ऋषीकेषचा भिकारी समाज सेवा घाट...संध्याकाळची वेळ...
इथे (रायवाळा) आल्या पासुनचं माझी पर्यटना बरोबर ’गांजा’ शोधाची व प्राप्तीची छुपी मोहिम जोरात सुरु आहे. काल हरीद्वारवाले म्हणाले कल ऋषीकेष जा ही रहे हो तो वहां पुछो जरुर मिल जायेगा...आणी इथे तर ऋषीकेष मधला दिवस मावळायला आलेला तरीही काही यश येइना.
बराचसा संशय...थोडीशी सावधगीरी..त्यामुळे सगळेजण ना..ना..करत अळीमिळी गुपचीळी करत असलेले.
मी वैतागलेली. (बरोबरीच्या पुणेरीही बर्यापैकी माझ्या बेधडकपणामुळे धास्तावलेल्या)
हरीद्वार-ऋषीकेष करुन गांजा न घेता यायचं म्हणजे काय ?
महापाप !
सकाळीचं लक्ष्मण झुल्याच्या सुरवातीलाच उघड्यावरच्या विक्रेत्याकडुन चिलीम घेतलेली. राजरोस चिलीमींची उघड विक्री बघुन गांजा इथे मिळायची माझी आशा बळावलेली. पण पुढे हॊटेलवाले, चहा-टपर्यावाले, झाडाखाली बसलेले जटाधारी तापसी,हॆन्डीक्राफ्टवाले..सगळ्यांना चाचपुन पाहिलं पण कुणीही थांगपत्ता लागु दिला नाही.
उलट एक दोन सदगृहस्थांनी सौजन्याने ’मॆडम आप बाहरसे आये है क्या? जरा संभलके..’ असेही सल्ले दिले.
अंधारुन येतयं..परतीचे वेध लागलेले...
आज शांतपणे गंगा आरती करायची म्हणुन आम्ही या घाटाच्या पायथ्याशी आलेलो.
गंगाकिनार्याचे इथले घाट खुप सामसुम...तुरळक तापसी कुठे कुठे आत्ममग्न बसलेत.बहुतांश साधुबाबांच निवासस्थान हे ऐसपैस घाटचं आहेत. एखाद्या कैद्यासारखं अगदी जुजबी सामान बाळगुन असलेले....शंकराचा फोटो-त्रिशुळ-होमकुंड मात्र प्रत्येकाकडे. पर्यटकांची जरा देखील दखलही न घेता जो तो आत्मरत....
हरीद्वारच्या अगदी विरुध्द.
पाण्यात पाय सोडुन, उतरतीचं सुर्यबिंब पहात...गंगेशी हितगुज करत बसलो...
आता इथे नाही तर कुठेच गांजा मिळणार नाही म्हणुन मी जराशी खट्टुचं झालेली.
एवढ्यात तीथे एक तरुण जटाधारी साधु त्रिशुळाच्या कसरती करत आला...त्याला गांजाबद्दल खुणांनीच विचारले तर त्याने वरच्या पायरीवरच्या कोपर्यातल्या वृध्द साधुकडे बोट दाखवले.
लगेच दुडुदुडु पायर्या चढुन अगोचरपणे नमस्कार करुन त्या वृध्द बाबांशी औपचारिक गप्पा सुरु केल्या.
हम-तुम, कब-क्युं-कहांसे ई.....तर साधुबाबा चक्क आपल्या अमरावतीचे निघाले ! मराठी माणुस.
गंगाधर रावसाहेब काकडे...७०च्या पुढचे...थकलेले. गेल्या बारा वर्षांपासुन ऋषीकेषमधेच आहेत.
घर-दार सोडुन खुषीने आलेले.खुप वर्षांपुर्वी शेगावला असेच २ महिने राहीले पण परत घरी गेले.
लग्न-मुलं-बाळं-शेती असा रीतसर संसार केला पण नाही रमले त्यात.
मुलीचं लग्न करुन दिलं, मुलाला शेती दिली आणी घर सोडलं.
गेल्या १२ वर्षांपासुन इथेच आहेत.परतलेच नाहीत.
