३ आठवड्या पुर्वी एका संगीत महोत्सवात एका वयस्क गृहस्थांचा उल्लेख मराठवाड्यात पहिला Music Orchestra सुरु करणारे L R Deo असा केला गेला आणी अचानक ट्युब पेटली आणी त्या व्यक्तीला नीट पाहिलं तर लक्षात आलं की हे तर लक्ष्मीकांत देव ! Friends Orchestraवाले !
लक्ष्मीकांत देव, माझ्या शाळकरी दिवसातल्या औरंगाबादच्या अनेक गणपती उत्सवात सादर होणार्या Friends Orchestraचे अनभिषिक्त सम्राट.ह्यांना आणी ह्यांच्या Friends Orchestraला ओळखत नसेल असा त्या काळातील( ७०चे दशक) एकही औरंगाबादी मध्यमवर्गिय माणुस नसेल!
गणपति अगदी येउ घातलेले...मीही कोटला कॊलनीतल्या गणपति उत्सवाच्या रम्य आठवणीत रमलेली.
२ दिवसात देवकाकांचा मागोवा घेत मी त्यांच्या पर्यंत पोहोंचले.
Orchestra मधील त्यांचे जुने सहकारी नागेश माटें बरोबर देवकाकांच्याच घरी(लेबर कॊलनी) ठरवून भेटलो.
खुप गप्पा मारल्या...सुरम्य आठवणीत दोघंही खुप रमले.
कुणी तरी आवर्जुन गत सुरांची ओळख सांगत...शोधत आलं ह्याच त्यांना अप्रुप वाटलं...
अहमिकेने गोड-कडु आठवणी सांगीतल्या...थोडी तुमच्या मुळे-माझ्यामुळे अशी खड-खड ही झाली पण
तीही संगीताच्या प्रेमापोटीचं !
देवकाका मुख्य organizer तर माटेकाका music director म्हणुन Friends Orchestra ची धुरा सांभाळत असत.
मला खरंतर आजही गाण्यातलं फारसं कळत नाही आणी ४० वर्षांपुर्वी म्हणाल तर आनंदच होता.
सपनों की रानी किंवा बेदर्दी बालमा समजायचं वय नव्हतं पण फक्त रेडियोवरचं ऐकायला मिळणारी
बिनाका गीत मालेतली लोकप्रीय गाणी स्वतःच्या डोळ्यांसमोर इतक्या झगझगीत रुपात ऐकणं..बघणं...अतिशय रोमांचीत करणारं होतं.
आम्ही सर्व कोटला कोलनी वासिय आमच्या कॊलनीतील हा orchestra अगदी झपाटुन बघायचो.
आणी प्रयत्नांची शिकस्त करुन हाच orchestra परत परत दुसर्या वसाहतींमधे, कोलनीजमधे जाऊन रोज बघायचो...गणपती उत्सव संपेपर्यंत literally we used to follow their time table !
कोलनीतल्या २-३ मोठया मुली आम्हा ७-८ मावळ्यांना हाताशी घेउन टोळी करायच्या...
कसंही करून...रडुन पडुन त्यांच्या - आमच्या आई-वडिलांना पटवायच्याचं !
मोठ्या हिंमतीने या orchestra ला रोज रात्री कुठे ना कुठे तरी हजेरी लावायचा छंदच जडला होता आम्हाला.
मध्यरात्री कार्यक्रम संपल्यावर अक्षरशः जिव मुठीत घेऊन पायी घरी परतायचो...चुपचाप!
( पालकांच्या जीवाचा घोर- बीर आज कळतो)
त्या काळातले गणपती उत्सव म्हणजे एक नशा असायची नशा !
आणी त्यात आपल्यातल्याच माणसांनी सादर केलेला रंगारंग-चकाचक Friends orchestra म्हणजे तर ultimate थरारंच असायचा ! कॊटला कॊलनी सारखी मोठी कॊलनी....प्रशस्त मैदान...देवकाका सुध्दा झुकतं माप देत आमच्या कडे शनिवार- रवीवार कार्यक्रम ठरवायचे...अलोट गर्दी व्हायची!
मैदान खच्चुन भरायचं...गच्च्यांवर गर्दी व्हायची...बाहेरची टपोरी पोरं चिंचेच्या झाडावर चढुन बसायची...
अख्या गावात चर्चा व्हायची !
देवकाकांची B& C मधली draftsmanची नोकरी. पुण्याच्या सुहाचंद्र कुलकर्ण्यांचा औरंगाबादेतला तुफान यशस्वी orchestra बघुन देवकाका इतके inspire झाले की पुढच्याच वर्षी १९६४ ला त्यांनी स्वतःच्या orchestra चा नारळ फोडला.
