Monday, 16 December 2013

कालगती.....

औरंगाबाद जवळच्या सातार्याच्या परिसरात खंडोबाचं पूरातन मंदिर आहे....
दरवर्षी चंपाषष्ठीला छोटी ग्रामीण जत्रा भरते...१५ दिवसांची....

माझ्या आईची पुण्यतीथी १८ डीसेंबरची...बाबा नेहमीच या तारखेला सैरभैर व्हायचे...
दरवर्षी हा दिवस मी त्यांच्या सहवासात घालवायचे...
८-९ वर्षां पुर्वी असेच त्यांना जरा बदल म्हणुन ह्या जत्रेला घेऊन आले होते...जत्रेची आठवण म्हणुन १-२ पितळी भांडी खरेदी केली होती...

आज मुद्दाम ठरवुन खरेदी साठी म्हणुन खंडोबाला...

जत्रा जवळपास संपुष्टात आलेली...त्यात काल रविवार झालेला...रसरसलेल्या जत्रेचं मैदान उजाड झालेलं...
५-६ हार-नारळ-प्रसाद- फुलांची दुकान चालु...खंडोबाचं दर्शन घेतलं...पिवळाजर्द भंडारा भाळी लावला...
भांडयांची पालं शोधत निघाले...१-२ जणचं होते...त्यांचीही आवरा आवरीचं चालु होती...
स्टिल आणी हिंडालीयमच्या राशीतुन २ पितळी भांडी निवडली...
अतिशय सुबक अशी लहान चरवी आणी एक छोटा गंज...चमचे..ब्रशेश.. ठेवायला कामी येतील !
मोडीतुन छोटा लोटा/तांब्या घेतला...कुणा ‘सुभाष दळवे’चं नाव कोरलेला...
शेजारीचं हाताने नावं कोरणारा होता...म्हट्लं.." खोडा त्यांच नाव आणी घाला माझं नाव..."

कालगती मुळे पुढच्या ३०-४० वर्षात हा असाच खाडाखोडीचा डायलॊग परत एकदा ऐकायचं ह्या तांब्याच्या नशिबी असेल का ? माझ्या नंतर काय ? मी उगाचचं जमवते हे सगळं असं असोशीने....

नकोसे विचार झटकून...घरी येऊन ही भांडी लख्ख धुतली...
झक्क पिवळ्या प्रकाशानी घर उजळवलं...तेव्हांच समाधान पावले !

No comments:

Post a Comment