Thursday, 10 September 2015

ताळमेळ.....२०१४ !


दुर्दैवाने सुखाच्या सायीवर बुडबुडे देखील न फुटाणारेचं येतात !

Living in budget....
certainly bestows you with lots of opportunities to be happy and satisfied !


उतरत्या ऊन्हात...गायरानातील गवत-झाडोर्याकडे दुर्लक्ष करत....सोनेरी धुळ उडवत....
दुडक्या चालीने घराकडे ओढीने परतणारे शेळ्या-मेंढ्यांचे कळप खुप आश्वासक वाटतात !

कुंडीतल्या झाडांना नियमीत खत-पाणी घालुन 
आपल्या मनाजोगं टवटवीतपणे फुलवणं सुध्दा कीती criminal आहे नाही ?

Today it seems Mumbai is blessed with as resplendent full moon as usually is Aurangabad !

' टाईमपास '.....
बाळबोधपणाच्या अतिरेकाची चमचाभर साखर जास्त...
वास्तविकतेचं चिमुटभर मीठ कमी...
थोडी न जमलेलीचं काजूकतली.
...तरी 'टाईमपास'ला आपलं "143"
smile emoticon

ऐन थंडीत...बोचर्या दुपारी....न्हायल्या नंतर....गरम..मऊ..तुप, मीठ, मेतकुट भातासारखं पक्वान्न नाही, आणी गोधडीत गडुप्प झोपण्या सारखं सुख नाही !

थंडीतल्या भल्या पहाटे गाडीच्या काचेतुन का होत नाही 
पण कामगार वस्तीतील माणुसकीची...एकोप्याची धुगधुगी पाहिली की कसं उबदार वाटतं....नाही ?

अवचितपणे आलेला चितचोर.......पाऊस....
आणी गारा पण !


How dear it is to get an acknowledgement from an EXCHANGE STUDENTS mom that as a host mother you have changed her son considerably...in a better way!

....and the ' MAGHI ' full moon radiates the sky line with
its own pearly incredible shimmer !
Beautiful...dont miss it.smile emoticonकालचं ग्रंथ प्रदर्शनातुन काही पुस्तकं विकत आणली...

कालचं ग्रंथ प्रदर्शनातुन काही पुस्तकं विकत आणली...
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे लिखीत ‘भारतीय विवाह्संस्थेचा इतिहास’ हे त्यातलं एक.
आज पेपर उघडला तर कळलं की आज World Marriage Day आहे म्हणुन !
2nd Sunday of February is celebrated / observed as a World Marriage Day...
its purpose is declared to be " World Marriage Day honors husband and wife as the foundation of the family. The basic unit of society.
It salutes the beauty of their faithfulness, sacrifice and joy in daily married life !
...but still for many `To Live Happily Ever After' is just a Myth !

उगवतीचा आशादायी, तेजस्वी नारिंगी रंग ....
अनेक कारणातलं हे एक कारण हिंदु धर्म रंग भगवा असण्याचं !
हिंदु नविन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .
हे नव वर्ष सर्वांना सुख, समाधान व समृध्दीचे जावो.

दिवसभरच्या रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर......
संध्याकाळच्या सुखद गारव्याचं मोरपीस हलकेचं.....

तव्या वरती स्माईली कोरत थापलेले थालीपीठ जास्तचं रुचकर लागतात ! 
जरुर करुन बघा smile emoticonफालगुन पौरणिमा.....

ढगा मागुन लपंडाव खेळणारा तेजस चंद्र.....
अधुन मधुन लुक लुक चांदण्या.....
खाली धडधडणारी होळी....
सुखद गारवा....झुळ झूळ वारा....
धबधब्याची  खळाळ गाज....
indeed Hiranya is blessed 


Hindi movie "Queen"......
Nice and different ....
Kangana Ranaut is in her element....
From being a best dressed starlet to a fine actress...she has come a long way!
Kudi ne hungama kiya hai !

Once again Morning Walk........................................................................................
Ahhaaa.....the chill...the fog...silken sun rays.....
the whole bunch of familiar, enthusiastic community.....
it literally showers you with energy and zest !
Why I discontinued it for few months ?


काल पासून फाल्गुन महिना सुरु.....
भारतिय उपखंडातील दोन चिरतरुण महिने...श्रावण व फाल्गुन....
श्रावण हिरवाईच्या वैविध्यपुर्ण छटांनी अथांग ओसंडणारा....
तर फाल्गुन झाडं-पानं-फुलं-फळांच्या विविध रंगी. बहुरुपाने बहरणारा....
...पण थंडी मात्र अजून एखाद्या माहेरवाशिणी सारखी रेंगाळतचं आहे !

सकाळचं ७.३०चं ऊन पाठीवर झेलत...
घाम काढत थकवणारा....
घर दिसताचं फास्ट होणारा Morning walk.....
दारातल्या कांचन वृक्षाच्या शेंगा तडकुन..... 
स्वागतार्थ होणारा बियांचा वर्षाव डोक्यावर होताचं कृतार्थ होतो !

