Wednesday, 23 July 2014

विलंबीत योग...

तणावग्रस्त मौन संपलं की,
अगदी हलकं-हलकं वाटतं नाही........
मग ते पावसाचं पण का असेना !

वियोगा नंतरचा संवाद कीतीही एकतर्फी असु देत.......
अगदी ह्या पावसा सारखा....
तरी पण प्रसन्नंच वाटतं नाही ?

अष्टदिशा झाकोळून....चहुबाजूंनी घेरत......
बघाना...
हा वेडा कधीचा...एकटाचं अंधारात गातोयं.......
घरा - मनातल्या ज्योती मात्र लख्ख उजळवतोय !

सगळीकडे रिपरिप...चिपचिप.....
ओलाव्याने जगरहाटी तात्पुरती कोमेजलेली,
तरी पण ही पहाना...
मनीची शब्दफुलं मात्र अलवार उमललेली ! 

No comments:

Post a Comment