सकाळी सकाळी आम्ही तिघंही architect बरोबर हिरण्यला....साडे नऊ पर्यंत काम आटोपलेलं...परतलो.
परततांना मला एक डोंगर रांग कधीची ओलांडुन बघायची होती...
जरा वेळ होता म्हणुन तो डोंगराकडे जाणारा रस्ता पकडला...ऊंच चढण...खडकाळ कच्चा रस्ता...
दौलताबाद-जटवाडा रस्ता...खडकांमधुन गाडीला वाचवत डोंगर पार करत एका विस्तीर्ण खळगा कम मैदानावर पोहोंचलो...अक्षरशः landed in the bowl of mountains !
चहुबाजूचा एकही डोंगर ओळखीचा नाही...मधल्या प्रशस्त पठारावर चिमणपुर..जोगीवाडा..अश्या छोट्या वाड्या...
चिमणपूरवाडी.....अगदी निरव...तुरळक झोपड्या...एकावर एक दगडं रचून केलेल्या....
आसपास गोधडी सारखे मशागतीचे हिरवे-पिवळे चौकोन हिंदोळताहेत.....
रस्त्यावर नावाला देखील माणुस नाही....
मध्यभागी छोटसं उथळ...चकचकीत...बिलोली निळ तळं....एक दोन म्हशी निवान्त पाणी पीताहेत...
काही खडकागत पाण्यात स्थिरावल्या आहेत....
चौफेर तपकीरी डोंगर...थोडे फार गर्द हिरवे ठिपके ल्यालेले....
वरच्या निळाईत शुभ्र ढग पिसागत तरंगताहेत...अप्रतिम सुंदर....एकदम सुशेगात !
मुठभर जीव तिथेचं सोडुन पुढे निघालो...
जोगीवाडा...रसुलपूरा...आई बाबा तांडा...चहुकडुन डोंगरच डोंगर...आजुबाजुला उथळ खोल दर्या..कडे.. कपार्या...कातळ.....
औरंगाबाद पासुन जेमतेम २०-२५ कि.मि. वर...Its so serene and virgin....पावसाळ्यात तर धमालचं असेल.
पुन्हा एकदा औरंगाबादच्या प्रेमात !
तसेच पुढे जात राहीलो...आता शाळा..मंदिर..माणसं...अशी निम शहरी वर्दळ सुरु....
अखेर डोंगरांच्या सोबतीनेचं डोंगर उतरत खुल्ताबादला....हाफीज खलील ह्या मध्य चौकात....
खुल्ताबाद म्हणजे एकदम मुस्लीम वळणाचं गाव...नजर टाकु तीथे मस्जीदी...दर्गे....
चौकात island सारखी मधे कबर...हिरवे पत्रे..झेंडे..जाईचा वेल...पाणपोई....
कडकडुन भुक लागलेली...
चहुबाजुच्या शुध्द शाकाहारी..१०० % शाकाहारी...असा पुकारा करणार्या कॆफॆ साहिल..शिराजी होटेल...
जरजरी परवाना होटेलच्या गराड्यातील शिवा मेवाड होटेलचा आश्रय घेतला....
चक्क साबुदाणा खिचडी..ताक ..दही...
शिर्डीच्या साईबाबांच्या आशिर्वादाने व भद्रा मारुतीच्या पाठबळाने शिवा मेवाड तेजीत...
होटेलवाला पार शेंडी राखुन असलेला गुजराती हिंदु...शेजारच्या होटेलात खाजांच्या चळती...
दाढीवाले...सुरमावाले मियां टपोरे खाजे तळताहेत...दोघंही सामंजस्याने धंदा करताहेत...
दिवस वार बघुन पदार्थ विकताहेत...
खाजे...खिचडी....खुल्ताबादच्या खलील चौकात खर्या गुण्या गोविंदाने नांदताहेत...
काळाबरोबर बदलत पोटाची खळगी आबाद करणे ह्या पुढे धार्मिक कट्टरता तत्सम आहे हे मात्र खरं !

No comments:
Post a Comment