आठवडाभराची थंडी व शिग लावल्या सारखी कार्यक्रमांची जंत्री...दगदगीमुळे आलेली सुस्ती...आपसुकंच सकाळी-सकाळी पिपाण्या वाजवत फिरणार्या तामिळी इडलीवाल्याला आवाज देऊन नाश्त्याची झटपट सोय लावली...
गेल्या १२-१५ वर्षांपासून औरंगाबादमधे अशी लहान मुलं दारोदारी फिरत ईडल्या विकतात. घाईच्या वेळी खुप सोईचं पडतं.
आम्ही बरेचदा ह्या ईडल्या घेतो. दरवेळेस ह्या ईडल्या घेतांना व खातांना मला एका लहान तामिळ मुलाची आठवण आली नाही असं कधीचं होत नाही. आमच्या जुन्या घरात एक बंगई होती..व्हरांड्यात. त्यामुळे येता-जाता कोणीही टेकु शकायचे...
तर एकदा असाच एक १२-१३वर्षांचा तामिळ मुलगा ईडल्या घेऊन आला...माझी मुलं लहान होती...ईडल्या घेतांना गप्पा मारल्या...अरुण का सतिश नाव.. जुजबी हिंदी बोलू शकत होता..तामिळनाडूच्या खेड्यातुन आलेला..आणलेला...
अशी १५-२० पोरं ऐका सुमार घरात राहतात..ठेकेदार ईडली-वडा-चटणी करुन देतो तर ही मुलं अख्ख औरंगाबाद पिपाण्या वाजवत पायी पिंजुन काढत डोक्यावर १५-२० किलोंच ओझ वागवत विक्री करतात. ठेकेदार ६महिन्यांचे पैसे आधीचं पालकांना देऊन ही मुलं इकडे आणुन ठेवतो.
परकं गावं-भाषा..अल्लड वय..घरापासून कोसो दुर...आधुनिक वेठबिगारीचं ! वाईट वाटलं...
ईडल्या घेऊन घरातून पैसे घेऊन मी बाहेर आले तर काय ?
स्वतःचं त्रयस्थ परकेपण...धंद्याची जबाबदारी विसरुन ते अल्लड..बारिक काळं-बोंद्र लेकरू बंगईवर बसुन हिंदोळत होतं...खिदळत होतं...इतका हर्षाने हसत होता तो की मी स्तिमीतंच झाले...अत्यानंदाने तामिळमधे तो माझ्याशी स्वतःहून काहीतरी बोलला...झोका न थांबवता...पण मला काही कळलं नाही. त्याचं झोका खेळून झाल्यावर त्याला विचारले की तु काय बोललास रे ? तर म्हणाला...आंटी मैने ऐसा झुला कबी देखा नही...ऐसे झुले पे कबी बैठा नही...पैली बार बैठा..ब्होत अच्चा लगा तो गाना गा रहा था...
मला अगदी गदगदून आलं...रोज शाळेतुन फुलपाखरागत बागडत येऊन माझ्या पायाला मीठी मारत अति उत्साहाने शाळेतल्या गमती सांगणारी माझी मुलं मला आठवली.
ह्याच बंगईवर व अंगणात रोज माझ्या व इतर मुलांचा हैदोस असतो. आणी हे कोवळं पोर कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी ६ महिन्यांसाठी विकत जाऊन दारोदार ईडली विकतयं !देखो...क्या नाम है तुम्हारा ?
अरुण...
देखो अरुण इसके आगे हर हफ्ते मुझे ईडली के बारे में पुछके जाना...और ये झुले पे आके रोज भी खेलो तो मुझे कोई एतराज नही...
समझे ? आ जाना कभी भी !
एक-दोनदा परत दारावरुन गेला...आम्ही ईडल्या पण घेतल्या..
पण निरागस अवखळपणाचा झोका थांबला तो थांबलाच !

No comments:
Post a Comment