घरच्यांनाही माहित नाही हे कुठे आहेत ते आणी ह्यांना ही घरच्यां विषयी आता काही माहिती नाही.
" बाबा..घरवालोंकी याद नही आती ? उनके बारे मे नही सोचते हो?"
" बाई...सब अपनी अपनी जगह खुष है! क्या सोचने का ?"
बाबा मराठी बोलायला देखील विसरलेले. पण माझ्या चौकस मराठीपणामुळे त्यांच्या आठवणींच्या तारा नक्कीच झंकारल्या गेल्या हे त्यांचे डोळे बघुनंच कळलं...शुन्यात हरवलेल्या अनोळखी नजरेत ओळखीची चमक आली..विचारात हरवले....
" बाबा..दिनभर ये गंगाकिनारे बैठकर क्या करते हो ? कंटाळा नाही येत ? और खाने का क्या ?"
" वो उपरवाली धर्मशाला मे दो वक्त का खाना सबको मुफ्त मिलता है .सुबह १०बजे और शाम ६बजे...
उतना वहां जाके लेके आता हुं डीब्बेमें...बाकी दिनभर यही पर बैठा रहता हुं...यही पे सोता हुं"
" दिनभर अकेले रहेते हो..किसीसे मिलने को...बोलने को मन नही करता ? "
" अकेला कहां हुं ? ये देखो सामने से मैया जो बह रही है ! दिनभर इसी को देखता हुं.
सुबह-शाम इसकी आरती करता हुं...इसी जल से नहाता हुं...मिला तो अखबार पढता हुं....
भगवान की कृपासे मैया की चरणोंमे रहता हुं...बहुत संतुष्ट हुं."
" थोडे दिन के लियेही सही लेकिन घर जाने को मन नही करता है?"
" जी नही! वहां दिल नही लगता... वहां क्या है ? यहां चौबीस घंटे मैया है आखों के सामने...
चलो... मेरे भोजन का समय हो गया..मुझे जाना पडेगा डब्बा लेके...."
मला गांजाचा विसर पडलेला...एकदा वाटलं बाबांचा घरचा पत्ता निट विचारुन शोधुन काढावं त्यांच्या घरच्यांना...आणी सांगावं की तुमचे श्रीयुत गंगाधर रावसाहेब काकडे उर्फ बाबा इथे ऋषीकेषच्या भिकारी समाज सेवा घाटावर परम संतोषानी राहताहेत/जगताहेत...पण नाही विचारलं पुढे होऊन!
म्हटलं जो तो आपापल्या वाटांनी पुढे जातोय...जगतोय...कुणी संसारी तळ्यात डुबक्या घेण्यात आनंदी आहे तर कुणी परमानंदी निर्झराच्या खळाळात तल्लीन आहे...
I have no right to disturb anyone as per my interpretation !
भगव्या वस्त्रातले, दात नसलेले, वृध्दबाबा डब्बा घेउन काठी टेकत हळु हळु धर्मशाळेकडे निघाले...
त्यांच्या मुलीचा विचार मनात येउन जीव कालवला....डोळे पाणावले....
तरीपण ऋषीकेषच्या निरामय तपोभुमीत वाह्त्या मैयाकडे पहात
उभ्या आयुष्याची संतुष्टी मिळवलेल्या बाबांचा हेवा एक क्षणभर वाटला हे नक्की !
सुर्यास्त झालेला... रेंगा्ळणारी लालीमा ...खाली उतरले...
आसमंतात निरव शांतता...गारं...नितळ...धिरगंभीर पाणी.....
हरीद्वारसारखी आरतीच्या वेळेसची कुटुंबवत्सल सदगदीदता इथे नाही....निशब्दपणे गंगेसाठी म्हणुन गंगेत ओंजळीतला दिप पाण्यात सोडला...
कोरड्या डोळयांनी दुरस्थ होणारं तेज पहात राहिले...
कालचा ओलाचिम्ब तर आजचा हा निर्मम अनुभव...
ही तटस्थता ह्या ऋषीभुमीचाच गुण असेल का ? ही गंगा उत्तर देईल का ?

No comments:
Post a Comment