डॊ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण आणी नेल्सन मंडेलांच निधन एकाच तारखेला...
दोघांच्याही कार्याच्या व निधनाच्या तारखेच्या साम्याच्या योगायोगाचं विषेशचं वाटलं.
आज कामवाल्या मावशींनी न सांगता सुट्टी घेतली त्यामुळे सगळं time table अंगावर कोसळलेलं...
वैतागुन स्वैपाक घरात भिरभिर...आंबेडकर/मंडेला डोक्यात होतेचं..पण का कुणास ठाऊक दलितांसाठी, दुर्बलांसाठी..सर्वव्यापी माणुसकी साठी आपलं संपुर्ण आय़ुष्य वेचणार्या या दोघांचा राष्ट्रीय/जागतिक विचार करता करता मी माझ्या घराच्या-कुटुंबाच्या परीघात आले.......
अचानक मला माझी आजी( वडिलांची आई ) आठवली...
जवळ पास ८५ वया पेक्षा जास्त जगलेली...मराठवाडा-तेलंगणाच्या बॊर्डर्वरच्या एका सुमार..उजाड खेडेगावात आयुष्याची उमेद घालवलेली...मध्य वयातचं नवरा गेलेला...९ बाळांतपणा नंतर हाती लागलेली २ मुली ३मुलं...घरी गरीबी...रझाकारांचा काळ...( रझाकारांची सामान्यानां त्याकाळी असलेली दहशत आज कळते...वाचना मुळे )
पण ह्या गोदावरीबाईंनी कणखरपणे रझाकारांना तोंड देत हिंमतीने संसार रेटला...काही मुलं शिकली काही नाही..मुलींची लग्न जमेल तशी केली..सर्वात मोठी लग्ना नंतर काही वर्षातचं घरी परतली ती कायमचीचं.
तर माझ्या ह्या आजीचं वपन आजोबांच्या निधना नंतर करण्यात आलं..साधारण १९५१-५२ चा काळ.....
आता ही सर्व माहीती का व कशी जमा केली ते ही सांगते...२-३ वर्षांपुर्वी आपला लाडका क्रिकेटवीर युवराज सिंग जेव्हा कॆंसरवर यशस्वी मात करुन परत मायदेशी परतला तेव्हा त्याचे मिडीयातले glamorous photo,
डोक्यावर केस नसणं हे glorify केलेलं बघुन मला पुर्वीच्या इच्छेने वा अनिच्छेने वपन केलेल्या स्त्रिया व वपन केलेली माझी ही आजी आठवली व खुप अस्वस्थता आली.
मग मी नातेवाईक, संबधीतांना फोन करुन ह्या गोष्टीचा बराच पाठ पुरावा केला.दुर्दैवाने माझे वडिल व त्यांची कोणीही सख्खी भावंड हयात नाहीत..नसता मला स्वतःच्या आईच्या वपनाच्या वेळेची चार भिंती आडची घुसमट ह्या मुलांकडुनच कळली असती. कारण मला ह्या तत्कालीन ब्राह्मणी रिवाजा विषयीचे समाजमन जाणुन घेण्या पेक्षा जवळच्या जिवलगांची मानसिकता जाणुन घेण्याचीचं फार ईच्छा होती...बाबा असतांना हे का सुचलं नाही म्हणुन फार चुट्पुट लागली...थोडीफार माहिती मिळाली पण मनासारखी नाहीच !
शेवटी माझ्या चुलत बहिणीला हाताशी घेऊन नांदेडच्या एका परीचीत वपन झालेल्या आजींना भेटायला गेले...
शंभरी जवळ पोचलेल्या ह्या काशी आजींची स्मरणशक्ती व व्यवधान फारचं शाबुत...
त्यांनी बराच प्रकाश टाकला......
अतिशय सहजतेने धर्माच्या सोवळ्यात करकचुन गुंडाळलेला अन्याय..दुखः...स्विकारलेला त्यांनी !
ह्या आजींनी १९९४ला नांदेडच्या गोवर्धन घाटावर गंगा ( वपन ) केलेली...हट्टानी...मी तर थक्कचं झाले !
