Saturday, 30 May 2015

Master Stroke.....

एका नामवंत जाणकार चित्रकाराचे दोन portrait demonstration YKM मधे भर उन्हाळ्याचे ठेवलेले.
जिवघेणा उन्हाळा...प्रचंड उकाडा...लग्न सराइ-सुट्ट्या ऐन बहरात...तरी का ठेवलं कळत नाही.
बहुदा परदेशस्थित चित्रकाराची उपलब्धता असु शकेल.
उन...पाणी...कामवाल्यांच्या सुट्ट्या व इतर अडचणी पार करत धावत पळत पण
बर्या पैकी उशिराच तिथे पोहोंचले.
मस्त गर्दी होती...सुट्टीवर गेलेल्या चित्रकार विद्यार्थ्यांची व चित्रकलेचा छंद जोपासणार्यांची पण !
मुलं गोलाकार खाली दाटीवाटीने बसलेली...खुर्च्याही भरलेल्या व मागे उभे राहणार्यांचीही भरपुर गर्दी.

पहिलं demo already सुरु झालेलं...
demo योग्य तर्हेने दिसेल अशी जागा व खुर्ची आता कशी मिळेल अशी शंका मनात येताच, एकजण म्हणाला
...यानं मॆडम...ती बघा पुढे जागा आहे...
हुश्य ! बरी जागा व खुर्ची मिळाली.
आसपास माझ्याचं वयाचे कलावंत मित्र बसलेले...
मी येण्याच्या आधीच केलेल्या perfect drawing वर चित्रकाराने रंगलेपन सुरु केलेले...पेस्टल्सने!
model..drapery...pose...diffused focus...easel...palette...brushes...colours...pencils....good ambiance !

हसत खेळत, विद्यार्थ्यांना बोलतं करत चित्रकार सराईत पणे रंगलेपन करतोय...
चित्रकाराची model वरची तिक्ष्ण नजरफेक तर ईझलवरचे रंगीत बारकावे...
बघता बघता एका पेस्टल पोर्ट्रेट ने तरल रंगरुप धारण करत सर्वांना चकित केले !
आसपास चित्रकार मंडळीच असल्यामुळे आम्ही दबक्या आवाजात बोलत होतो..दाद देत होतो...

झपाट्याने पुर्णत्वाला येत असलेल्या रंगीत portrait वर कलावंताची पडणारी सावली मला
conceptually फारचं भावली...एखादा फोटो घ्यावा का अशी आपापसात कुजबुज करताचं
शेजारचा म्हणाला ...छान आयडिया आहे मॆडम..तिकडुन जवळुन घ्या फोटो..परत अशी पोज मिळणार नाही.
अरे हो...पण फारचं गर्दी आहे, आणी मी उठले तर माझी खुर्ची पण जाईल ना ?
लगेच शेजारची म्हणाली...मेधा तु नको काळजी करु खुर्चीची...
तुला खुर्ची मिळणार नाही असं कधी होईल का ? dont worry...just go!
Lol... ये हुइ ना बात !



No comments:

Post a Comment