अधुन मधुन दिवसा बाहेर पडलं की ऊन्हाच्या तडाख्याचा प्रचंड शारिरीक त्रास.......
घरात आलं की...... बाकीच्या रोजच्या कष्टकर्यांना काही होत नाही व आपल्यालाचं
कसा काय त्रास होतो याचा खुप मानसिक त्रास.........
एकुणात ऊन्हाळा अति त्रासदायकचं !


Bai Aaji D & B....धुणं- भाण्डी करणार्या आजी (कामवाल्या).
This is how I have saved her number.
दोन दिवसांच्या बुट्टी नंतर झक्क पैकी चौकडीचं लाल भडक पातळ...पिवळं धम्मक ब्लाऊज...
ठसठशीत कुंकु...हातभर बांगड्या...अश्या मस्त पेहेरावात आजी सकाळीच कामाला हजर.
त्यांना पाहुनचं प्रसन्न झाले !
त्यांच्या नकळत त्यांचा एक छान फोटो काढला...व त्यांना विचारलं आजी तुमचं नाव काय हो ?
"माझं नावं ? अनुसया बाई...( हसुन...त्यांच्या भाषेत बिन दाताचं बोदरं हसु)
आवडलं का बाई तुमाला ?"
मी गमतीने..." अहो आजी मला थोडीचं तुमच्या बरोबर नांदायचं... आवडलं काय अन न आवडलं काय....हो की नाय ?"
म्हटलं आजचा status हाच संवाद टाकावा...
काय नाव सांगीतलं बरं त्यांनी...अनसुया की अनुसया ?
Just to be more precise असावं म्हणुन परत एकदा त्यांना नाव विचारलं....
" आता...मघाशीचं म्हनल्यान की मला काय तुमच्या संग नांदायचं का म्हनुन...आता बर्या घडी घडी नाव पुसु राहिल्या ?..... काय बाई ? "
पुन्हा एकदा बोदरं हसु....
You just cant be sure who will be the sunshine of your Day ! smile emoticon


Smoothly चालणारं पेन...आणी सर सर लिहिलं जाणारं आपलचं छान हस्ताक्षर....
enough reason to be happy smile emoticon ! Isnt it ?


मध्य चैत्रातलं मध्यान्हीचं ऊन.....
भर माथ्यावर सुर्य तळ..तळ..तळपतोय...जमीन भाजतोय...
वसंतात नव्हाळलेली झाडे...जळजळीत ऊन सर्वांगावर झेलत,
स्वतःच्या मुळांचा ओलावा स्वतःच्याच सावलीत जपताहेत....
एखाद्या कूटुंब वत्सल कर्त्या व्यक्ती सारखे !


ढगांची चादर.....सु..ख...द...वारा.....
गुलाबदाणीतल्या पाण्याच्या शिडकाव्या सारखे पावसाचे शिरशिरी थेंब......
पिसाट मृदगंध चोहिकडे........
P.S. Seems Nature has read my yesterday`s status!

Dear sun....
Cant you laze around for few more minutes....till i finish my morning walk ?


In spite of ruthless...untimely rains and hail storm, almost after a month nature blooms at HIRANYA with all its might.



१०-१२ दिवसांच्या ब्रेक नंतर आजचा Morning walk...
दरम्यान उन्हाने ४०शी ओलांडलेली....
उन्हाच्या धसक्याने अलार्म लावुन लवकरचं उठले व walk ला निघाले....
बर्यापैकी गारवा...शांत रस्ते...नुकतीचं परवा पावसाची झड येउन गेल्यामुळे,
झाड-झाडोर्यांवरची खास ’औरंगाबादी’ धुळीची मखमल वाहुन गेलेली....
सर्व हिरवाई स्वच्छ ...तजेलदार...गारीगार हिरवी....
पण तो करकरीत सुर्य मात्र भुकेल्या श्वापदा सारखा त्वेषाने वर वर उसळतोय....
आकाशात वानगी दाखल देखील ढगाचा चिठोरा नाही....आभाळाची अंगभुत निळाई
देखील या उन्हामुळे करपुन राखाडी झालेली....
चटचटीत उन्हामुळे नजर काय मान सुध्दा वर करायची सोय नाही.....
फिर क्या ?..
अपने ही पैर देखते गये और अपने ही पैर देखते-देखते वापस आये !


21st Century's Grand...Indelible...Coronation Ceremony With A Pinch Of Apprehensions !


देखणी गाय...समई...टप्पोरे गुलाब चितारलेल्या चकाचक rig - truck वर भल्या पहाटे मालकाच्या आदेशाची वाट पहात बसलेली 
ही परप्रांतीय मुलं....
स्वतःच्या आणी कुटुंबाच्या पोटासाठी दाही दिशा करतांना अस्ताव्यस्त होत कायम हरवलेली....
१-२ पातेले...एक स्टोव्ह...२-३ कपडे...ह्या एवढ्याचं सामग्रीवर ट्रकवरचं काही महीने काढणार....
दिवसभर दगड... का माती... का पाणी... करत शिणलेल्या पाठीला रात्री फाटकी कांबळ तर नजरेला टिपूर आभाळ !


महापुरे येता...वटवृक्ष कोसळती....तिथे लव्हाळी वाचती !