लक्ष्मीकांत देव, नागेश माटे, खरात पॊल व भरत दुगम असे ४जण founder member असलेल्या ह्या orchestraचा पहिला प्रयोग B & C मधे २५ रु. मानधनावर झाला. (सगळ्यात मिळुन)
नंतर P & T, publicity office, irrigation office, तसेच गुलमंडी,शहागंज बसस्टॆन्ड, गांधी पुतळा ई. सार्वजनीक ठीकाणी सलग १० कार्यक्रम झाले.
जवळ पैसा नाही...मानधन नसल्या सारखंच...
सगळे कलावंत मध्यम-मध्यमवर्गीय, नोकरदार पण खुप हौशी व झपाटलेले संगीत प्रेमी होते.
Brook bondच्या डब्याला उंच काठी लावुन..वादी ताणुन तयार केलेलं बेस वाद्य बघायला प्रेक्षक स्टेज वर कौतुकाने यायचे, तर बांबुला खाचा पाडुन त्यावर कंगवा फिरवत छचक...छचक...छचक....आवाज काढत म्हटलेले ’मेरे सामने वाली खिडकी मे...’हे गाणं हमखास once more घ्यायचं.
पहिली २ वर्ष स्त्री गायिके शिवायच काढली नंतर मात्र लतिका पटील या गाय़ीका म्हणुन लाभल्या.
१९६५ नंतर ह्या orchestra ने जोर पकडला. खुप कौतुक झालं. गणेश उत्यवात रोज २-२ प्रयोग होत.
संध्याकाळी ६ ते ८.३० व नंतर ९ ते मध्य रात्री पर्यन्त.
देवकाका निवेदन करत व महमद रफी, किशोर कुमार व मुख्यतः मुकेशची गाणी म्हणत.
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा...हे गाणं ते इतकं छान म्हणत की आजही हे गाणं मला तोंड पाठ आहे व माझ्या मुलांच ते आवडीचं अंगाई गीत होतं!
१९६६ला कार्यक्रमात पहिल्यांदा.नृत्य सादर केलं गेल.
शाळकरी वयातली सुनीता काक्रंबे ’वादळ वारं सुटलं गं...’ वर अतिशय सुंदर नृत्य करायची. आजही हे गाणं ऐकलं आणी सुनीता आठवली नाही असं होत नाही.
१९७० पर्यंत ह्याorchestraची कीर्ती सर्वदूर पसरली....
वर्षभर कुठे ना कुठे भरपुर कार्यक्रम मिळत गेले...वाद्य विकत घेतली...चमु वाढवला....
देवकाका-मुकेश, प्रताप कोचरे-किशोर कुमार, बाबु पाटोळे-म. रफी, प्रमोद घाटे लताबाईंच्या आवाजात गायचे तर जहीर नावाचा गायक शमशाद बेगम, उमादेवीची गाणी म्हणायचा. कल्पना नावाची नर्तकी नृत्य करायची आणी औरंगाबादची गान कोकिळा लता मेहेंदरगे होतीच अविट सुरावटीला !
पांढर्या साडीतली लता मेहेंदरगे जेव्हा लताबाईंच्या आवाजातलं आयेगा...आयेगा...आयेगा आनेवाला... हे गायची ना तेव्हां स्टेजवरच्या त्या झगमगाटात साक्षात लता मंगेशकरचं आम्हाला वाटायची !
पुढे ह्या orchestraचे संपुर्ण मराठवाडा व मराठवाड्या बाहेरही कार्यक्रम होऊ लागले.ह्याच काळात माटे काकांनी P & T मधली नोकरी सांभाळत clerinate व saxophone वादनातील राष्ट्रीय स्तरावरील दोन बक्षीसं मिळवली.
लता मेहेंदर्गे, बीना निर्मळ सारख्या पट्टीच्या गायीका, छाया-थापा सारख्या मुंबईच्या नृत्यांगना, जनतेवर गारुड केलेली सिने गीतं....शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, रफिक झकेरिया,कमलाकर सोनटक्केंचं प्रोत्साहन व जनता जनार्दनाचा उदंड पाठिंबा...या सर्व पाठबळावर १९७५ पर्यन्त या orchestraने लोकप्रियतेच कळस गाठला.
