दिव्य मराठी व व्हायोलिन अकादमी, पुणे तर्फे औरंगाबाद येथे गेल्या ३-४ वर्षांपासून ३ दिवसांचा स्वरझंकार हा संगीत उत्सव साजरा होतो. साधारण नोव्हेंबर अखेरीस...
मी गेली २ वर्ष हया कार्यक्रमाला हजेरी लावत आहे.
प्रथित यश गायक..वादक..दर्दी श्रोते..मोहक टिपूर आकाश..प्रशस्त हिरवळ..सुखद गारवा.....
मैफिली रंगल्या नाही तरचं नवल !
मागच्या वर्षी पं.विश्वमोहन भटांच्या मोहन वीणेच्या झंकारांनी चिंब चिंब केलेलं...माझ्या सह तमाम श्रोतेवृंद पंडितजींवर जाम फिदा...
आणी ह्या वर्षी पं. शिवमणींच्या नादमयी झंझावातावर तर मी अक्षरशः जीव ओवाळून टाकला.....
He is world renowned percussionist and is beyond any word or explanation !
काय केलं नाही त्यांनी ?
पं. शिवमणींच्या जादुई हातांनी वाट्टेल त्या वस्तुतुन नाद प्रसवले...झंकारले...झणत्कारले...किणकिणले...
खुळखुळले...घणघणले...खणखणले...धमधमले...धगधगले...टणत्कारले.....तालवाद्यांच्या सुरेल आरोह-अवरोह-लयींनी थैमान घातलं रंगमंचावर !
साधारण १५ फुटांपर्यंत त्यांच्या आसपास त्यांची २०-३० तरी भारतीय व वेस्टर्न वाद्य होती पण त्याच बरोबर खुळ्खुळे.. थाळ्या..शिंगे...शंख...वाडगे..वाट्या..mineral waterच्या भरलेल्या/रिकाम्या बॆरल्स..फायबरची सुटकेस..इत्यादी अनेक वाद्ये कम surfaces...
विजेच्या चपळाईने आलटून पालटून प्रत्येक वाद्य-वस्तू हुकमी चढ उतारांनी नादमय करणं...
हातांनी, पायांनी, drum sticksनी वाजवून वाद्यांना हवं तसं सुरीलं बोलकं करणं...मधुनचं चेव येउन drum sticksची jugglery करत वाद्य वाजवणं.......
अक्षरशः पाऊण तासाचा एक सुरेल पण खणखणीत गडगडाटचं अनुभवला...सारा आसमंत दुमदुमला !
एक क्षणभर तर मला शिवमणींच्या रुपात रंगमंचावर तांडव नृत्य करत अष्टभुजा शंकरचं अवतरला की काय असे वाटले !
त्यांच्या अचाट शारिरीक चापल्यासमोर व दिसेल त्या वस्तुवर थाप मारुन नादलयीची बरसात करण्याच्या विस्मयकारी निपुणते समोर औरंगाबादकर अवाक झाले.
शिवमणींच्या या अदभुत अविष्कारानी कान आणी नजर तृप्त झाली...मन भरुन आलं....
घरी परतले ती एक अनामीक हुरहुर घेउनचं.
खरं सांगायचं तर असा कुठलाही अंतर्मनाला स्पर्श करणारा अनुभव घेतला ना की तो संपल्यावर ही अशी हुरहुर लागतेचं...आणी आपल्यावर असा दैवी वरदहस्त नसल्याची थोडी रुखरुख सुध्दा !
कधी कधी वाटतं पं.रवी शंकर..बिरजू महाराज..झाकीर हुसेन..अमजद अली खान..शिवकुमार शर्मा...... ही तुमच्या माझ्या सारखी माणसं नसुन भुतलावर अवतरलेले यक्षचं !
Long live Shivamani........God has already blessed you !

As great as shivmani.
ReplyDelete