पहाटेच्या प्रसन्न गारव्यातील माझा चैतन्यदायी Morning walk .....
तर.....कुणा एकाची बंद गेट समोर अगतिक बैठक सकाळी सकाळीचं !

Untimely.......But its raining B..E..A..U..T..I..F..U..L..Y !


एक भावुक संध्याकाळ.....
१ मे रोजी आपल्या मातृभुमी - कर्मभुमीला मानवंदना देण्यासाठी म्हणुन
हिरण्य व्हॆलीत रंगलेली हिरण्य फाऊंडेशनची ’ अभिजात महाराष्ट्र ’ ही संगीत संध्या.......
सर्व सामान्य मराठी - अमराठी लोकांना एकत्र आणुन ’महाराष्ट्र दिन’ साजरा करण्याचं
महाराष्ट्रातलं पहिलं पाऊल औरंगाबादकरांचं !
पं. अतुलकुमारांचं अलवार व्हायोलिन वादन व रोमांचीत करणारी वंदेमातरमची धुन......
पं. मुकेश जाधवांचा हिरण्य व्हॆलीत गुंजणारा दमदार तबला.....
Indeed it was a Mesmerizing performance.....
Magnificent ambiance......
and Most Memorable evening.......
And that was MAHARASHTRA DAY !

महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला हिरण्यला बहरलेली...
महाराष्ट्र राज्य फुलाचा मान असलेली....
तामणीची फुलं.....
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


Morning Walk....
एका विस्तीर्ण पिंपळाखाली दोन फ़कीर अगदी मनापासुन हितगूज करत बसलेले....
नवं-कोरं हिरवं कापड डोक्याला...स्वच्छ पांढरे कपडे....
जय्यत तयारी रमजानला सामोरं जाण्यासाठी.....
मी फोटो काढायला लागले तर त्यांनी लगेचं stiff studio pose घेतली....
"...अरे...ऐसा मत बैठो...अभी जैसे बातें कर रहे थे नं...वैसा ही normal बैठो...."
थोडाफार बदल करत pose देत... एकने परवर दिगार अल्ला को ललकारा....
दुसर्याने साईबाबां सकट ५-१० हिन्दु देव पोटाशी घेतलेल्या पिंपळाला साकडं घातलं....
" अल्ला के बंदे...अल्ला ताला आप पे रहमत बक्शे...और आपकी जिंदगी खुश-गवार गुजरे !


पावसाला साकडं घालण्यासाठी आजचा ‘शुक्रवार’ सत्यनारायण पुजेसाठी मराठवाड्यात ‘आरक्षित’......
....तेव्हा तमाम ब्राम्हणांनो भोजनाला येण्याचे अगत्य करावे....
काय म्हणालातं...नक्की कुठे यायचे ?
अहो जिथुन धुपा-तुपाचे धूर...आणी पुरणा-वरणाचे वास येताहेत तिथे कूठेही जाऊन बसा की पंगतीत....
अजुन तरी एका जेवणाला नक्कीच महाग झाला नाही आहात तुम्ही ! 
असे कसे हो ब्राह्मण तुम्ही बाळंभट्ट ? कसं होणारं तुमचं ?



Fondly remembering `The Good Earth' lady...Pearl S. Buck today !


आई...गं....! 
कधी एकदा पाऊस येईल आणी ह्या super active मुंग्या निष्क्रीय होतील असं झालयं !



Had a hot...hard...and somewhat disheartening day at HIRANYA.....
वृक्षा रोपणाची तयारी म्हणुन खड्डे करतांना अनाहुत पणे दोन सर्प पिल्ले जखमी झाली...
एका जखमीला वाचवून त्याचे स्थलांतर केले....
पण दुसर्याने मात्र आम्हाला खिन्न करत २ मिनिट मे ही दम तोड दिया.



Down The Memory Lane.......
Met my dear hostel friend almost after 25yrs @ Pizza Hut...Pune...
Generally tissues are used for cleaning.....
but, we mapped and traced our Hostel...Hostel mates....and bygone years !
We were so engrossed in chatting that we forgot to take a SELFIE!


ऊशाशी ‘आठवणींचं‘ गाठोडं....
अंगावर ‘स्वप्नांची‘ गुलाबी झिरझिर....
बाजुलाचं ‘वाट‘ फुटेल तिथे नेणारे टाकावू बुट....
आसपास इस्ततहः कचर्याचे सुगंधी ‘साम्राज्य‘......
.....ही आहे कुणा एका भणंग पांथस्थाची ‘साखर झोपी‘ बेडरूम !


सुना है.....
एक जमाना वो भी था...जब लोग कफ़न पहनके जंग के लिये घर से निकला करते थे....
अब.....एक जमाना ये भी आया है !
वक्त का जालिम दौर...और क्या ?


इडली रुपी शतपाकळ्यांचे कमळ उमलले दाराशी.....
Its a breakfast time !