नांदेडला सुलोचना चव्हाणांचा व ह्या orchestraचा एकाच वेळेला कार्यक्रम होता..लोकं बाईंच्या कार्यक्रमातुन उठुन orchestraला आली...बाईंनी उमदेपणानी चमुचं अभिनंदन केलं. बिलोलीच्या प्रयोगाला संपुर्ण तालुक्याची जनता गाड्या बांधुन लोटलेली...गर्दी पाहुनचं गायिकेला चक्कर आलेली...
K L Saigal ची गाणी गात सुरु झालेला हा झंझावात मुकेशच्या निधनानंतर (१९७६) थोडा थंडावला.
मतभेद झाले...फुट पडली...वेगळे orchastre निघाले...तेही गाजले...काही जण परत एकत्र आले...
जुन्याचं नावाने पण नव्या जोमाने orchestra परत गाजवला !
पण माझ्या पुरतं सांगायचं तर जो बीत गया वो बीत गया !
माझंही बालवय संपलं...काळ बदलला....
पट्टीचे मेहनती गायक - वादक, मुंबईच्या नृत्यांगना...
जॊनी लिव्हर ही ज्याच्या पुढे फिका पडावा असा तडाखे बंद टाळ्या घेणार्या ’जो..जो..007’ ची मिमिक्री...
clarinet, saxophone,accordion, guitar,Congo-bongo अशी त्या काळी न ऐकलेल्या व पाहिलेल्या वाद्यांसह
हा उत्साही संच जेव्हा काळी पॆन्ट,पांढरा शर्ट,काळा टाय घालुन झगमगीत स्टेजवर सांगीतीक धुमधडाक्यात दिमाखात अवतीर्ण व्हायचा तेव्हा प्रेक्षकांना अक्षरशः अस्मान ठेंगण व्हायचं!
(काळा कोट फक्त organizer व music director साठीच!)
सुहाना सफर और ये मौसम हसी, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तु, मेरा जुता है जपानी,
तोरा मन दर्पन कहलाये, बोल रे पपी हरा(प्रमोद्न घाटे गायचे), रसिक बलमा, आजा सनम मधुर चांदनी में,
तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना,बेदर्दी बालमा तुजको, अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा...
कुण्या गावाचं आलं पाखरू, हे चिंचेचे झाडं दिसे मज, वल्हव रे नखवा हो...ही हमखास वन्समोर घेणारी गाणी तर मतवाली नार ठुमक ठुमक चली,रामा..रामा..गजब हुई गवारे,दिसला गं बाई दिसला,मन डोले तेरा तन डोले(नुस्त्या बीनवर)..अशी चित्तवेधक नृत्य....
जमीनीवर-पोत्यांवर..झाडांवर बसलेल्या हजारोंच्या समुदायाला अक्षरशः खिळवुन ठेवायची.
कार्यक्रमाच्या शेवटी पुर्ण चमुने म्हटलेलं ’ने मजसी ने परत मातृभुमीला’ हे गाणं तर एका सन्नाट्यात रोमांचित होऊन ऐकलं जायचं व डोळे ओलावुनचं संपायचं!
हळु हळु एक सुश्राव्य झगमगाट पडद्याआड जायचा व आम्ही मुलं उदास होऊन घरी परतायचो.
प्रत्येकाच्या मनात घर करणार्या या orchestraची practice २-३ महिने व्हायची. आयोजकांसह सर्व कलावंत मध्यम वर्गिय...पोटाला चिमटा घेऊन GPF मोडुन वाद्य विकत घेणारे...नौकर्या सांभाळुन कार्यक्रम करणारे.
उत्कर्षाच्या काळात एका प्रयोगाचे ग्रुपला २००० रु. मिळत. मुंबईच्या नर्तकीला per show ३००रु, वादकांना २००रु,गायकांना १००रु.द्यावे लागत.
सगळी वाटावाटी करुन आयोजकांच्या हाती काय रहात असेल तर फक्त मोल नसलेली हौस!
गेल्या ५० वर्षात या Friends orchestra चे ५०००वर प्रयोग नक्कीचं झालेत. प्रदीर्घ वाटचालीत खुप सारे कलावंत आले आणी गेले. जे आजही एकत्र आहेत ते आठवणींच्या तारा छेडत दमदार रौप्य महोत्सवी कार्यक्रम करायचं स्वप्न बघत आहेत.
अजुनही अधुन मधुन कार्यक्रम मिळतात...जुन्या-नव्या संचात जुनीचं गाणी सादर करतात व आतून ढवळुन टाकणार्या ’जाने कहां..गये..वो दिन...’ या गाण्याला पुन्हा एकदा once more घेतात !

छान लिहीले आहे. चांगलं लिहिण्यासाठी लागणारी sharp memory पण आहे तुमच्याकडे..
ReplyDelete