आजींच्या ह्या हट्टा पुढे व आईच्या मनाचा आदर करत तीचा हा हट्ट पुरवणार्या सत्तरीच्या आसपासच्या उच्चशिक्षीत मुलां पुढे !
काशीआजी अगदी मनापासुन बोलल्या...गंगा करणे म्हणजे नवरा गेल्या नंतर स्त्रीला सोवळे करणे...
तीचे वपन करणे...डोक्यावरचे केस काढणे...उर्वरीत आयुष्यात फक्त पांढरी कींवा लाल साडीचं नेसणे...चोळी पण न घालणे...सर्व स्त्री सुलभ शृंगार कायमचा त्याजणे...गंगा करणं म्हणजे अर्ध सौभाग्य असं स्त्रीयांच्या मनावर ठसवलं जाई....
घरातील कुलाचार सौभाग्यवती स्त्री अथवा गंगा केलेली स्त्रीच करु शकत असे....
विधवा पण गंगा न केलेली स्त्री सोवळ्यात काही करु शकत नसे त्यामुळे कुलधर्म पालना साठी
घरात अडचण होऊ नये म्हणुन कर्त्या स्त्रीची पती निधना नंतर गंगा करीत असत...
त्याला धार्मिक जोड देत त्यामुळे फारसा विरोध स्त्रीयां कडुन होत नसे.
आणी केलाच कुणी विरोध, आणी नाही केलं वपन तर समाज त्या स्त्रीला वाळीत टाकी...‘केसाळी’ म्हणुन हेटाळणी करत...‘केसाळी’ म्हणजे बाटलेली बाई...कीती ही चिरेबंद चौकट धर्मा़ची !
अजाण विधवा मुलींना तिर्थयात्रेला नेत व येतांना बळजबरीने गंगा करुनचं आणतं.
तरुण मुली मन मारुन रहात...नवरा जाण्याच्या व गंगा करण्याच्या दुहेरी दुखाःचा सामना
या स्त्रीया आयुष्यभर करत.... विधवाबाई म्हणजे मेल्या पेक्षा मेलेली होती.....
गंगा केलेल्या स्त्रीयांचे सोवळे, नियम जबरदस्त व हिणकस असत !
धाबळ नेसुन स्वैपाक करणे...एक वेळ जेवणे...पोहे..मुरमुरे..फक्की..खाणे... कांदा लसुण न खाणे...
(म्हणजेच अपौष्टीक व बिन तेला तुपाचं) प्यायचं पाणी वेगळं ठेवणे...प्रवासात पाणी सुध्दा न पिणे...प्रवासातले कपडे स्वतःचं धुणे...
घरातल्या कुठल्याही दुय्यम कष्टांसाठी ह्यांना गृहीतचं धरलं जायचं !
घरातल्या...गावातल्या कुठल्याही समारंभात...उत्सवात उजळपणे सहभागी न होणे...मंगल कार्यात त्यांचे दर्शन सुध्दा अमंगल मानीत...विषेशतः लहान मुलं त्यांच्या पासून दुर ठेवीत....
कीती असहाय्य, केवीलवाणं करीत या स्त्रीयांना !
आडोश्याला..एकांतात.. जाऊन दर दीड-दोन महिन्यांनी न्हाव्या कडुन डोक्याचे केस काढुन घ्यावे लागत...
ह्या एकांतात न्हावी शारिरीक सलगी, बळजबरी करत...घरातले पुरुषपण शोषण करत...
अश्या अत्याचारातुन गरोदर राहीलेल्या स्त्री-मुलीने विहीर जवळ केली तर घरातले..गावातले पुरुष
बाईने-पोरीने तोंडाला काळे फासले म्हणुन उलट कांगावा करत......
भडभडून आलं...आम्ही तीघीही( ताई,मी आणी माझी मुलगी) गलबललो...भावुक झालो....
आजी मात्र सगळा इतिहास तटस्थपणे उकलत राहील्या......
आम्ही १९७०ला औरंगाबादला आलो...माझी आई पुरोगामी घरातली...शहरी वळण...तेव्हा अधुन मधुन कधी ही माझी गंगा केलेली आजी व कायमची परतलेली आत्या २-३ महिन्यांच्या वास्तव्याला आमच्याकडे यायच्या तेव्हा आम्हा शाळकरी बहिणींना जरा वैतागचं यायचा !
