Friday, 26 December 2014

ताळमेळ...२०१२ !

~~~ mumbai....exhausted...fatigued by sweating...bombarded by tv serials...virtually having lunch and dinner with serial cast :i so far only vent out is morning walk... continuously greeted by awesomely Z-black mumbai crows

~~~ This monsoon.....everything looks and becomes so... beautiful ! Really these showers are therapeutic....cool!

 ~~~ पाऊस......
औरंगाबामध्ये धो..धो...
मुंबई.. ओलीचिंब...
पुण्यात बरसला...
रत्नागिरीला झोडपले...
बुलडाण्यात दमदार...
कराडमध्ये दिलासा...
सोलापुरात रुसवा...........
ऊफ़........ ये तेरी अदा.......!


~~~ The best Gurudakshina for the Nature, the ultimate guru, is to have daughter!

~~~ In general, 'The Male Species' is more or less foolish and immature!
Surprisingly me and my daughter, both agree with it.

~~~ गाडी पार्क करताना रेडिओ मिर्चीने अनाऊंस केलं....Yesterdays superstar Rajesh khanna no more! Desperate to share it with somebody, i told my teenage daughter about it...
अगं राजेश खन्ना गेला...कोण? अगं डिंपलचा नवरा..ट्विंकलचे वडील...अक्षय कुमारचा सासरा....
ओ..तो ...the one who is in that FAN ad....!
...never mind Rajesh khanna...if thousands are here to cry for you, millions are up there to welcome you!
I am sure you will always sing... kahin door jab din dhal jaaye...for my blue-mood days,
monsoon will be no monsoon without your... bhigi bhigi raton main...
and your.. mere sapanoki rani kab aayegi tu...will accelerate my car automatically!


~~~ पुस्तकं...
१७ ‘ऒगस्ट..."पवित्र कुराण" ची मराठी प्रत खरेदी केली.( मीना प्रभुंच्या तुर्कनामा व इराणी गाथेचा परीणाम!) कुठली लाट कुणाला कधी व कशी भिजवुन जाईल याचा नेम नाही.
रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी एक हिंदु स्त्री कुराण मागत आहे बघून मुस्लिम विक्रेता भरून पावलेला...कारण नसतांना कुराण gift wrap करून दिले.
Reliance timeout( book shop) मध्ये माझी मुलगी काही ( 2 french, 1 german)स्टुडन्सबरोबर गेलेली... हिटलरच्या "मेन काफ़्ह" या पुस्तकाच्या प्रती उघडयावर विक्रीसाठी असलेल्या बघुन ही परदेशी मुलं अक्षरशः हादरली..." हे पुस्तक छान आहे" सारख्या comments ऎकून तर पार कोलमडली.
Good-Bad, Positive-Negative... everything is so subjective!

~~~ एका दैनिकातील कव्हर स्टोरी...
मावळु लागलेले तीन तेजस्वी तारे...
*अटल बिहारी बाजपाई... भारताचे तीनदा पंतप्रधान...अष्टपैलु संसद्पटु... अजुनही कानात गुंजणारे फर्डे वक्तॄत्व...संवेदनशील कवी.....
...पण आज..वय ८८...शारीरिक व्याधींनी जर्जर...हतबल मौन... अनाहूत एकांतवास...राजकारणाशी फारकत...चक्क टिव्ही वरील indian idols ह्या कार्यक्रमात रमतात !

*जॊर्ज फर्नांडिस....कामगारांचा ढाण्या वाघ...अभुतपुर्व रेल्वे संपाचा झुंजार नायक...धडाडीचा नेता....
....पण आज... वय ८२...स्म्रॄतीभ्रंशाने भांबावलेला...सद्य राजकीय व सामाजिक संदर्भ सपशेल हरवलेले...आला दिवस ढकलताहेत !
*दिलीप कुमार...अभिनयातील पहिला सुपर स्टार...ह्यांचा आदर्शाने अनेक पिढया अजुन चित्रपटस्रुष्टीत घडताहेत...सायरा बानो ह्या सहचरणी मुळे सुसह्य परिस्थीती...
....पण आज स्म्रुतीभ्रंशाच्या उंबरठयावरील हा ९० वर्षाचा महानायक भारतीय सिने विश्वाचं व मधुबालेचं कोणतं शब्दचित्र आपल्या आत्मचरीत्रात उध्रुत करेल ?
वयामुळे येणार्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक व्याधी....एकाकीपणा... हरवलेपण...तुटकपणा....
स्वतःबरोबर हितसंबंधीयांना देखील हतबल करणार्या काळाचा महिमा खरचं अगाध आहे.
तारुण्यातील तेजपुंज प्रकाशात हा अंधारा कोपरा फार उदास करतो.मरणाचेही वरदान मिळायला नशिब लागते !

~~~ पाऊस...पाऊस......आणि पाऊसंच !
अख्खं हिरण्य नखशिखान्त चिंब......feel blessed !

my dearest daughter...
when i had you, i never knew that we will be communicating so soulfully and beautifully!
just proud of you.
p.s.this makes me remember my mother very often.