लावणी सम्राद्य़्नी सुरेखा पुणेकरांचा International ’ नटरंगी नार ’....
Ladies groupने आयोजीत केलेला खास फक्त बायंकासाठीचा भर दुपारचा प्रयोग....
रंगमंचावरचे आणी मदतनीस असे मोजुन फक्त ८-१० पुरुष सभागृहात....
वात्रट लावण्या...जोरदार म्युझिक....ठसकेबाज नृत्य...फटाकड्या नृत्यांगना....
तोडीस तोड नृत्य करुन अटीतटीची दाद देणारा उत्साही महिला प्रेक्षकवर्ग....
कार्यक्रम सर्वांना खुष करुन गेला.....
....पण मला मात्र Girls high school च्या gathering ला आल्या सारखं वाटलं !


काल रात्री अचानक मृगातला जोरदार पाउस...वादळ....
लाईट गेलेले...inverter discharged...बिनासेलचे निकम्मे टॊर्चेस....
आडबाजुला लपलेल्या मेणबत्त्या....
मग काय चिरजीवांनी शेवटी स्टिलच्या वाटीत भरपुर तेल ओतलं...
माझ्या शिवणाच्या ड्रॊवर मधील नाडीच्या बंडलातील नाडीचे २ तुकडे करुन....
त्याच्या वाती करून...दिवा लावून...अंधार पळवला....माझ्या साठी !
Bravo my son ! 



Its thundering....raining....
Wow...I knew you will not miss The Appointment...


Attending marriages is tiring...
....and to be happy ever after in married life is taxing.

रमजान आणी श्रावण ....
बालमित्रांसारखे आनंदाने गळ्यात गळे घालत आलेले....
....a time for Sheep...Plants and Flowers to shiver in silence !


भिक नको पण कुत्रा आवर.....बोले तो WhatsApp !


`Daughter Of Persia` by Sattareh Farman Farmaian 
An extremely rich IRANIan carpet woven of 
human emotions...faith...dreams...religion...greed...betrayal & politics...
A must read for any one who is interested in knowing politics of oil...
and western rules of global power game.


Treasure Hunt @ Amalner......
३-३.५ फुट लाम्ब...२.५ इंच रुंद...सर्व सामान्यांसाठी तलवार सदृश्य,
पण आहे मात्र ‘मराठा धोप‘.....
अग्र टोक,पिपळा, पाठ, धार, नाळ ही आहेत पात्याची अंग तर
नेत्र, नखा, ठोला, खजाना, परज, मुठ, गादी, कडी, दस्तानी, फुल, वाटी, गज, तोटी
ही आहेत मुठीची अंग.....
आणि हो..हो... हीच ती तमाम मराठी जनतेच्या काळजात घुसणारी ‘मराठा कट्यार‘ !


पावसाची झिमझिम...आणी रेडीओ मिरचीवर Sunday host RJ....
आपली 'राखी सावंत'......
OMG....Its really Hot !


६०..७०...८० च्या दशकातील filmy duets ऐकत क्षितीजापार long driveला जावं
अशी भन्नाटचं हवा !


Is there any Candy Crush Proposal Crusher like paper shredder ?


पाऊस आणि पुस्तक.....
Tunning with 'Daughter of Persia'
@ HIRANYA !


जिकडे पहावा तिकडे आहे...गजर...जागर...भक्ताळलेला वारकरी......
आत्मानंदी चिंतन मात्र अवघडले क्षणभर........विटेवरी !


Instant Happiness...is to have a lot of choice to choose from a stack of crispily starched kurtas !

Frustrated @ mall.......
......it emptied my pocket and lumped me with heavy bags......
......it gave me a instant HUGE complex of my much more extra kgs
and shamelessly took away my peace of mind ! frown emoticon
* Mannequins are there to PLEASE you or TEASE you ? :I


बा..अदब....बा..मुलाहिजा......हो..शि..या..र....!
मोहतरमा मौसमे बारिश पधार रही है !


My adventurous Biker son is coming home today.
Almost after 2 weeks of bike trip to Delhi-Leh-Laddhakh-Delhi n then to 
Aurangabad (4500 km).....
उत्साहात भाजी-बाजारात निघाले......
गाडी सुरु केली तर रेडिओ मिरचीवर,कधी तू...रिमझिम झरणारी बरसात...कधी तू....
भाजी अलगद घरात !



बर्याचं जणांना गणपती सारखं वाटणारं...दिसणारं आमच्या घरातील चंदन मुळ....
अर्थातचं हिरण्यवरचं smile emoticon !
मोदकाच्या मुखर्या बंद करुन तोडलेल्या कणकेची ही फुलांसारखीचं दिसणारी कणीक फुले...
अर्थातचं मी केलेली आणी तळलेली grin emoticon !


