मित्रहो !
आपण सर्वच जणं भारताचा स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन सर्व धर्मभेद -जातीभेद विसरुन एकत्रीतपणे उत्साहाने साजरे करतो . पण आपली मातृभुमी व कर्मभुमी असणार्या महाराष्ट्र राज्य दिना साठी मात्र आपण कधीही आजपर्यंत एकत्र आलो नव्हतो...येत नाही.
संपुर्ण जगात भारत देश अतिशय सहिष्णु देश म्हणुन ओळखल्या जातो तर त्यातलेचं एक अत्यंत प्रगत व सहिष्णु राज्य म्हणुन आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे.
प्रत्येकालाचं आपल्या मातृभुमीची स्वाभाविक आंतरिक ओढ तर असतेच
पण ज्या भुमीवर आपण आपल्या यशाची...भरभराटीची मोहर उमटवत असतो त्या भुमीचा
आपल्याला मनापासुन आदर व अभिमान असतोचं ना ?
तसं पहायला गेलं तर आपापल्या कर्मभुमीच्या..गावाच्या..शहराच्या यशोगाथेत प्रत्येकाचाचं स्वतःच्या कर्तृत्वाचा खारीचा वाटा नक्कीच असतो.
मग त्या कर्मभुमीच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेचं ’महाराष्ट्र दिनी’ आपण का बरं एकत्र नाही यायचं?
का नाही काही क्षण उत्सवी वातावरणात व आनंदात घालवायचे ?
का नाही आपल्या कर्मभुमीच्या भल्या साठी विचारांची देवाण-घेवाण करायची?
शेवटी या मातृभुमीचे-कर्मभुमीचे आपण काही तरी देणं लागतोचं...नाही का ?
त्यामुळेचं सर्वांना ह्या ’महाराष्ट्र दिनी’ एकत्र आणावं या उद्देशाने प्रेरीत होऊन
'Hiranya Foundation' ने ’अभिजात महाराष्ट्र’ हा संगीत संध्येचा कार्यक्रम
हिरण्य रिसॊर्ट्सवर १ मे २००१४ ला आयोजीत केला होता.
औरंगाबाद सारख्या ऎतिहासिक व महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हे बिरुद मिरवणार्या नगरीचा
संपन्न वारसा जतन करण्यासाठी व तसेच शहराच्या उज्ज्वल भविष्याचं नियोजन करण्यासाठी
सर्व औरंगाबादकरांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे हे जाणुन CMIA, CII, AH & RA च्या सहकार्याने
हा अनोखा संगीत सोहळा यशस्वी झाला.
आणी आश्चर्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात this was the first time where
people from all walks of life came together and celebrated the ' MAHARASHTRA DAY ' like this !
So we are the pioneers !
Three cheers for Aurangabad...Aurangabadies...and Hiranya !
आणी सगळ्यांना सामावुन घेण्यासाठी संगीता शिवाय दुसरा कुठलाही harmonious पर्याय आमच्या पुढे नव्हता.
’ अभिजात महाराष्ट्र ’ या संगीत संध्येचा शुभारंभ
पं. नाथराव नेरळकरांचे शिष्य कुलभुषण कहाळेकर व चमुच्या दमदार महाराष्ट्र गीताने
व इतर सादरी करणाने झाला.
तदनंतर पं. अतुलकुमार उपाध्ये-(व्हायोलीन) व पं. मुकेश जाधव-(तबला) ह्यांच्या जुगल बंदीने
ही संगीत संध्या अविस्मरणीय केली.
टिपेला पोहोंचलेला उन्हाळा असला तरी हिरण्य व्हॆली मधली सु..ख..द..संध्याकाळ.....
मऊशार गार लॊन्स...समोर अभेद्य देवगीरी...पाठीशी ऎतिहासिक तलाव...
कानाशी धबधब्याची गाज...बाजुंनी डोंगर...निरभ्र टिप्पुर आकाश...
आणी त्यात सोने पे सुहागा म्हणतात तसं पं.अतुलकुमार उपाध्येंचं अलवार व्हायोलीन व
पं. मुकेश जाधवांचं सिध्दहस्त तबला वादन...
अहाहा...आसमंतात गुंजणार्या स्वरलहरींवर श्रोतेचं काय पण वृक्षवल्ली पण फिदा झालेले...
फक्त श्रोत्यांनाच नाही तर गायक-वादकांनाही एक समृध्द व रोमांचकारी अनुभव देणारी
ही मैफिल संपु नये अशीच वाटणारी...
पुढच्या वर्षीचा शाश्वत वादा करतंच संपन्न झाली !

No comments:
Post a Comment