हिरण्यला डोळ्या पूढे ठेवून लावणी सम्राड्य़्नी सुरेखा पुणेकरांच्या ‘नटरंगी नार’ च्या फक्त
महिलांसाठीच्या कार्यक्रमाला हजेरी....
१०-१२ वर्षांपूर्वी हा कार्यक्रम पाहिलेला व खुप आवडलेला देखील ! आता आयोजकाच्या भुमिकेतून बघावा
म्हणुन आवर्जून गेले....
स्थानीक मारवाडी बायकांच्या सोशल ग्रुप तर्फे हा कार्यक्रम होता....
शाळा सुरु व्हायच्या तोंडावर बायकांना relaxation म्हणुन भर दुपारचा प्रयोग....
फेसबुक वरच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बदनामी कारक मजकुरामुळे पुणे- नगर-औरंगाबाद तणाव ग्रस्त.....
बाई आणी संच अंमळ उशीराचं पोहोंचला....
रंगमंचावर व खाली सभागृहात बायकांचच राज्य...
त्यामुळे उशीर झालेला असला तरी सगळी तयारी हसत खेळत...निवान्त !
ग्रुप मधल्यांचा स्टेजवरचा एकमेकांच्या आदर - सत्काराचा हौशी सोहळा पार पडल्या नंतरचं
International नटरंगी नारचा प्रयोग सुरु....
रीतसर गण-गौळण झाली...संपुर्ण चमुच्या खणखणीत १-२ नृत्य-लावण्यांनंतर सुरेखा बाईंंची
अख्ख्या महाराष्ट्रावर जादू करणारी...या रावजी... बसा भावजी... ही सुरेख बैठक लावणी झाली.
त्यानंतर जवळपास १४-१५ नृत्य-लावण्या झाल्या...
त्यातल्या फक्त ४-५ लावण्याच ओळखीच्या....बाकी सर्व गाणी(लावण्या) बहुदा गणपती उत्सवात गाजलेली असावीत...कारण ती कधीच फारशी एकलेली नव्हती...निदान मी तरी !
मी पुर्वी पाहीलेला ह्या गायीकेचा सुरेल कार्यक्रम व आजचा धडाकेबाज प्रोग्राम ह्यात
जमीन अस्मानाचा फरक होता.
प्रत्येक लावणी-नाचावर TV चा चकाचक परीणाम होता...
ढोलकी पेटी पेक्षा electronic instruments तडाखेबंद वाजत होती...झगझगीत लायटिंग...
कर्कश्य म्युझिक मुळे लावणीचे शब्द पार हरवलेले...
पोनीटेल घातलेल्या...नेट-टिकल्यांच्या so called fancy नऊ वार नेसलेल्या...
एकदम फिल्मी फटाकड्या नाचल्या मात्र दमदार !
नाट्यगृहात बायकांचचं राज्य त्यामुळे प्रेक्षक स्त्रियांनीही टाळ्या...शिट्यां बरोबर वात्रट लावण्यांवर
बेधुंद नाचायची हौस भागवून घेत नाटयगृह डोक्यावर घेतलं.....
....पण मधल्या मधे खरी गाण्यातल्या शृंगाराची...नृत्यातल्या नजाकतीची लावणी मात्र हरवुनचं गेली !
मला वाटतं over a period आपलेही काही ठोकताळे तयार होतात...
लावणी म्हटली की...काठा-पदराचं जरतारी घोळदार नऊवार...
छानसा आंबाडा त्यावर मोगरी-अबोलीचा गजरा...
ठसठशीत कोल्हापुरी कुंकू...मराठमोळे दागीने...हातभर काच बांगड्या...पायात चाळ...
आणी आपल्या लाडीक मधाळ आवाजाने प्रियकरा बद्दलचा राग..लोभ..प्रेम ..द्वेष..शृंगार..तक्रार..
व्यक्त करत ठुमकणारी अटकर बांध्याची नर्तकी...
प्रेक्षकगृहातील सर्वांना आपल्या लटक्या खाणाखूणांनी घायाळ करणारी....
शृंगारीक हावभावांनी हमखास आपलसं करणारी खटयाळ गायिका-नर्तकी !
पण आजच्या ह्या कार्यक्रमात सगळचं बिनसलेलं...शब्दही विरलेले...आवाजही कानकोंडा झालेला...
होत्या फक्त शृंगार मागे टाकून चावटपणा कडे झुकलेल्या लावण्या....
प्रेक्षकांना चाळवण्या साठीचं अंगावर आल्या सारख्या ह्या उधळ-माधळ चटक चांदण्या....
कानठाळी संगीत...भपकेबाज प्रकाश योजना...
बाईंची ३-४ गाणी वगळता सर्व गाणी एका पुरुषाने स्त्री आवाजात म्हटलेली...तरी पण कुठल्याही
गाण्याची-लावणीची शब्दातली खुमारी काना पर्यंत पोचलीच नाही !
खरंतर....‘ झाल्या तीन्ही सांजा....करुन शिनगार साजा..........’...कीती गोड लावणी आहे ही!
तमासगीर स्त्री पुरतं मर्यादीत न राहता कुठल्याही प्रेयसीच्या...जोडीदाराची वाट पहाणार्या स्त्रीच्या भावना
चपखलपणे व्यक्त करणारी शब्द रचना आहे ह्या लावणीची. त्यातली ओळन ओळ
प्रेयसीच्या मनातली सांजवेळची हुरहुर...उत्कंठा...चलबिचल...अधोरेखीत करणारी आहे...
पण प्रेक्षकांपर्यंत ह्यातले काहीचं पोहोंचले नाही.
दिलखेचक नृत्य...लपक-झपक प्रकाश योजना...दणकेबाज संगीत...
ह्या सर्व झगमगाटात मराठी मनाचा हिरवेपणा सांगणारी...
लावणीची शब्दरुपी...नृत्यलयीन... ओजस सांजवात मात्र निष्प्रभ ठरली !
शेवटी तर हा गदारोळ सोसवेना.....
तर सुरेखा बाई....पुन्हा एकदा जुन्याचा नव्याने विचार करा...
सोळावं वरीसाच्या...धोक्याच्या वळणावरच्या या लावणीला जपा....
पाडाच्या आंब्याची काळजी करु नका.... का बुगडी शोधत वेळ घालवु नका...
तुमच्या जरतारी मोरवाल्या पदरात ह्या रेशमी लावण्यांचं गठुडं बांधा...
आणी या की हो बिनदिक्कत नांदायला या !
तर नक्की कराल ना आमच्या वर तुमची मर्जी बहाल ?
Good !
अरे...कुणी तरी बोलवा दाजीबाला.....

No comments:
Post a Comment