Wednesday, 20 May 2015

रणशिंग.......

आई गं....हा मे महीना म्हणजे कहर आहे नुसता कहर !
आता विचाराल कश्याचा हो कहर ?
अहो गावभर आंब्यांचा कहर नि घरभर मुंग्यांचा कहर...
बाहेर उन्हाचा कहर तर घरात तहानेचा कहर...
तिकडे लग्नासराई मुळे बैंड बाजा, पाहुण्यांचा कहर तर इकडे कामवाल्यांच्या बिनदिक्कत सुट्ट्यांचा कहर...
आणि आता भरिसभर म्हणजे fb/whatsapp वर स्वतःच्या लग्नाच्या anniversaryच्या notifications/photos चा नुसता कहरंच कहर.
....३०,२५,२०,१०,५,३,२... वर्ष झालि आहेत ना लग्नाला ?
मग टाका की फोटो सुनमुखातल्या आरशातल्यासारखे डोक्याला डोकं लावलेले social media वर...आणि घ्या ढेरसारे likes n शुभेच्छांचे वर्षाव !
लग्नानंतर इतके पावसाळे (उन्हाळे सुध्दा) पाहिल्यानंतर सुध्दा लोक इतके उथळपणे socially romantic कसे काय रहातात बुवा कळत नाही.
एकाने तर मला स्वतःच्या 35 व्या marriage anniversary बद्दल before n after चे 2 lovebirdy फोटो पण send केलेत...आता त्यांच्या माझ्या ओळखिला पण 30 दिवस नाही झालेत हो...आहे की नाही कमाल !
भारतीय लग्न, लग्नसंबंध व अति सार्वजनिकता खरंच एक कोडं आहे.
म्हातारपण आलं तरी अविवेकी व उत्सवी नवरदेवपण संपत नाही हेच खरं!
grin emoticon

No comments:

Post a Comment