Saturday, 17 October 2015

आटपाट नगरी...विजया नगरी...Hampi !

ऎहोले, पत्तडकल व बदामीचा blog हातावेगळा करुन २ दिवसांनी म्हटलं आता हंपीच्या मागे लागु...
घरातल्या प्रत्येकाला त्यांच्या mobile मधले हंपीचे फोटो सेंड करायला सांगुन अल्बम तयार केला...व लिखाणात जरा precision यावं म्हणुन हंपीवरची archaeological dept. ची १-२ पुस्तकं चाळली तर लक्षात आलं my god ! ह्या पुस्तकात जे दाखवलयं, सांगितलयं त्यातलं फक्त १० टक्केचं आपण वरवर नजर टाकुन बघुन आलो...
जाम वैतागले...पुस्तकं मिटली म्हटलं जाऊदे आपण जसं व जेवढं पाहिलं तेवढंच लिहु या...

बिजापुर-ऎहोळे-पत्तडकल-बदामी-हंपी असा एक दिवसाचा प्रवास व दमकाढु बघणं करत सुर्यास्ताला होस्पेटवरुन हंपीला पोहोंचलो...लागुन आलेल्या सुटया...छोटसं गाव (३-४ हजार वस्तीचं)..maximum सोय home stay ची...कुठेही जागा नाही तरी चौकश्या करत बरचं फिरलो...
फिरतांनाच जे काही ऐलतीर पैलतीर पसरलेल्या विजयानगर साम्राज्याचे विहंगम granite stone मधले अवषेश दिसले तेव्हांच लक्षात आलं अरेच्या यहां की बात ही कुछ और है !
अवाक झालो...आणी फक्त एक - दिड दिवसासाठी इथे येणं म्हणजे हंपीवर व स्वतःवर देखील अन्याय करण्या सारखं आहे हे पटलं...
जागा नाहीचं मिळाली...परत back to Hospet (13km)...तालुक्याचं ठिकाण...तीथेही जागा नाही...कश्या तरी २ बर्या रुम्स मिळाल्या...दिवसभराचा प्रवास...बघणं...दमलो होतो तसेचं उद्याची इतकी ऒढ लागली होती नां की सगळ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करत निद्राधीन झालो.
सक्काळी तडक हंपी...कोवळ्या सुर्यप्रकाशात न्हायलेलं...चतुरस्त्र graniteच्या bouldersची नैसर्गिक शिल्पं...
रेताड बदामी माती..boulders मधल्या छोट्या जागेत तरारलेल्या केळीच्या गर्भरेशमी हिरव्या बागा...चढउताराच्या पण निटसं रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी घडीव दगडांच्या अनेक लहान मोठ्या विविध वास्तु...लहान मोठी मंदीरं...मंडपं...चौथरे...चौक्या...प्रवेशद्वारं...सबकुछ दगडी शिळा...औषधालाही विट कुठे दिसेना...
मराठी-हिंदी गाईड मिळाला...आणी तडक विरुपाक्ष मंदीराकडे निघालो...प्रचंड उंच-मोठ्या गोपुराचं प्रवेशद्वार...त्या आधी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दगडी शिळांचे चाळीसदृश्य structures उभे...आपण बांबुनी तात्पुरती दुकानं उभी करतो ना तशी...हा सुप्रसिध्द हंपी बाजार ! Wow...चलनात असतांना काय दिसत असेल ना बाजारपेठ !
देशोदेशिचे व्यापारी आपापल्या चिजवस्तु घेउन इथे विकायला येत असतं म्हणे...खास करुन रत्न-माणकं-जड जवाहिरात...
मंदीराचं आतलं आवार सुध्दा खुप मोठं...गाईड ४ पावलं घाईनेचं पुढे...सभामंडप...कोरलेल्या शिळांचे स्तंभ...
बारकाव्याने  रंगवलेले छत...गाभार्यात शिवलिंग...जागृत स्थान...पुजा-आरती-घंटानाद...दर्शन घेत भाळी भस्म लावलं...आणी मंदीराच्या मागच्या व दोन्ही बाजुच्या भुलभुलैयात हरखुन फिरलो...फार कलात्मक नाही पण आत-आत अशी अनेक सभामंडपं...चौथरे...नगारखाना...वेळोवेळी इथे दिन महात्म्या प्रमाणे पुजा-आरत्या-उत्सव होत असतात...मिरवणुका निघतात...मंदीरा शेजारी मन्मथ पुष्करणी...रामायण काळात हा परिसर किष्किंधा नगरी म्हणुन प्रसिध्द होता...खुप वानरं...एकुणचं हे विरुपाक्ष मंदीर लोकप्रिय जागृत मंदीर आहे त्यामुळे भाविकांचा सतत राबता....नेमके आज मंदीरात TBDचे( tunga bhadra dam) चेअरमन सपत्नीक आलेले...मग काय त्यांच्या दिमतीला फौजचं होती...मंदीराच्या हत्तीणीने साहेब-साहेबीणीचे शाही स्वागत केले...या मंदीराचा थाट काही वेगळाचं आहे !
कालचं ऐस-पैस अनेक किलोमिटर पर्यंत पसरलेलं विजयानगरचं अवषेशी साम्राज्य व आजच्या विरुपाक्षचं अवाढव्य रुप बघुनचं मुलांनी announce केलं की आता आज तुम्ही तुमचे फिरा आम्ही जातो किष्किंधा(?) बेटावर...
तुंगभद्रेचा दुसरा तीर... मोठ्या बाऊल सारख्या नावेतुन जायचे...famous with young generation...move around on hired bikes..cycles...play music..good cafes...availability of non veg food...favorite destination for climbers...trible(banjara) craft center...its like mini Goa with homely feel...
हुश्य...चला तुम्ही खुष तर आम्हीही खुष !

