मी चित्रकारीतेचं शिक्षण घेतलेलं आहे परंतु फार काही actively चित्र काढायचं काम करत नाही अजून.
पण औरंगाबादच्या चित्रकलाविश्वात संचार मात्र चांगला असतो...त्यामुळे एका art workshop साठी मला गृहीत धरुन जेव्हा आमंत्रीत करण्यात आले तेव्हा पाचावर धारण बसली.
घरातल्या घरात canvass रंगवणं वेगळं आणी एखाद्या art school मधे सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रथितयश चित्रकारांच्या बरोबरीने सिनीयर म्हणुन काम करणं वेगळं.
ख्यातनाम दलित कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आधारीत चित्र कार्यशाळा...
आयोजकांपासुन चित्रकारांपर्यंत सरसकट सगळे दलित व पुरुष (काही अपवाद) मीच एकटी स्त्री व सवर्ण !
आयोजक मित्राला माझे जाती विषयक विचार चांगले माहित असल्यामुळे अतिशय उमदेपणाने माझा समावेश झाला असावा.
कार्यशाळा ३ दिवसांची...जोरदार उदघाटनाच्या दिवशीचं संध्याकाळी मी आत्मविश्वास गमावलेल्या अवस्थेत
माझ्याचं कलासक्त चिंतेत असल्यामुळे झटपट स्केच करायला बसले. गोलपीठाची xerox प्रत आधीच मिळवून कवितांची पारायणं झाली होती.कुठल्याही चित्राची सुरवात होईपर्यंत मी खुप मानसिक तणावाखाली असते...आपण हे का करतोय हे
माझ्याच मनाला वारंवार विचारते...म्हणजे सुखासिन आयुष्याची छत्री नाकारुन आपण ह्या असल्या तापदायक परिक्षा का देतो नेहमी ?
एक अस्वस्थता सोसत एका भल्या मोठ्या hall मधे एकटीचं बसुन फटाफट एक स्केच कागदावर उतरवेपर्यंत आतल्या मोठ्या खोलीत ईतर सर्व १०-१५ सहभागी कलावंतांची (मुंबई, दिल्ली,रत्नागिरी,नांदेड,पुणे, कोल्हापुर,सातारा..ई.) विचार मंथन करणारी बैठक बसलेली...विषय अर्थातचं दलितांचा !
थोडीफार चर्चा कानावर पडत होती पण मला माझ्याचं कोर्या कॆनव्हासचं संकट भारी होतं...
चहा येई पर्यंत माझंही स्केच पुरेसा आत्मविश्वास देण्याइतपत आटोक्यात आलं त्यामुळे चहा घेत सगळ्यांमधे जाऊन बसले...कोपर्यात...मागे !
चर्चा चालुचं... दलितांवर शतकोंशतके सवर्णांनी केलेले अत्याचार...सध्याचे धुर्त सवर्ण व दलित राजकारण्यांच साटं-लोटं...उच्चवर्णींयांवरचा खदखदता राग...दलितांमधला फुटीरतावाद...
पोटतिडकीने भुतकाळ आठवला जात होता तर भविष्यकाळाविषयी चिंताही व्यक्त होत होती.
संध्याकाळची उतरती उन्हं...वर पत्रे असलेली कोंदट ..अंधारी खोली...सर्वांच्या काळोखलेल्या प्रतीमा...
व ह्या सर्व दडपणाचा भंग करणारी जीव उस्कटून टाकणारी भाषा...राग...असंतोष...विफलता...
अगदी सुन्न करणारी ! का कुणास ठावुक पण maxim gorky आठवला.
संधीप्रकाशातलं हे असं मलाचं गावकुसाबाहेर करणारं एकटेपण अगदी विमनस्क करून गेलं...
मी काही बोलायचा प्रश्नंच नव्हता...अपेक्षीतही नसावं...पण माझं तिथे असणंपण अडचणीचं होत होतं बहुदा.
चहा संपवून उठले तसे बाकीचेही उठले...
आज संध्याकाळी सगळ्यांना हिरण्यला जेवायला न्यायचं आहे...गाड्यांची जमावाजमव करून निघालो...
