पावसाबद्दल व उन्हाच्या चटक्याबद्दल ’ब्र’ ही न काढता जमेल तसा खालमान्या morning walk चालु आहे.
...तर आजच्या walkच्या मध्यावर एका निरस मैदानाजवळच्या चहाच्या टपरीवर ठसठशीत भगवी हालचाल दिसली...निट पाहीलं तर दोन वासुदेव चहा साठी बसले होते. नखशिखान्त dressy...
अगदी नाटकातल्या वेषभुषेसारखं सगळं जिथल्या तिथे...टापटीप...खोटं-खोटं...
तरीही वाटलं की काढावा फोटो म्हणुन विचारलं व थांबले...
तेवढ्यात चहावाला १/२ लिटर दुधाची पिशवी घेउन आला...(बोहनीचे गिर्हाईक दिसतयं)
२-३ फोटो "आहात तस्सेचं बसा...पोज घेऊ नका " सांगत घेई पर्यंत त्यातल्या एका गुटगुटीत वासुदेवाने बघता बघता गप्पांना सुरुवात केली...
मी व्यक्तिशः walkघेतांना गप्पा मारण्या विरुध्द आहे पण म्हटलं गडी जरा वेगळे दिसताहेत थांबु जरा ५ मिनिटं...
" ताई तुम्ही काळे कपडे नका घालत जाऊ " असं म्हणत त्या बाळसेदार वासुदेवाने संवादाची चांगलीच पेरणी केली.
" अहो.. ही पॆन्ट काळी नाही डार्क ब्ल्यु आहे"
" अहो ऐका माझं...काळा कपडा घालायचा नाही...बघा कसा फरक पडतो तो"
आता असं येता-जाता सहजपणे भविष्य सांगुन समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्याची पण एक कलाचं आहे.
आणी हे ’दय़ानेश्वर’ वासुदेव तर ह्यात पारंगत दिसताहेत....
समोरच्याचं राहणीमान..शरीरयष्टी..वयमान..नजरेतली..चमक-उत्सुकता,
बोलण्यातला आत्मविश्वास-सावधगीरी अश्या readingsवरुन व
नेमक्या प्रश्नांवरच्या उत्तरांच्या ठोकताळ्यांवर बरीच खेळी खेळता येते.
बोलता बोलता मनीचे सल- काळज्या जाणुन घेता येतात व शेवटी समोरच्याला त्याच्या जिव्हाळ्याच्या problemsवरचे हुकमी उतारे, दक्षिणा घेऊनंच सांगण्या पर्यन्तची मजल मारता येते...
अर्थात तसे कसब असले तरचं !
तर आजची माझी ह्या वासुदेवांनी वर्तवलेली भुत-भविष्य कुंडलीची झलक...
...ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या..साखर नका खाऊ...
ताई तुम्ही कष्टाळु आहात..तुमचे भाग्य चांगले आहे...
आणी तुम्हाला सांगतो ताई...ऐका...तुमच्या काळ्या केसांनी जे तुम्हाला आजपर्यंत दिलं नाही ते आता हे पांढरे केस देतील बघा..( क्या बात है सफेद बाल !...page 3 to तळगाळ via समाजवाद..हर तरफ आपकेही चर्चे है...) Bravo...
मग आडुन-पाडुन मुलांच्या चौकश्या...
" ताई तुमची मुलं स्वतंत्र विचारांची आहेत...मुलगा स्वतःच्या व्यवसायात खुप नावं कमावेल...तुमच्या घरात कुणाला मोठा अपघात झाला होता नां ? खरं ना ? तुमच्या मुलाला ७-८ नं असलेल्या गाड्यांपासुन जपुन रहायला सांगा...ताई तुमची मुलगी घरची लक्ष्मी आहे बघा..ती आल्यापासुनचं तुमचे दिवस पालटले...हो ना ?
बघा ती तुमचं नाव काढेल...
ताई तुमचं सगळं चांगलं आहे पण तुम्हाला एका महिलेचा नजर दोष आहे बघा...
मी विलाज (ईलाज) सांगतो तुम्हाला...काही काळजी करु नका मी सांगतो तसं करा व तो नजर दोष काढुन टाका...काही दक्षीणा घेऊन विलाज करतो बघा मी..( ताई बधेनात)...
ताई तुम्ही एक काम करा...पाण्यामधे ११ गुलाब व थोडा दहिभात सोडा...बघा लग्गेच फरक होइल...
अहो ताई तुम्हाला काय सांगु...भाताचं एकजरी शित एका माश्याने खाल्लं ना तरी १०० ब्राह्मणांना जेऊ घातल्याचं पुण्य मिळतं बघा...
आणी भाताचं एक शित एकाजरी खेकड्याने खाल्लं ना तरी ५०० मांगांना खाऊ घातल्याचं पुण्य मिळतं बघा...कारण फक्त ब्राह्मण व मांगचं कुणाहीकडे जेवत नाहीत...आपापलं काम करतात व घरी जातात...
ते सांगीतलं तेवढ करा ताई...पुण्य लागेल !
तर ताई तुमचे मिष्टर काय करतात ? एकदा घरी येऊन दृष्टी दोषाचा विलाज करतो बघा...(ताईंच अळी मिळी गुप चिळी)
काही दक्षिणा असेल तर द्या ताई सकाळी-सकाळी..."
" अहो... मी morning walkला आले आहे..माझ्या जवळ काहीचं नाही..तरी बघते पाऊच मधे काही आहे का?
हां हे काय सापडले पैसे..तुमच्या दोघांचा चहा माझ्याकडुन...
१०ची नोट चहावाल्याला दीली..त्यानेही ती ग्ल्ल्याला व कपाळाला लावत समाधानाने खिशात सारली...
बरयं म्हणत राम राम केला व पुढची वाट पकडली.

No comments:
Post a Comment