नुकतीचं ईद झालेली....शहरातील जुन्या/मुस्लीम भागात सणा निमीत्य भरलेल्या मीना बाजारात चक्कर...
दरवर्षीप्रमाणे ! मिळाले तर लखनवी,अलीगढी,सुरमे तसेचं पाकिस्तानी भरतकाम केलेले stolls घ्यावेत म्हणुन गेले...
शहरीकरण...मॊल...अश्या अनेक कारणांनी आकसलेला बाजार...गाववाल्यांचीचं फुटकळ दुकानं....
तरी पण ईदी मुळे व येऊ घातलेल्या श्रावणा मुळे बाजार रंगलेला...
दुतर्फा दुकानं कम हातगाड्या...फळांचे खच...ड्राय फ्रुटसच्या राशी...शेवयांचे ढीग....
जाळीच्या टोप्या..कपडे..दागीने..बांगड्या..भांडी..क्रोकरी....
निमीत्तानेचं खरेदी करु शकणार्यांसाठीचं आहे हा संसारी बाजार...घासाघीशीला भरपूर वाव....
सुरमे...अत्तरं एकाचं ठीकाणी !
म्हटलं गाठ आपल्याचं डोळयांची आहे जरा कमी जास्त बघुनचं घ्यावेत सुरमे...
चाचाजींना विचारलं तर त्यांनी लगेचं २-४ सुरमे समोर ठेवले....
..." ये है कडवा सुरमा... आखोंको कुछ तकलीफ़ है तोहीच कब्बी कबार लगानेका...
और लगाने के बाद २०-३० मिनट बाद आंखे धो डालना...और ये है मिठा सुरमा...
रोज लगाओ मेकअप की तरह..कुछ problem नही. और ये है हमने घरमे पीसकर बनाया हुवा मिठा सुरमा...
loose मे है...ये देखो इसके चमकीले पत्थर...अफ़गानीस्तान मे मिलते है..२०रुपीया तोला...
लाओ सुरमादानी भरकर देता हुं सुरमा आपको "
..." अरे..मेरे पास तो सुरमादानी नही है...फ़िर? "
..." वो चंपा मत्जीद के पास बर्तनोंके भौत दुकाना है..वहा मिलेगी "
..." ठीक है लेके आती हुं फ़िर सुरमा लेती हुं "
चंपा मत्जीद म्हणजे जुन्या औरंगाबादेतलं पाकीस्तान...
पायपीट करत..दुकानं शोधून.. एक छान मोरादाबादी सुरमादाणी घेतली...चाचा कडुन सुरमा भरुन घेतला.
कसा लावायचा तेही त्यांनी दाखवलं..मला अवघडवत माझ्यावरंच प्रात्यक्षीक...
..." पैले दायी आंख फ़िर बायी आंख...फ़िर दायी...कब्बीबी ३ बार लगानेकाचं..अच्छा रैता है...
... और कब्बीबी दायी आखं पैले..समझे ?"
..." Ok...अब ईतर दिखाना..."
..." कौनसा दिखाऊ ?...Hard वाला या Soft वाला ?"
..." दोनो भी दिखाओ"
हार्ड ईतर म्हणजे chocolate..strawberryच्या वासाचे दर्प...तर सॊफ़्टईतर म्हणजे केवडा..मोगर्याचे सुगंध.
..." किसी किसीको हार्ड ईतर से सिरदर्द होता है.. ( मना पासुन पटलं ) आप ये सोफ़्ट ही लेके जाव.
एकदम आठवलं बाबा नेहमी अत्तर गल्लीतुन अत्तर आणायचे..ज्न्नतुल फ़िर्दौस नावाचं.
गंध विसरले पण नाव नाही...
..." चाचा जन्न्तुल फ़िर्दौस है क्या ? वोहीचं देना...चलो.. अच्छा.. ईद मुबारक."
.." हां..हां आपको भी "
दुपार झालेली...गर्दी वाढलेली..मुस्लीम-हिन्दु सरमिसळुन खरेदीत दंग...
बाजाराच्या शेवटाला २-३ चहा-भजीच्या टपर्या...बाकी ओळीने चिकन-मटनाची अनेक दुकानं.
उघड्यावरंच टेबलांवर गौर-गुलाबी ‘पायाळू’ कोंबड्या निश्चेष्ट.....
तर त्यांच्याच वर फासळ्या दाखवत बकर्या/ बोकडं निष्प्राण होऊन लटकलेली....
वास..माश्या...गलिच्छ फडकी...दबा धरुन बसलेली बेरकी स्वच्छ मांजरं...
रक्ताळलेल्या कत्त्याकडे (कत्ता..कत्तल..chopper ! ) निस्तेज डोळ्यांनी बघत...
दबक्या आवाजात क्वॆक..क्वॆक..करत जागच्या जागीच विझणार्या कोंबड्यांचे मरण पिंजरे....
राम...राम..रामरामरामरा.मरा..मरा...मरा !
चलो जाने दो !
अरे हे काय ? ह्या लटकलेल्या बकर्यांच्या शेपट्या अश्या गाईं सारख्या लांब कश्या काय ?
अरेच्या ! ही तर गाई-म्हशींची बछडीचं आहेत वाटतं !
Oh..‘MY’..God...!
गाईंच्या कत्तलींचा पुसटसा उल्लेख जरी कुठे झाला तरी मला प्रेमचंदांच ‘गोदान’ आठवल्या शिवाय रहात नाही.
प्रेमचंद अश्या मटनमार्केट मध्ये कधी फिरले असतील का ? ह्या खाटकांनी ‘गोदान’ वाचलेलं असेलं का ?
पुस्तकं वाचून कुणी सर्व सामान्य बदलू शकत असतील का ?.........
...रस्ता संपला !
चलो..छोडो ये बातें...यही है जिंदगी !
यहां कडवा-मिठा सब मुबारक होता है !

No comments:
Post a Comment