निरामय राजकपूर !
रोटरीच्या निमित्ताने सोलापूरात...२-३ दिवसांचे सकाळपासुनचे भरगच्च कार्यक्रम...त्यामुळे लगबगीने तयार होऊन निघायची घाई...पहिल्या दिवशी रस्ता ओलांडलाच की ऐतिहासिक किल्ल्याची तटबंदी दिसली...फिरत..फोटो काढत छान morning walk झाला...
दुसर्या दिवशी उशीर झाला म्हणुन इकडे-तिकडे न बघता निघाले तर प्रशस्त चौकात 'निरा' या पेयाचा stall लागलेला...
निरा प्राप्त करंण...शिंदीची झाडं..रोपं..रोजचं उत्पादन..विक्री..नफा इत्यादी कुतूहलात्मक चौकश्या करत निरा प्राशन केली तर जवळंच एक जुनी कोनशिला बसवलेली दिसली..भारतीय पुरातत्व खात्याची. मग अजून चौकश्या..कारण हाकेच्याच अंतरावरचा किल्ला !
औरंगाबाद..अहमदनगर नंतरचं औरंगजेबाचं महत्वाचं ठाणं सोलापूर !
नक्कीच आसपास बरेच monuments असतील.
विक्रेते बाहेरच्या कर्नाटकातील खेड्यातले असल्याने फार काही सांगू शकले नाहीत..मग त्यांच नाव-गाव विचारे पर्यंत एक कोट घातलेली..लांब पण विस्कटलेली जुल्फ..हरफनमौली देहबोली असलेली व्यक्ती डुलत-डूलत stall पाशी आली व आमच्या गप्पात सहजपणे सामीलपण झाली.
तुम्ही सोलापूरचे का म्हणून विचारले तर
निरा विक्रेता लगेच त्या व्यक्तीच्या खांद्यावर मित्रत्वाची जोरात थाप देऊन म्हणाला "अरे ये तो हमारे सोलापूरके राजकपूर है..राजकपूर ! पुछो क्या पुछना है वो "
ह्या..ह्या...ह्या....म्हणत सोलापुरी राजकपूरने देखील मित्राला काय पण यार..तु पण... सारखं वाटावं अशी दिलखुष थाप देत...डोळे मिचकावत...प्रसन्न हसत दाद दिली ! एकदम निरागस हसू...
त्या थोड्या भणंग अवस्थेत देखील एक उमदं..आनंदी व्यक्तिमत्त्व नजरेस जाणवतं होतं !
अरे हो की ! He looks like Raj Kapoor.
थांबा म्हणत फोटो काढे पर्यंत
श्री. निरामयी सोलापूरी राजकपूर बेफिकीरीने
डुलत-डुलत चालू लागले...
अरे यार...I should have talked more with him...seems to be interesting character.
पहातंच राहिले !

No comments:
Post a Comment