३ खोल्यांच सरकारी घर..त्यात आम्ही ४ भावंड व आई-बाबा असे ६ जण...त्यात आईचा शिवणाचा घरगुती पण जम बसलेला व्यवसाय...मराठवाड्याची राजधानी म्हणुन कामा निमीत्य येणार्यांचा राबता...अश्या ह्या खटल्यात या दोघींच (आजी-आत्या) आगमन झालं की घराची घडी विस्कळीतचं व्हायची...
अनेक वर्षांपासून अंगात मुरलेलं सोवळं-ओवळं...सासुपण...कणखर व्यक्तीमत्वाला वया मुळे चढलेली तेज धार...त्यात आई-आत्याच्या नात्यातला अटी-तटीचा ताण.....
सोमवार..मंगळवार..एकादश्या..प्रदोष...उपास...चातुर्मास...भगर..लाह्या..मुरमुरे..फक्या...पाणी...धाबळ...
अख्खं आस्तित्वचं सोवळ्यात! दिवसभर तुमचं ओवळं...आमचं सोवळं...जुगलबंदीच असायची.....
शिवाशिव करतात म्हणुन आम्हा चौघांवर रागवा रागवी...जाती-पाती मुळे मोलकरणी बिथरायच्या....
तरी आई बरचं करायची...चार दिवस बाजुला पण बसायची...मग काय अख्ख्या घराचीच
कामावरुन कडकड व्हायची !
अगदी कानकोंडं व्हायचं मला त्या शाळकरी वयात ! मी नुकतीच stardust and star and style ह्या सिनेमासिकांनी संस्कारीत होऊ लागलेली त्यामुळे आजीचे वपन करुन विद्रुप केलेलं देखणं रुप...कहरी वागणं व घरातला सोवळ्याचा आगडोंब...इतका complex यायचा मला ह्याचा की एकाही मैत्रीणीला मी ह्या काळात घरी बोलावत नसे......
उलट फारचं वैताग आला तर ब्रेड-केक खाऊन आजीला...तीच्या पाण्याला मुद्दाम हात लावत असू आम्ही !
Block मधले बाकीचेही शेजारी " हं आल्या का आत्या-आजी...आता मजा आहे तुमची " असं म्हणतं व अगदीच आणी-बाणी आली तर मदत पण करत !
ह्या संपुर्ण वास्तव्यात १-२ वेळा मात्र अख्खं घर निशब्द व्हायचं...जेव्हा न्हावी तीच्या साठी घरी यायचा तेव्हा!
साधारण दुपारी नाव्ही यायचा...त्याच्या पुढे आधीच कमरेतुन वाकलेली आजी डोकं पुढे करत अजुनचं झुकायची...news paper वर कर.. कर.. केस पडायचे.....
नेहेमीचं शाळेतुन आल्यावर किलबिलणारं घर चिडीचुप व्हायचं...न्हाव्याला बघताच एक अनाम शांतता घराला व्यापायची ! आम्हा भांवंडांचे चेहेरे कसंनुसे व्हायचे...आजी कडे तर आम्ही बघायचो देखील नाही...
but i still remember that barbers face !
तीच्या उत्तर आयुष्यात मात्र ती बरीच मऊ झाली...दिवसातले ५-६ तास नियमीत शिवण शिवणार्या माझ्या देखण्या व कामसू आई कडे कौतुकानी बघायची...ह्या कामात जमेल ती मदत पण करायची.
नंतर नंतर औरंगाबादच्या वास्तव्यात तरी सोवळं सैलावायची...बरं वाटायचं तीला सगळ्यात मिळून मिसळून राहतांना...पण गावा कडे गेलं की परत येरे माझ्या मागल्या......
मग तिथली भावंडं व आमच्यात ह्या दुजा भावामुळे तेढ यायची...तीलाही ह्या सोवळ्यातला कालबाह्य फोलपणा उमजला होता... पण ही धर्माची निरगाठ इतकी पक्की होती की समंजसपणे ह्या प्रश्नाची उकल करावी असा विचार देखील कुणाला करावासा वाटला नसावा !
