morning walk...
हल्ली चहा सुध्दा न घेता लवकरचं फिरायला बाहेर पडते.
आजचा walk शेवटच्या टप्प्यात आलेला...पाठी लागलेलं उन व चहाच्या ओढीने जरा झपझपचं चाल...
एका नेहमीच्या बंगल्याच्या चार पावलं पुढे गेलेलि, परत मागे फिरले...
मेन रोडवरचा बंगला...गेल्या महिन्या पासुन बंगल्याला जोडुन एक पत्र्याची go-down वजा खोली
उभी राहिलेलि...अर्थातचं बंगल्याची शोभा घालवतं.
एक तरुण कष्टकरी जोडी दोन लहान मुलांना घेउन तिथे रहातिये...
उन्हाळ्याचे काहिलिचे दिवस...पत्र्याची खोली...त्यामुळे चुल बाहेरचं मांडलेली...बहुदा.
रोज सकाळी ती स्त्री मला कधी चहा करतांना तर कधी भाकर्या करतांना दिसते. मुलंही बंगल्याच्या आवारात बिस्किटस, पाव खात बागडतांना दिसतात...नवरा उघड्यावरच्या आंघोळीच्या तयारीतचं दिसतो नेहमी.
बंगला मात्र सामसुमचं असतो. बहुतेक बांधकाम सुरु करायचे म्हणुन रिकामा केलेला दिसतोय.
आज खोली पुढच्या अंगणात एकदम नजरेत भरेल अशी रंगीत चहल-पहल दिसली म्हणुन परत फिरले.
काही लहान मोठे पाहुणे आलेले...चित्रपटात दाखवतात तसं चुली भोवती लंब गोलाकार मंडळी बसलेली...
मस्त पैकी उन-सावली अंगावर घेत..निवान्त गप्पा मारत... चहा बिस्किटांचा आस्वाद घेताहेत...
ती स्त्री अर्थातचं चुली जवळ !
झाडातुन झिरपलेल्या कवडश्यांसारखं कौटुंबीक वात्सल्य सर्वत्र व्यापलेलं...पाहुन फार बरं वाटलं.
" तुमचा फोटो घेउ का? फक्त हलु नका...असेच बसा....काय दादा...आज पाहुणे वाटतं ?"
" पावने नाही हो ताई....आई-वडिल आहेत...कालचं गावाकडुन आलेत"
" अरे हो...आपल्याकडे आई-वडिल पाहुणे नसतात नाही का ? छान...धन्यवाद"
कुठल्याही परिस्थितीत आई-वडिलांना पाहुणेपण न देणारा भारतिय कुटुंबव्यवस्थेचा एक लोभस व
हळवा कोपरा....
अतिथी देवो भव...म्हणत जगाला सामोरं जाणार्या भारतियत्वाचं बिज आई-वडिलांना पाहुणे न मानणार्या ह्या मानसिकेतेत नक्कीचं आहे.

No comments:
Post a Comment