंद संपलेला...
त्यात प्रत्येकाची उपस्थिती व टाईम टेबलाचं गणित...त्यामुळे जो काही वेळ (मुख्यतः सकाळ) हातात आहे
तो हसत-खेळत सुसंवादात घालवावा म्हटलं तर जो-तो त्या whatsapp ला smartly addict झालेला...
घरच्यांशी हसुन-खेळुन तर आता इतिहास जमा होतं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती...
अक्षरशः घरोघर हीच अवस्था...लोकं तर हल्ली फक्त whatsapp वरचेच जोक्स वाचुन हसतात...एकेकटे...वेड्यासारखे !
बरं जो उठतो तो अख्ख्या फोन बुकला शुभेच्छा पाठवतो...msgs पाठवतो...काही धरबंद नाही...
या स्मार्ट फोन्स मुळेतर दुनीया मेरी मुठ्ठी में म्हणणार्या पिढीच्या हातातुन वाळु निसटुन जावी असा कौटुंबिक सुख-संवाद...जिव्हाळा निसटुन जात आहे...
फारंच वैतागले...चिडुन दुर्गावतार धारण करत अस्तनीतला विखारी डायलॊग घरच्यांना ऐकवला...
म्हटलं आता तो Happpyy Dusssarryyaa चा  एक msg आपल्याही ’होम’ group वर टाका
म्हणजे आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे बेगडी समाधान तरी मिळेलं !
भर सणावारी अशी चिडले म्हणुन परत स्वतःवरचं संतापले...
त्या बिचार्या झुकेरबर्गच्या नावाने बोटं मोडली...मग काय !
घेणं न देणं न फुक्कटचं कंदील लावुन जाणं !
त्याला म्हणाव येच एकदा इथे आणी बघ आम्हा भारतियांनी काय पोतेरं करुन ठेवलय तुझ्या whatsapp चं !
शुभेच्छा...अभिनंदनं...जनजागृती...चिथावणी...दिवसभर रतीब सुरुचं असतो...
ते खंडीभर groups...त्यात चर्चा ...जोक्स...भांडणं...groups मधले व बाहेरचे यांची शित युध्द...
groupsमधुन हकालपट्ट्या...परत घर वापसी....
बायांचे groups...बाप्यांचे तर फारंच...आणी बाया-बाप्यांचे groups म्हणजे फार म्हणजे फारचं !
हे groups सांभाळता-सांभाळता adminच्या एकाचं काय रावणाच्या देखील दहाही तोंडांना फेस आला असता...

Oh रावणा वरुन आठवलं...आज दसरा नां ?
तुम्हा सर्वांना  सुख..शांती व सौख्यभर्या दसर्याच्या शुभेच्छा !
बघा whatsapp ने कसं बहकायला होतं ते ! पटली ना खात्री ?

No comments:

Post a Comment