गाडी काढुन लक्ष्मी-नृसिंह मंदीर बघुन निघालो तर रस्त्यात एका छोट्या चौकी वजा मंडपात एक स्त्री व लहान मुलगी दानाच्या-पैशाच्या आशेने पथारी टाकुन बसलेली...१४ वर्षाची मुलगी...नाव अंजनीअम्मा...तिचे डोके व तोंडवळा एकदम माकडा सारखा, थोडी मतीमंदचं...म्हणुन ह्या किष्किंधा नगरीत तिचे नामकरण अंजनीअम्मा करुन, तिच्या रुपाचं  भांडवल करत तिच्या व इतरांच्या पोटापाण्याची सोय लावली जात होती !

पुढे underground शिव मंदीराकडे वळलो...'प्रसन्न विरुपाक्ष' हे मंदीर मला विषेश आवडले...
एकतर जमीन पातळीच्या खाली बांधलेले...व आता नदीच्या पाण्याने मंदीराचे अंतर्गृह मस्तपैकी पुर्ण भरलेलं आहे...ह्या मंदीराचाही जमीनीवरचा परिसर मोठा हिरवा...मंदीरही प्रशस्त...
आत..आत..पर्यन्त ३-४ अंतर्गृह...पाण्यामुळे न जाता येण्याजोगी...
बाहेरचा चकचकीत प्रकाश परावर्तीत करणारं हिरवं चुबुक पाणी पायालगत चहुकडे...
एका कोपर्यात धष्टपुष्ट दगडी नंदी...खुप सारे रचलेले निश्चल कोरीव खांब...छताला वटवाघळांची चिर-चिर...
गुढ...गारं...गर्भित...काळोख... दगडांचा ओला...शहारी स्पर्श...प्रतिबिंबीत गहिरी शांतता...
शिवा सारख्या महायोग्यासाठी एकदम perfect !
जी.ए. कुलकर्णी आठवले...one of the best and serene place of Hampi !

आमचा एक दिवसाच्या वास्तव्याचा अंदाज घेउन गाईडची घाई सुरु...त्याच्या म्हणण्या प्रमाणे हंपी साठी ५-६ दिवस पाहिजेत! (same thing we say about Ajanta and Ellora) हंपीत दखलपात्र ६७ monuments आहेत.