Dear Bappa.....
Radio, TV, Mobiles, Loud speakers च्या शुभेच्छांच्या radio waves च्या घमासान मध्ये श्रध्देने तुझ्यापूढे नतमस्तक झालेल्यांच्या 
मनीचे भाव तरंग तुझ्या पर्यंन्त पोचतात तरी का रे ?
अगदी मान्य की तुझ्या या उत्सवा मुळे सगळे एकत्र येतात...
आनंदाची देव-घेव करतात....
मुर्तीवाले, डेकोरेशनवाले, ढोल-ताशेवाले, म्युझिकवाले, मंडपवाले, मिठाईवाले, फुलवाले, भाजीवाले, पुजावाले, पेपरवाले, व्यापारवाले...ई.सगळ्यांच्याच पदरात
तु काहीना काही टाकतोसंच टाकतो.....
तुझ्याचं मुळे तरुण नेतृत्व उदयाला येतं...सशक्त होतं....
शिल्पकार, चित्रकार बहरतात...लेखक, गायक, वादक, नर्तकांना सुर सापडतो....
अवघाची आनंदी-आनंद असतो
खरं म्हणजे ना बाप्पा...तुझा हा ऊत्सव म्हणजे सृजनशिलतेची एक नांदीचं असते !
तरी पण आताशा तु मात्र ह्या सगळ्यात असुन नसल्या सारखाचं असतो...वाटतो...
जणु काही एक अकेला इस शहर में....



भन्नाट.....
रेल्वेच्या दारात...पायर्यांवर बसुन...
पाऊस झेलत...धुक्यात हरवत...
डोंगर-दर्यांना शिळ घालत...गाणी म्हणत....
अख्खा भारत पिंजुन काढावा अशी ‘झक्कास’ हवा.... !



ह्या अमीरखाननेनां आपल्या outdated.. डब्बा..radioला सुध्दा
रातोरात Superstar केलं बुवा... smile emoticon

Everybody is twitting about it only ! मान गये उस्ताद !


16 ऑगसटची जिवघेणी..दुषकाळी... निळाई....


१५ ऒगस्ट २०१४ @ सिडको बस स्टॆन्ड....
ईस्ततः सर्व प्रकारचा गलिच्छ कचरा..माश्या...दुर्गंधी....
भरदुपारी जागा अडवून बेंचेसवर झोपलेली माणसं तर त्या खाली सुस्तावलेली कुत्री....
उदघोषणांचा अखंड मारा...विक्रेत्यांचे ओरडे...
अस्ताव्यस्त अठरापगड प्रवाश्यांचे डेरे....
रया गेलेल्या लाल-पिवळ्या बसेस...त्यांच्या पाट्यांवरसुध्दा जाहिराती....
तहहयात कावलेले काचे पल्याडचे ‘मितभाषी‘ कर्मचारी...
कुणाचा पायपोस कुणात नसल्या सारखा माहौल...नजर टाकू तिथे बकालपणा....
माझे ८३वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक काका त्यांच्या आडबाजुच्या गावाला
कधी आणी कसे पोहोंचणार ह्या काळजीने मी धास्तावलेली........
सकाळपासून तेजाळलेला देशाभिमान....राष्ट्रप्रेम....ह्या बस स्टेन्ड दर्शनाने पार झाकोळुन गेलेलं...
Tourist Capital Of Maharashtra (Aurangabad)च्या prime areaतल्या
बस स्टॆन्डची ही अवस्था....
अख्खा भारत bullet trains, express ways,high ways ने जोडण्याचे स्वप्न दाखवणारे
आजचे सरकार ‘क्रपया‘ ह्या बेसिक गोष्टींकडे पण लक्ष देतील का ?


ज्योती विद्य़ा मंदिर.....
६८व्या स्वातंत्र्य दिनाचे झेंडा वंदन...आज पाऊस नसणं पथ्थ्यावर...
प्रसन्न वातावरण...मुलांची किलबिल...शिक्षकांची लगबग...निटंस कार्यक्रम...
झेंडावंदन...जोरदार राष्ट्रगीत...देशभक्तीपर गीतं...घोषणा...टाळ्या...
सगळीकडे मुलीचं अग्रेसर...
बक्षीसं..खाऊ..वह्या..वाटप...
वर्गानुसार नाटुकल्या..संवाद..कविता..कवायती..सादर...
एका चिमुरडीने तोंडपाठ म्हणलेली कवीता विषेश भावली...
तिसरीच्या पुस्तकातील तुकाराम धांडेची ‘रानवेडी‘...
काही पाल्यांचे अशिक्षीत, हातावर पोट असणारे पालक आवर्जुन आलेले...
दिवसाचा रोज बुडवुन आपल्या पोरांचं कौतुक करायला छान तयार होऊन आलेले पालक...
चेहर्यावर अपार आनंद...हसू....
एक आंख में पानी तो दुसरी आंख में उम्मीद !


तुझं बरं असं डोकं चालतं ऊठसुठ लिहायला...आम्हाला नाही असलं काही सुचत......
बर्याच वेळा अश्या प्रतिक्रीया माझ्या लिखाणावर.
" अहो का नाही चालणार माझं डोकं ? रोज जी ह्या झाडा खालून फिरते ती ?