पौर्णिमेच्या प्रकाशात हिरण्यला फिरलो...हसत-खेळत..गप्पा मारत..हुरडा...जेवण...
संध्याकाळची खदखद निवली.
दुसर्या दिवशी परत एकदा मणामणाचं कलात्मक ओझं उरावर घेत canvassला सामोरी गेले...
जे होईल ते होऊ दे...पिछे हटने का नही ! स्वतःचं स्वतःला शुभेच्छा दिल्या व कामाला लागले.
काही वेळातंच आयोजक मित्र मला खास बोलुन गेला " मॆडम..तुम्ही कालच्या मिटिंगमधलं बोलणं मनावर घेऊ नका..व्यक्तीशः नव्हतं ते...जनरल चर्चा होती...वाईट नका वाटुन घेऊ !
( हं...रात्री खल झालेला दिसतोय!)
दुपारचं जेवण सुध्दा कॊलेजच्या मेस मधेचं...सर्वांबरोबर परत छान गप्पा..समजूतदार मोकळेपणाने !
सगळ्यांनी आमच्या हिरण्यची...पाहुणचाराची तारिफ केली...माझं विषेश कौतुक केलं...
मी कीती सरळ-साधी व ईगोलेस आहे हे नमुद केलं..थोडक्यात मला समपातळीवर घेण्यात आलं.
बरं वाटलं मला ! मगतर काय एकदम खुलुन गप्पा होऊ लागल्या...
जातीमुळे मिळालेली घृणास्पद वागणुक..अपमान..संघर्ष..,intercast लग्नाआधीचे व नंतरचे रंजक किस्से
( जे आज मनोरंजक वाटतात पण तेव्हा जिवघेणे असलेले) स्थिरावलेलं आजचं सुखी आयुष्य...
तरी पण विषय निघाला की जुनं-पुराणं आठवतंच व राग बाहेर पडतो...विसरता येत नाही...वगैरे.
आणी त्यात काही चुक नाही हे माझं मत.
शेवटचा दिवस..सगळे झपाटून कामाला लागले...जो-तो एकमेकांच्या चित्रांची तारिफ करु लागला...
माझ्याही चित्राची वाहवा झाली...अर्थात माझ्यामते माझं स्मार्ट,सवर्ण व स्त्री असण्याचा मोठा वाटा त्यात आहे.
मीही जरा फेरफटका मारला तर आपण फार काही वाईट काम करत नाही आहोत हे पटलं व आत्मविश्वास दुणावला...चला..workshop मधे सामिल व्हायची गोळाबेरीज तर चांगली होतं आहे.
माझ्या फोनबुक मधल्या जाणकार पत्रकार-संपादकांना मेसेजेस टाकुन आमंत्रणं दिली..काही आले पण..
प्रत्येक कलावंताची भुमीका समजावून घेत..नाव-गाव विचारत फोटो सेशन्स झाली...
आता परत गंमत...(माझं माहेरचं आडनाव) पाध्ये म्हटलं की त्या जातीत तर आठल्ये(सासरचे आडनाव) म्हटले की ह्या जातीत(रामदास आठवल्यांची कृपा)
अंदाज न येऊ शकल्यामुळे people were getting confused...and I was enjoying it !
संध्याकाळी रितसर समारोप.. काही कलावंतांनी मनोगत व्यक्त केलं...मीही ४ शब्द बोलले...
मी स्वतः जात मानत नसले तरी इतक्या जवळुन हजारो वर्ष अमानवी असमानता सहन केलेल्या
पण आता स्वभान आलेल्या एका अस्वस्थ समुहाची धग मला टिपता आली...
वंचीतांच्या मनातलं शल्य जाणता आलं...
स्त्री-पुरूष..जाती-पातीच्या भेदा बाहेर जाऊन मला कलावंतांशी हृद्य संवाद साधता आला...तसेचं चित्रकार म्हणुन देखील माझा आत्मविश्वास काही पायर्यांनी नक्कीचं वाढला...
एक जातीवंत अनुभव मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले व सर्वांचा निरोप घेतला.

No comments:
Post a Comment