Zanana Enclouser...राणीवसा...
आधी विजयानगर व नंतर मुस्लिम राजवटीत बांधलेल्या काही सुरेख ईमारती...
30,000 sq. mt चा परिसर...चहुबाजुंनी चिरेबंद भिंत...राणीचा महाल...आता फक्त दगडी जोतं शिल्लक...महाल चंदनी होता म्हणे...जलमहाल...treasury house...watch towers...लाकडातलं-विटातलं सर्व नामषेश झालेलं...
दगडी शिळा मात्र वैभव सांगायला अजुन शाबुत आहेत...दोन मजली कमानीदार lotus mahal...छता जवळ वाहतं पाणी कायम महालात खेळवलं जायचं...राणीच्या गारव्यासाठी... नजाकतदार Indo-Islamic काम...
इथेच बाजुला गजशाळा...टुमदार घुमटं...भली लांबलचक...बाजुलाच रक्षकांची बराक...मध्य भागी हिरवळीचं मैदान...प्रसन्न झाडी...स्वच्छता...भर उन्हात ताजं नारळ पाणी...
जवळचं archaeological office...डायरेक्टरांना कौतुकाच्या शब्दांनी पत्र लिहिलं...४ दिवसात त्यांचाही उत्साहात mail आला....
Royal Encloser...Kings Audience...विजयानगर साम्राज्याचा शिरपेच...पण आज खंडहर अवस्थेत...
95,000 sq.mt एरीयात अनेक प्रासादं..वास्तु...सभागृहं...नृत्य मंडप...संगीत मंडप...पुष्करणी...भव्य चौथरे...
सगळ्या सार्वजनीक वास्तु...अतिभव्य...
गाईड आपला सांगतोय मनापासुन पण हे अवषेश इतके प्रचंड पसरलेले आहेत नां की हो...बरं...होका..करत भरभर चढत-उतरत अवषेश नजरेखालुन घालणं ह्या पेक्षा वेगळ काही आपणं करुचं शकत नाही!
’महानवमी’ हा उंच पायर्या पायर्यांचा चौथरा तर इतका प्रशस्त व राजेशाही आहे नां की त्यावर चढुन उंचावरुन जेव्हा तुम्ही खालचे सर्वदूर पसरलेले monuments बघता ना तेंव्हा अक्षरशः रोमांचित व्हायला होतं...काय साम्राज्य आहे...खरचं उस जमाने मे क्या नजारा होता होगा ? ( असले राजेशाही चौथरे बेनहर चित्रपटात पाहिलेले) खरंतर कुठलीही इमारत आता शिल्लक नाही पण सर्वांच जोतं..basement..बघुनचं अंदाज येतो की इमारत क्या चिज होगी ! बहुतांश ठीकाणी फुलं..पानं..पक्षी...स्त्री-पुरुष..इमारतीच्या योग्यते प्रमाणे कोरलेले...
दगडी शिळांमधे सुबक कोरलेला सुंदर अवजड दरवाजा...एकेकाळी वापरात असलेला...पण आता जमीनीवर पहुडलेला...त्याच दारातुन बाहेर पडलो...
उन तापलयं...शारिरीक-मानसिक थकव्यामुळे आता डोक्यात काही शिरत नाहीये...guideला रजा दिली व विठ्ठल मंदीराकडे कुच केली...electricच्या गाड्यातुन वळणादार रस्त्याच्या दोन्ही बाजुंची अनेक मंदीर...सभागृहं...मंडपं.. गाडीतुनचं बघत १० मि. विठ्ठल मंदीर आले...चहुबाजुंनी bouldersची नैसर्गिक अफाट-अमाप रचना...तर आसपास मानव रचित दगडी बांधकामं...दुतर्फा...900 mt.ची लांब बाजारपेठ...स्वागताला भव्य गोपूर...वरचं विट काम बरचसं ढासळलेलं...आत मोठ प्रांगण...चारी बाजुला विविध सभागृह...कल्याण मंडप...उत्सव मंडप...पाकशाळा...दगडी जोतं...कोरीव स्तंभ...रामायण-महाभारतातील व्यक्ती...विष्णुचे अवतार...शंकर-पार्वती...राम-कृष्ण...हनुमान..लक्ष्मी...विठ्ठल...गणेश...वाली-सुग्रीव हंपीत इतकी मंदीरं आहेत ना की हिंदु असुनही कानडी नावांसह लक्षात ठेवता ठेवता गांगरायला झालं !
मुख्य मंदीर विष्णुचे...भरपुर मोठे...अलंकृत स्तंभ...famous musical pillars...but now temple is under repairs...
त्याच्या समोरचं जगप्रसिध्द दगडीरथ...विष्णुचे वाहन गरुडाचा...अगदी लाकडासारखा दगडात रचलेला,कोरलेला...बारकाईने अलंकृत केलेला...दगडी कोरीव चाकं..ऎटबाज हत्तींची जोडी रथाला ओढत आहे...
हंपीचे iconic शिल्प...उतरत्या उन्हातलं हे सोनेरी शिल्प बघुन डोळे निवले...
तर मोजकचं पण अफाट हंपी बघुन डोळे थकले !
लहान-मोठ्या पर्यटकांनी हत्तीवर बसुन...रथाला टेकूनच्या sefies ने उच्छाद मांडलेला...परतलो !
काल ह्याच वेळेला हंपीला पोहोंचलेलो...काल पेक्षा फार थोडचं जास्त बघु शकलो...समजु शकलो...परत इथे ४-५ दिवसांसाठी यायची खुण गाठ मांडली व गणेश मंदीर, मातंग टेकडी,हेमकुट मंदीर समुह,कोदंड राम, कृष्ण, वराह, अच्युतराय मंदीर तर कोटिलिंग,kings balance सारखी  इतर अनेक monuments पुढच्या ट्रिपसाठी शिल्लक ठेवली..ठेवावी लागली.
विजयानगर साम्राज्याची सुरवात १३शतकाच्या मध्यापासून आहे...खरंतर १५व शतक म्हणजे फार जुना काळ नाही पण इथलं विराटपण नजरेला व मनाला फार दिपवतं...१४व्या शतकातील तेलगू राजपुत्र हरीहरा व बुक्कराया यांनी ही आट-पाट नगरी वसवली व पुढील शे-दोनशे वर्षात इतर हिन्दु राजवटींनी त्यात कायम मोलाचीचं भर घातली...अगदी वसा घेतल्यासारखी !
१६व्या शतकात विजयानगर वैभवाच्या शिखरावर पोहोंचले...गावा भोवती ७ तटबंद्या उभ्या राहिल्या...
प्रशस्त ६५० sq km चा परिसर...पण ५लाख वस्ती... अनेक मंदीर...सभागृह..,बाजारपेठांनी गजबजून गेला...देशो-विदेशींचे व्यापारी व फिरस्यांचा राबता वाढला...
सोनं-चांदी व जड-जवाहिरातांच्या व्यापारासाठी जगात खास नावलौकीक झाला...
पण दुर्दैवाने ही वैभवसंपन्न नगरी १५६५ ला दख्खनी सल्तनतच्या वक्र दृष्टीला पडली व बघता बघता नामषेश झाली .
गाईडच्या मदतीने home stay च्या दोन रुम्स मिळवल्या...जुन्या हंपीबाजारा मागच्या नवीन इटुकल्या बाजारात फिरलो...घराच्या गच्ची कम रेस्टोरंट मध्ये सितारीच्या धुनवर जेवलो...