नंदीवर विराजमान झालेले शिव-पार्वती.....
गोदावरीच्या प्रवाहाने झिजलेलं...कुणा एकाला नदीत सापडलेलं...
पण आता माझ्याकडे असलेलं अतिशय सुबकं असं प्राचीन दगडी कोरीव शिल्प.....
भारतीयांच्या चौकटीबध्द मानसिकतेला छेद देणारं दगडी शिवलिंग.....
हेही गोदेतं प्रवाह पतीत झालेलं...चौकटीतलं !
प्रकृती-शक्तिच्या नात्याचे अदिम रुप.
शेजारी ओंकारेश्वरला नर्मदेत सापडलेला Tree Agate....
कैक हजरों वर्षांपूर्वी लाव्हात trap झालेली व नंतर लाव्हाबरोबरचं solidify झालेली वनस्पती....
ह्या दगडाचा पण झिजुन गोटा झालेला....
ह्या तीन्ही शिल्पात अतिप्राचीन असलेला हा नर्मदेतील नैसर्गिक गोटाचं माझ्या दृष्टीने पुजनीय!
काळाच्या प्रवाहात सगळचं कसं झिजत-झिजत नामषेश होतं नाही ?
पण तरतांत मात्र मानवी मनाला भावणार्या दैवी संकल्पनाचं !


Moved by the movie 'The Reader'


श्रावण पौर्णिमेला..
घरात उमटले्ल्या सुर्यनारायणाच्रुया रुपेरी पाऊल खुणा !


काल नवीन शुज घेतले म्हणुन आज जुने 24*7 वाले शुज धुतले....
निट बघीतलं तर काय अंगचेच वाटावेत असे अनेक ठिकाणी काटे रूतलेले....
सेफ्टि पिन, pluckerच्या मदतीने बराच खटाटोप करुन काढले तर चक्क 10-12 टोणगे काटे... OMG !
...hey..seems I had a wonderful walk... smile emoticon
and of course this is not going to be a reason to hang up on my shoes !



बाकदार..पावसाळी पोपटी पानामागून लपत-छपत उमलणारी अकेशियाची पिवळी लोभस फुलं.....तर औरंगाबादच्या कोरडया हवेत कण्हत कुथत वाढणारा व आडमुठपणाने हातचं राखून फुलणारा
टापटीप गुलाबी कॅशिया जविनिका ।



पावसाळा...श्रावण....पंचमी.....मेंदी......
लट उलझी.....सुलझा.....
बालम मोरे.....हाथो में मेहंदी लगी............
सर्वांनांच शुभेच्छा आणी सुप्रभात !


वादळापुर्वी आणी वादळानंतर......
A powerful portrait demonstration by renouned artist Pramod Ramtekesir at Mirror art gallery.A'bad.

Watching SHOLAY and getting enticed by Helen's
Mehbuba....mehbuba.......
..............
कोई हसीना जब रुठ जाती है तो...
और भी हसीन हो जाती है........
My god is it so ? 



रुजवा........
Some lighter and brighter moments from the art gallery...
...kids loved to play hide-n-seek under SOMEBODY's watch... smile emoticon
Everyone loved these two paintings as they are about robots and animals... grin emoticon
...a classroom of enthusiastic portrait artists... smile emoticon
A tea break for the favourite but age old model... grin emoticon
A beautiful gallery of portraites and caricatures... smile emoticon ...an artists anxiety over the buyer's dilemma about The Purchase... grin emoticon
......ऐक छोटीसी सिंदुरी बिंदी की किमत तुम क्या जानोगे रमेशबाबू ?...


Team 'RUJAWA' is very happy with the promising interactions with guests from all walks of life ! From poets, architects and builders to hoteliers and industrialists...
The 'Sold-out' graph is ever rising !
Oh, the right things are happening at the right time 
YES ! Its absolutely true that you work better under pressure....

A grand opening of RUJAWA...रुजवा....
An art show at Aurangabad...
...getting encouraging response from art lovers....
Art students are thrilled by the event and enjoying the short films on world renouned artists like Rembrant, Turner, Picasso, Van Gogh.....

Lost in the dense fog.....
Some times its good to be nowhere!
Amazing cloud walk @ mhaismal.....


खरां....खर्रा.....छा..न... पा..ऊ...स.....


मेनोपॊजच्या ताणलेल्या प्रत्यंचे मधुन बेभान सुटणारे भावनांचे तीर सैर...भैर.... !


Feeling totally lost in the Auro valley....
like Alice in the wonderland.....


ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ....
जरा हट के ...जरा बच के...
ये है बॉम्बे मेरी जान......


गांदी जैन्ति, दश्रा, बक्री यिद.....
शाळंला मोप सुट्य़्या.....
पोरास्नी लैचं गोंदळ केला वं !
येकान गड्याळ बिगडवल...येकान
घरबर बान मारले...येकान शाईं सांदली...
त्ये बगा खुळ घरातच साइकल चालवतया....आन ह्ये बोद्र बगा कुक्काराशी खेळतया....आरं हात मोडल माज्या राजा...
......
काय कराव या लेक्रास्नी सम्जनाच जाल वं ?
येकाची माय आजारी त येक़ाचा बाप....त्या दोगाचा त बाप जात राह्लेला....आन बाकीचे तर बिन बापाचेच जनू....
" तुमाला म्हनू सांगत्ये नरुभोउजी...
माय बापा बिगर काय बी खर नाय बगा या दुनीयेत "
...........
आरं ये मुडद्यानो किती आरडत़ारं ?
बसा की गूमानं...
आता ही बगा आली...आप्पीशी...
पाच वर्सा खाली लगिन करून द्येल...यक पोरगी हाय....
आन आता म्हनती नांदत न्हाय...
दुस्रा दादला बगते ओंदा.....
बाईच्या जातीला बरं हाय का ह्ये वाग्न?
"अग ये..बाजारबशवे व्हय तिकडं..."
..........
च्या ग्येता नरुभोउजी ?
....
..
.
आता बया...या शिन्च्यानी कवाशिक
नळ सोडला की ?
आरं द्येवा...काय चिखुल जाला वं सर्वे पत्तुर.....
इस्वरा..आता तूच बग...
अश्शी भसा-भस्सा कमळं उग्त्याल या रेंदाडातुन....
तुमी बगाचं भौजी...आन नाइ उगली ना त आपन 'हात' तोडुन द्येनार...
हां...सांगुन ठीवते भौजी....
नाव हाय आप्ल सोनुबाय !



