माझ्याकडे एक मुलगी/बाई वरकामाला येते...जेमतेम तिशीची...
दोन शाळकरी लहान मुलं...कमावता...सदगुणी नवरा...
नाजुक, छोटी, हळुबाई पण काम चांगल करते...बोलणं कमी...कामा विषयीचं...
विषयांतर तर नाहीचं !
तर आज काम करता करता...
.....ताई तुम्ही कर्णपुर्याच्या द्येवीला जाऊन आला ?
----नाही गं आता मीही लहान नाही आणी मुलंही मोठी झाली...पुर्वी जायचे मुलांना घेऊन जत्रेत...तु जाऊन आलीस वाटतं ?
.....हो ताई...या येळेस जत्रेत दागिणे लई चांगले आल्येत...
----हो का ? तरीचं तुझ्या गळयात चमकतयं ! जत्रेतचं घेतलस का ?
.....नाही ताई...ह्ये जुनंय...तिथे ना चमकीचे-सोन्यासारखे तर आहेच पण त्ये बंजारा लोकां सारखे मोठे-मोठे...लांब-लांब दागिणे खुप आल्येत बघा...तुम्हाला लई आवडत्यील...
बगीतले अन मला तुम्चीचं आटवन आली...
----ओहो सुनंदा...thank you ! and instantly I hugged her....
----(लाजुन हसत ) फिरत-फिरत येक चक्कर मारुन या जत्रत...आवडलं त्ये घ्यायचं...
चक्ली-श्येवेचे स्याचे पण छान आहेत ताई तिथे...
ok dear...तुझ्या ताई तर जत्रेत फिरण्यासाठी कुणाच्याही आदेशाची वाटचं पहात असतात कायम :)
असं बरेचदा होतं...कुणीतरी कुठेतरी जाणं...तिथलं वातावरणं...वास्तु वा इतरही काहीही बघुन त्या व्यक्तिला तुमचीच किंवा इतर कुणाची तरी आठवण प्रकर्षाने होणं...
किती लोभसं नां ?
तुमच्या व्यक्तिमत्वामधल्या एखाद्या कंगोर्यातुन निघालेला नेमका परावर्तित प्रकाश,
त्या व्यक्तिने त्याच्या व्यक्तिमत्वानुसार बरोब्बर टिपलेला असतो...आणी तुम्हाला त्याचा मागमुसही नसतो...आणी त्या व्यक्तिने जर आवर्जुन तुम्हाला सांगितले ना की...त्या तिथे...ते बघायला...अनुभवायला तुम्ही असायला हवे होतात ....तर काय ते म्हणतात नां...अंगावर मोरपिस फिरल्यासारखं...
मंद झुळुक आल्यासारखं...वा गुलाबपाणी शिंपडल्यासारखं वगैरेसारखं मस्त-मस्त वाटतं राहतं नाही !
Such compliments make your day ! What you say ?

No comments:
Post a Comment