हंपी ! छोटसं टुमदार गाव...घरोघर home stayची acसह्ची सोय...छोट्या गल्या...
अंगणात सडा..रांगोळी...फुलांचा दरवळ...खोलीच्या बाहेर नजर टाकली की हाकेच्या अंतरावर विरुपाक्ष...
फक्त कानडी माणसंच अगत्यशिल नाहीत तर इथली माकडं पण विचारपुस करायला खोलीत डोकावु शकतात...बहुतेक घरांच्या अंगणात दुकानं...गोव्याच्या flee market सारखी....
गरमा-गरम इडली...आप्पे...कॊफीचे स्टॊल्स...अख्या गावाला विरुपाक्ष तारतोय !
पावसाळी-हिवाळी सुट्या व weekends...thats all for the business...उन्हाळ्याचं तर नाव नको...
सगळीकडे एक उबदार घरगुती वत्सलता...अगदी रस्समची रेसिपी विचारुन टिपुन घेण्या इतकी !

सकाळीचं निघालो...विरुपाक्ष हाकेवर...रोज सकाळी ८ वाजता विधीवत पुजा-आरती होतं असते...
पुन्हा मोह पडला...झटपट मंदीरात गेलो...
भाविक जमलेलेचं होते...पारंपारिक वाद्यांच्या घोषात तुंगभद्रेचं पाणी आणुन इतर देव व शेवटी विरुपाक्षावर शिंपडुन पुजा व आरती होते व नंतरचं मंदीर सर्वांना दर्शनासाठी खुले होते.
घंटांच्या नादात व उजळलेल्या ज्योती प्रकाशात दर्शन घेतलं...
घमघमीत वासाच्या कनकांबरी(अबोली) व मल्लीगे(जुई) फुलांचे गजरे विकत घेतले...गरमा-गरम आप्पे चापले...सढळ हस्ताने वाढणर्या मालकिणबाईंचे कौतुक केले...निघालोचं !
सकाळची वेळ...परतीच्या वाटेवर...गुलबट उन्हात हंपीचे घडीव व अनघड दगडांचे साम्राज्य अतीव मोहक दिसतयं...Hampi is best at sunrise and sunset time...

थोडं दुर (किष्किंधा-अंजनाद्री) बेट दिसतयं..हे बेट tribal (बंजारा) craft साठी प्रसिध्द आहे...
मोह आवरला...नसता घागरा-चोळीचा आहेर करत कुटुंबियांनी माझी इथेचं बिदाई केली असती !

खुप काही बघायचं राहुन गेलं पण पुन्हा वेळ काढुन यायचा इरादा पक्का आहे त्यामुळे शांतचित्ताने निघालो...
हिन्दुस्तानच्या इतिहासातील एका खणखणीत...वैभवशाली...त्रिखंडात गाजलेल्या...गाजत असलेल्या साम्राज्याचा निरोप घेतांना मन अक्षरशः भरुन आलं.....
और मनही मन मे, दिलसे और गर्व से कह गये की हम हिंदु है !!!








2 comments:

  1. मस्त लिहिले आहे ,सविस्तर वाचेन

    ReplyDelete
  2. मस्त लिहिले आहे ,सविस्तर वाचेन

    ReplyDelete