Wednesday, 18 December 2013

अस्मिता !

लाईट जाणं...computer hang होणं...व एकदा अर्धा लिहीलेला blogचुकुन delete होणं...ह्या अश्या सगळ्या अडथळ्यां मधुन लांबलचक blog type करुन मान पाठ एक झालेली....
जरा बाहेर पडले...एक निवृत्त शिक्षक आहेत...antiques collection करतात...त्या काकांकडे गेले...

भरपुर वस्तु...लोटे..अडकीत्ते...थाळ्या..दिवे...डबे..हंड्या...नाणी... मुर्त्या...आणी बरचं काही !
आवडलेल्या २-३ वस्तू घेतल्यावर काकांना म्हटलं " काका मला एक छान ढब्बू नाणं द्या ना ...गळ्यात घालायला...
औरंगाबाद असल्या मुळे साहजिकचं मुघल कालीन..निजाम कालीन वस्तूचं जास्त... आणी शेवटचे राज्यकर्ते म्हणुन इस्लामीक नाणीचं खुप ! शालीवाहन...यादव..शिव कालीन नाणी पण होती...पण पार गुळगुळीत झालेली ! ईस्लामीक नाण्यांवर फक्त काही उर्दू calligraphic अक्षरं असतात त्यामुळे ती जास्त ठसठ्शीत पणे कोरीव वाटतात...आणी मुबलक असल्यामुळे तुलनेनी स्वस्त असतात...त्यामुळे एक ढब्बू होना सारखं पण निजामी नाणं मी उचललं....

" काय कमाल आहे हो तुमची ? आपली नाणी सोडून ते उर्दू काय गळ्यात घालायचं ?" काकांनी अधिकार वाणीने मला फटकारले !
मला खुदकन हसू आले...अगदी खरयं...जात नाही ती जात आणी प्रखर असते ती अस्मिता !
" थांबा तुम्हाला माझ्या कडची हिंदू देव-देवतांची नाणी दाखवतो...काही आहेत"
शिव-पार्वती...राम-सिता..हनुमान...जगन्नाथ...अशी व्यक्ती चित्रणं असलेली नाणी दाखवली.
 जेमतेम १ इंच नाण्यावर कुठली सिता आणी कुठली पार्वती ?
पण त्यांचा आदर करत म्हटलं " काका तुम्ही सांगाल ते नाणं घेईन मी"
तेव्हा काही निवडक कोरीव नाण्यां मधून हिन्दू धर्मातील नरातला नरोत्तम....पुरुषातला पुरुषोत्तम...
अश्या रामाचे नाणे माझ्या गळ्यात त्यांनी बांधले !

No comments:

Post a Comment