Tuesday, 14 January 2014

परत !

ती परतली तेच मुळी
परतीचे बीज मनात रुजवून....

आठवणींच्या तळ्यात मळ्यात करत
तीने कसे तरी काही ऋतू कडेला लावले....
आणी एक दिवस पाऊस पंखांमधे घेऊन ती परतलीचं !
...
....
.....
......
.......
तिथे....
खुप शोधल्या तीने परत-परत ओळखीच्या अपार खुणा,
पण मनी काही गवसलं नाही....
एक मन खट्टू झालं तरी दुसर्या मनाने हार मानली नाही.
आपले ओले पंख सांभाळत,
तीने पिंजुन काढला आसमंत सारा !

तीच पाण्याची खळखळ...
तीच नभाची निळाई....
तोच अलगुजी वारा.....
कोणी म्हणता कोणी...ओळख दाखवेना...
काही म्हणता काही...आपलं वाटेना...

सारं कसं जिरून गेलेलं...होतं का नव्हतं असं !

डोळे थकले..
ओठ शुष्क झाले...
हातापायातले त्राण गेले....
हुंदके फुटले......
तरीही......त्या झाडाला ओळख पण पटेना !
..............
शेवटी.....
म्लान होऊन पडलेल्या तीला
त्या झाडाच्या सावलीने मात्र,
जिवलगाच्या आवेगाने कवेत घेतले....परत...परत !

No comments:

Post a Comment