नोव्हेंबर २०१४...हरीद्वार...
चण्डीदेवी..मन्सादेवी अशी दिवसभराची टिपीकल पर्यटक ’दर्शनं’ करत माझ्याबरोबर्च्या ग्रुपला हाकारत..धापा टाकत’ ’हर की पौरी’ वर संध्याकाळच्या गंगा आरतीची वेळ गाठलेली...तोबा गर्दी !
गंगामैयाचे पायर्या पायर्यांचे दोन्ही तट खच्चुन भरलेत...
तमाम भाविक मिळेल त्या जागेवर हात जोडुन मनोभावे बसलेत...
अंधारुन आलयं...पाण्याजवळ जाणं तर दुरचं पण दुरुनतरी आरती दिसेल का नाही या शंकेने जोरात मुसंडी मारली...
पंड्यांनी बरोबर हेरत आईये...आईये मॆडम..गंगा दर्शन..पुजन कीजीये...
चलो मै आपको लेके चलता हुं...जगह देता हुं..५०० रु. लगेंगे असा व्यावहारीक प्रस्ताव ठेवत चिकाटीने पाठ पुरावा केला व हो-नाही करत १००रु.वर तोडी केली. कुटुंबाच्या, कुळाच्या धन,यश, सुख, शांती, आरोग्य संपदेच्या वरदह्स्ताचे आवाहन गंगेला करत...धक्का-बुक्कीतली so called पुजा करे पर्यंत
पुर्या आसमंताला भेदणारा शंखनाद झाला...घंटा वाजु लागल्या...आणी मग loud speaker वरनं गंगेची आरती चतुरस्त्र गुंजु लागली...सगळं वातावरण स्तब्ध झालं...
ओम जय जगदंबे मा...ही सिने गीताच्या चालीवरची आरती प्रत्येक जण डोळे मिटुन..हात जोडुन अत्यंत एकरुपतेने ऐकु लागले..म्हणु लागले...
दोन्ही तीरांवरचा हजारोंचा संमिश्र जमाव एका असीम भक्तीभावात बुडाला...
निळसर काळं आकाश...लुक-लुक चांदण्या...आमोरे-सामोरे डोंगर...हवेत गारठा...पाण्याचा ओलावा...
पायर्यांच्या टप्प्यांवरचे सह्स्त्र ज्योतींचे तेजोमय अनेक दिप...
दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला अपार श्रध्देने लीन झालेला भारतीय समुदाय...
आणी खाली पायाशी वाहत्या तेजोदिपांनी उजळलेली...रिषीकेशहुन खळाळत येउन
इथे हरीद्वारला शांत व संयत झालेली समंजस गंगा...
इतका भारावुन टाकणारा हा अनुभव आणी दृश्य आहे ना की बघता बघता डोळे भरुन आले...
खरचं गंगेची ओढ नसणारा एकही भारतीय/हिन्दु नसेल... नाही का ?
अख्ख भारतीय समाजमन गंगेपुढे नतमस्तक झालेलं...गंगेच्या दर्शनाने...स्पर्शाने कृतकृत्य झालेलं....
सर्वजण चिंब भारावलेले...
पुर्वजांना स्मरत...नव्यापिढीसाठी आशिर्वाद मागत गंगे पुढे सगळेचं व्याकुळ झालेले...
अनेकांचे डोळे झर-झर पाझरताहेत..
याची देही याची डोळा या अनुभवामुळे वयस्कांचे आनंदाश्रु कृतद्य़नेते गंगेत विलीन होताहेत...
Just out of the world experience !
जयजयकाराच्या घोषात आरती संपली...क्षणभर एक शांतता मग एकचं धावपळ आपल्या ओंजळीतले ...
द्रोणातले...फुलांतले दिवे गंगेत सोडण्याची !
मीही झेंडुच्या नारिंगी फुलांत विराजमान झालेला एक दीप सदगदीतपणे गंगेत सोडला...
त्याचं माझ्यापासुन हेलकावत...हेलकावत दुर जाणं अक्षरशः काळजाचं पाणी करुन गेलं...
दिसेनासा होइस्तवर टक लावुन पहात राहिले....
थोड्याचं अवधीत माझा तेजोदीप इतर दीपात एकरुप होत सर्वांबरोबरचं आस्तित्वहीन होत
एखाद्या सुवर्णलाटे सारखा अनंताकडे प्रवाहीत झाला...
गंगेत काहीतरी तेजस्वी आनंदाने सोडण्याचा पहिलाचं प्रसंग...आजपर्यन्त हे असं वाहतं पाणी दुःखद प्रसंगाचेच साक्षीदार राहीलेलं...दिवंगत आईवडिल, भावाच्या आठवणीने गलबलुन आले ...
माझ्या दोन्ही आज्यांच्या आठवणीने सैरभैर झाले...
त्या दोघींनाही ह्या हृदयंगम ठिकाणी आणु शकले असते तर कीती कृतकृत्य झाले असते ?
आपण कुठे तरी कमी पडलो या जाणीवेने मनोमन खंतावले.....
गंगेत पाय बुडवले....गार पाणी... क्षणात आपलसं करणारं आणी क्षणात निसंगपणे पुढे झेपावणारं...
माझ्या संमिश्र अश्रुंना सामावुन घेत ही सुवर्णगंगा उमदेपणाने खळाळते आहे !
चांगलं-वाईट, शुध्द-अशुध्द सगळंच आपल्यात ममत्वाने सामावुन घेत ही नदी
अनादीकाळापासुन अखंड वाहते आहे....
हजारों वर्षांपासुन मानवी जीवनाला आपल्या अंगा खांद्यावर खेळवणारी ही गंगा
प्रत्येकालाच आपली आई वाटते !
भुमातेला सुजलाम-सुफलाम करतं तिचं अविरत प्रवाही रहाणं व
शेवटी मुक्तपणे सागराला मिळणं....केवढं गहिरं व वैश्विक आहे हे सगळं !
अखंड सौभाग्यवती तशी अखंड मातृका...
वाकुन पुन्हा पाण्याला स्पर्श केला...It gave me a tremendous sense of belonging !
भारताच्या जीवनवाहिन्या तर हिन्दुत्वाच्या धर्मपोशिंद्या आहेत या नद्या....
गंगा,यमुना,सरस्वती,नर्मदा,क्षिप्रा, कावेरी,गोदा....
माझ्या आजीचं नावं गोदावरी....
स्त्रियांना नद्यांची नावं देण्याच्या भारतीय मानसिकतेला त्रिवार वंदन !
हळुवारपणे पाण्याला पुन्हा-पुन्हा स्पर्श केला.....
ह्या गंगेच्याचं साक्षीने पुर्वजांच्या आठवणीने आर्त झाले....
स्वतःच्या नास्तिकतेला प्रश्न विचारत हळवी झाले...
एका चिरंजीव संस्कृतीची यत्किंचीत भागीदार झाले...
एवढ्या गहिर्या व आर्त अनुभवा नंतर पाय उचलेनात तरी निघाले...
.....आणी काठावरच्या अथांग संसारी गर्दीत गंगेत अश्रु विरघळावा तशी विरघळुन गेले !

No comments:
Post a Comment