....
..
.
आता बया...या शिन्च्यानी कवाशिक
नळ सोडला की ?
आरं द्येवा...काय चिखुल जाला वं सर्वे पत्तुर.....
इस्वरा..आता तूच बग...
अश्शी भसा-भस्सा कमळं उग्त्याल या रेंदाडातुन....
तुमी बगाचं भौजी...आन नाइ उगली ना त आपन 'हात' तोडुन द्येनार...
हां...सांगुन ठीवते भौजी....
नाव हाय आप्ल सोनुबाय !


गेल्या १५ दिवसांपासून अखंड चालु असलेल्या निवडणुकीच्या तप्त गदारोळावर शुभा मुदगलचा
यमन रागातील 
आजचा सुखद गारवा......
...नेहा कैसे लागा मोरा....
.
यमन रागातील 
         .नेहा कैसे लागा मोरा....



Festival shopee exhibition.
Madam..please हे बघा जास्वंद तेल...केसां साठी अगदी छान...
पांढरे केस काळे होतात आणी
काळे केस काळेच राहतात.......
Excuse me madam...हे हर्बल oinmemt...टाचा, गुडघे, कंबरदुखीवर फार उत्तम...
specially पन्नाशी नंतर तर खुप effective...........
1 minute please madam....
हा हिमालयातल्या वनस्पतीनचा काढा
रोज सकाळी 2 चमचे घ्या....तुमचं वजन 3 महिन्यात कमी नाही जालं तर बघा....
Madam...madam..... हे रामदेव बाबा काजळ....सकाळ-संद्याकाळ रोज वापरा...डोळ्याचा नंबर कमी होत होत चष्मा कायमचा जातो........
नजरेच्या एका फेकीत समोर्च्याचं असं माप काढत जर कुणी marketing करत असेल तर कोण शहाणी ह्यांचे products घेईल ?
आचरट कुणीकडचे unsure emoticon... unsure emoticon.... unsure emoticon



जी करता है की इस बहाव मे
ऐक बुंद बनकर घुल जाऊ.....
और 
इन आदीम चटटानोके पैरो तले 
लीन होकर बहते हुए.....
असीमित हो जाऊ !
............... अजंता.



आता बया..बया...बया.........
काय त्यो येक बाप गेलान आन दोगबी पोरं अकशी उगडयावरचं पडली की वं !
येक सुकलं....तर येक वाळलं कीरं देवा.....
लयी वंगाळंच जालं बगा.....
नरेंद्रा....आता तुच हायीस रे लेकरानी.....
बग बाबा.....समदी आपलीचं हाईत नवं ?



नांदी.....
झोकदार रंगीत स्वागत मंडप...स्वागतोत्सुक यजमान...
नटलेला प्रशस्त hall...trendy रेशमी सळ-सळ...सुगंधी दरवळ...
खच्चुन नटरंगी गर्दी...मुहुर्ताची वेळ समीप...उत्साह तुंबल्या सारखा.....
Ac, पंख्यांची घर-घर...खुर्च्यांची सरकवा सरकवी...
चौफेर पाहुण्यांची कलकल...घुमणारे चढ्या आवाजातील संस्कृत मंगलाष्टकं...
लग्न लागलं !
........
ढोल-ताशा-शहनाईची गोळीबंद सुरावट...बाहेर तड-तड फटाक्यांची माळ...
माईक वरुन प्रेमळ सुचनांचा भडीमार...
थर्माकोलच्या बॊल्स सारखी इस्ततः पांगलेली गर्दी...
कोणाचाही ताळमेळ कोणालाही नसलेला उत्साही...आंनंदी...सनातन कोलाहल !
आणी स्टेजवर आवरु-सावरु हसु बाळगत अभिनंदनाचा वर्षाव झेलणारे...
अवघडलेले नवपरिणीत वधु-वर.....
खरचं आयुष्यातल्या " नांदा सौख्यभरे " या नाटकाची या पेक्षा उत्कृष्ट नांदी कोणती बरे असु शकेल ?
smile emoticon !


In reality, how does it matter about how you look and what you wear in some distant XYZ's wedding?


सत्यम...शिवम्....सुंदरम.....
...a disfigured Yakshee ...
...a pristine Shiva ....
...a blessed Matruka .....
at National Museum.


Inspite of the rains... The Bachatgut Exhibition turns out a good success.....Thank you all !