~~~ दिवाळी.....एक अस्वस्थ चैतन्य !
दिवाळीच्या गोडधोडीला balance करणारा माझा morning walk झपाझप...
ठिकठीकाणी स्त्रिया- पुरूष एकमेकांना भेटताहेत...आनंदाची देवाण- घेवाण करताहेत...घरी जाता जाता दुध, भाज्या, पेपर, दिवाळी अंक, पणत्या ई. विकत घेताहेत.....
Everything is so cheerful and optimistic !
पुढच्या कोपर्यावर देशी दारूचे दुकान...रया गेलेलं...त्याहुन रया गेलेली माणसं दुकान उघडण्याची वाट बघत खोळंबून निशब्द उभी आहेत...३६५ दिवसातला एक दिवस ढकलण्यासाठी.....
जी काय हालचाल होईल ती दुकान उघडल्यावरचं !
अजुन पुढे मेन रोडवर रंगीत कचर्याचे अनेक ढीग...कचरा गोळा करणार्या अस्ताव्यस्त बायका उत्साहात कचरा उपसताहेत...
हाती काही चांगलं मोल देणारं लागेल या आशेने स्वतःचं कचर्यागत होताहेत...
बंगल्यातल्या ललना लगबगीने घरातील कचर्याच्या बादल्या हसून त्यांच्या समोर उपडया करताहेत....
जो तो आपापल्यापरीने दिवाळीचा आनंद घेतोय...शोधतोय ! फक्त प्रत्येकाची आनंदाची व्याख्या मात्र वेगळी.

१५ औगस्ट.....

.....पोळा...पतेती....ईद.....अख्खा बाजार up to 50% off मध्ये available...आणि निम्म औरंगाबाद रस्त्यावर...
since my daughter is leaving for france for a year, we are at PROZONE (asias biggest mall). चक्क सामसुम....
mufti, just,biba,riot,seven east...अश्या अन आकलनीय नावं असलेल्या दुकानात इंग्लीश गाणी अखंड थयथयाट करताहेत...सेल्सची तरुण पोरं धावत येउन ओढुन ताणुन इंग्लीश मधुन माल खपवताहेत (सौजन्याने)! तरुण मुली विवाहीत स्त्रिया सेल्सगर्लच्या shirt- pant ह्या uniform मधे अवघडुन स्मित देताहेत...भर श्रावणात आपल्या सुनांना अश्या कपडयात नोकरी करतांना बघुन सासवांचा जीव कीती वरखाली होत असेल नाही ?

नेहमीप्रमाणे girl friend-boy friendचा  (gf,bf) सुळसुळाट....changing room मधे मुली अखंड trials घेताहेत...पोरं त्यांचे कपडे आनंदाने  ( पण मनातुन खरंच खूप कंटाळलेले)हाता खांद्यावर सांभाळत खाली माना घालुन उभे आहेत...(हो उगाचं कोणी ओळखलं तर!) नजरेनीच पसंती नापसंती विचारली, सांगीतली जात आहे...मी तर हा सीन खुप enjoy करते....
पुर्वीच्या काळी जशी दिव्व्याची  शिक्षा होती तशीच ही हल्लीच्या पोरांना मिळणारी changing room punishmentचं वाटते !मला. बिच्चारे !

but boys n guys you deserve this! कोणे एके काळी नाही सीतेने रामासाठी अग्नीपरीक्षा दीली? आणी अजुनही सुयोग्य(?) वरप्राप्तीसाठी मुली नाही का स्वतःला दाखवुन घेत!
गोरररररं   आणी छा.....न दिसण्यासाठी काय वाट्टेल ते करतात त्या बिच्चार्या!

वर.. खाली... हे दुकान..ते दुकान....खराखुरा कंटाळवाणा  व पायपीटीचा experience !
~~~ OMG ! Had a tough and hilarious time while watching and explaining the crazy song ...
ruk jana o janaa.....from film " WARRANT" and many more run around the trees love songs to the Rotary Youth Exchange student...( 15 yr old french boy )
~~~ Historic Aurangabad rock cut caves...
beautiful mountain range....
a splendid view of sprawling Aurangabad...nestled in purple mountains....
multi colored sky scape as a back drop....
longing sun set...
one more reason to fall in love with Aurangabad !



No comments:

Post a Comment