माझी आई चाळीशीच्या मध्यावर अपघाताने गेली...त्यानंतर वर्षभराने आजी गेली...आमच्या आयुष्यातील ह्या उलथापालथी मुळे बाकीच्या ह्या गोष्टी कधी इतिहास जमा झाल्या कळलचं नाही......
त्या ह्या अश्या युवराज सिंगच्या dynamic comeback मुळे परत ऊसळुन आल्या...व आंबेडकर/मंडेलांमुळे
कागदावर उमटल्या !
निर्दयी व रग्गेल बंदुकधार्या रझाकारा समोर " मार...मार मला गोळी " असं धाडसाने म्हणणार्या व
हिंमतीने संसार कडेला लावणार्या स्त्रीने वपनाचा हा अमानवीय निर्णय का घेतला ?
व का आय़ुष्यभर कठोरपणे निभावला? कीती मन मारलं असेल तीने स्वतःचं?
आयुष्यातली ४० वर्ष फक्त पांढरं पातळ..चोळी नाही..वपन केलेलं डोकं..बांगडी नाही..कुंकु नाही..काजळ नाही..
चप्पल नाही..जिभेचे चोचले नाही....(शेवेटी शेवटी तीला केक व ब्रेड लोणी साखर आवडायला लागले होते)
आर्थिक स्वातंत्र्य नाही...यात्रा नाही...जत्रा नाही...पुर्णतः परावलंबी आयुष्य.....
गंगा केलेल्या स्त्रीची झेप फक्त मंदिरा पर्यन्तचं !
नाही...नाही....नको..नकोच्या आकंठ काळोखात बुडालेलं अडगळीतलं आयुष्य.....
शरीराची व मनाची ही अशी अग्नी परिक्षा देत राहण्याचे तिने का स्वीकारले ?
कट्टर सोवळं सांभाळत सतत कोपर्यात धाबळीवर उकीडवं बसुन तर ती कायमची वाकलेली झाली.
मला तर माझी आजी तुरु तुरु घरभर फिरते आहे...घरात समरस होते आहे असं दृश्य आठवु म्हटलं तरी आठवत नाही .
घरातल्यांनी तरी जमेल तेव्हा..जमेल तसा विरोध करायला पाहिजे होता !
पण नाही झालं ते कुणा कडुन.
सणवार- कार्या साठी एकत्र येणारी भावंड हे सोवळ्याचं जंजाळ संपवायला...उन्हातल्या आईला सावलीत आणायला का नाही धैर्याने सरसावली ? बाबा असते तर नक्की जाब विचारला असता !
मी सुध्दा कीती ignorant होते तेव्हा.....
अतीव पश्चातापाने तळमळले ... एका अक्षम्य कौटुंबीक..सामुहिक गुन्ह्याच्या टोचणी मुळे विध्द झाले.... पुन्हा पुन्हा डोळे भरुन आले.....
असं वाटलं तडक उठावं आणी कुठून तरी तिला सन्मानानी परत आणावं...
सगळ्यांतर्फे माफी मागत...तीच्या वक्र...काष्ठवत रुक्ष कायेला कवेत घ्यावं...डोक्यावरून हात फिरवावा...
एक क्षणभर का होत नाही तीची ‘माझी माय’ व्हावं.....
पाटावर बसवुन...रांगोळी काढून... साजुक घास भरवावा...
ह्या रसरसलेल्या आयुष्याचं इंद्रधनुष्य तीला दाखवावं...हाती द्यावं...म्हणावं " घे हे सप्तरंग लपेटुन...
चिंब हो त्यांच्या वर्षावात...श्वास भरुन घे हा सुगंध मोगरीचा....
काजळ भरल्या डोळ्यांनी बघ एकदा स्वतःकडे आरश्यात... ओळख स्वतःलाचं पुन्हा एकदा !
आणी उचल ते अन्याया विरुध्द बंड करण्याचे शिव धनुष्य.....
घाबरू नकोस...डगमगू नकोस......मी तुझ्या पाठीशी आहे !

No comments:
Post a Comment