गंगा आरती...हरीद्वार....
एक आर्त करणारा अनुभव !
रंगविभोर संध्याकाळ...साक्षीला चंद्र...शंखनाद...घंटानाद...
पुर्या आसमंतात गुंजणारी loud speakerवरची,
परिचीत चालीची एकमुखी गंगा आरती !
उजळलेल्या सहस्त्रज्योती...पाणावलेल्या लाखों नेत्रज्योती...
आईच्या ममतेने सर्वांना सांभाळत-जपत, अविरत-अखंड खळाळणारी गंगामैया...
हुरहुर लावणार्या दिव्यांनाही स्वतःबरोबर अनंताकडे नेणारी सुवर्णगंगा......
पावला-पावलावर पंडेगीरिचा कितीही बुजबुजाट असलातरी
अंतरबाह्य ढवळुन टाकणारा एक ओलाचिंब अनुभव...
स्वतःच्या हाताने गंगा आरती करुन जन्माचे सार्थक झालेल्या
परप्रांतीय आज्जीनी उन्मळुन माझ्या खांद्यावर मान टाकत
अश्रुंना काय वाट करुन दीली व मला पार पुर्वजांच्या आठवणीत भिजवुन टाकले !


Crafts Museum...Delhi.
Its THE PLACE for all the art and craft lovers.....
A classic collection of Indian textile & hand embroidery etc...
Amazed by Indians uniformity in diversity...
A traditional architecture is bestowed by lovely banyan trees and a vibrant open gallery for craft demonstrations by various artists!
Could not control my laughter when a bengali artist sang a bengali song about 9/11 displaying his scroll painting about it !
...believe me Indians rock !



Forest Research Institute.
More than a century old
premier institute of India...
...a must see in Dehradun.
Sprawling green campus...
Pleasingly calm n quite...
Majestic architecture...
Impressive museum of Indian sub-continents diverse forestry and its products...
..a camphor tree...
..DNA of mango tree...
..a massive section of 704 yrs old Deodar tree...
..a popular location for film shootings with absolutely lazy canteen .


Awesomely kaleidoscopic Hauz Khas Village....
..हाय मर ज़ावां.....


आमची माती...आमची माणसं....
Felt absolutely at home at Kutub Minar and National museum ! smile emoticon
..ruins of Mughal architecture...
..lovable Yaksha from Pitalkhora...
..miniature paintings depicting Malik Amber...and Aurangazeb (?)



Oh..what a breather...
. . . . . . . . .
..The all round legend...
..The handsome royal....
..The ephemeral beauty.....
..The king of romance......
..enjoying being at right place !

Still haunted by Auro valley...
Har ki pairi....
Rishikesh....


Speechless.....
with moist eyes.......
Ganga Aarti at Har ki pairi.
Haridwar.

क्षणाक्षणाला...कणाकणाने....
उगवणारे सुर्यबिम्ब...डोळयात पाणी येई पर्यन्त बघत रहाणे.....
एक अंतर्मुख करणारा अनुभव !



प्रशस्त आमखास मैदानावरील मोठ्या उर्दू पुस्तक प्रदर्शनाला भेट...
संध्याकाळचा गारठा...अंधार...तरीपण बर्यापैकी 'मुस्लीमचं' गर्दी...
(मोजके अपवाद)
सर्व वयातील बुर्खाधारी स्त्रियांच प्राबल्य सुखदपणे जाणवण्या इतपत...
प्रदर्शनात धर्मिक पुस्तकांना मिळालेलं
प्राधान्य व पुरुषांचा धर्ममान्य पेहेरावाचा अट्टाहास खटकण्या इतपत..
परिचीत मुस्लीम गाईडचि भेट...
हिन्दू-मुस्लीम-शिक्षण-बेरोजगारी...
ई. अवांतर गप्पा...
...अर्थातंच हातचं राखुनचं
" मॆडम...ये बाबरी मशीद ने बडी दरार
लाई है हिन्दू-मुस्लीम भाईचारे मे...
पार्टिशन के बाद सबसे बडा नुकसान इससे हुवा है "
.......
एक बार ये पूरा समाज educate होने दो
फिर देखो...
पुरी दुनिया के साथ हम कंधे से कंधा मिलाके चलेंगे....
.........
मेडम आपका हिरण्य आप दोनों ने दिमागसे नहीं दिलसे बनाया है...
बहुत अच्छी जगह आपने बनायी है "
थोडेसे फोटो घेउन...३-४ गझलांच्या सीडी घेउन... पुस्तकांसाठी पुन्हा एकदा भेट देण्याचे ठरवतंच परतले ।
grin emoticon21st Century's Grand...Indelible...Coronation Ceremony With A Pinch Of Apprehensions !महापुरे येता...वटवृक्ष कोसळती....तिथे लव्हाळी वाचती !

1 comment:

  1. Apratim...Agantuk....! Ekahi status la photo chi garaj vatat nahi itake chaan varnan kele ahe. Cidco bastand che varnan best ch! 'Bai Aaji D & B' awadli...chotya chotya gosthti madhla tumcha anand amchya paryant jasachya tasa manala bhidto!

    ReplyDelete