चार दिवसांवर दिवाळी आलेली त्यामुळे सगळ्यांचीच रोजच्या शिस्तीची शिस्त थोडीफार मोडलेली.
त्याला सकाळी-सकाळी फिरणारे तरी कसे अपवाद असतील ?
नियमीत येणारे अनियमीत झालेले...घड्याळाप्रमाणे चालणारे थोडे रेंगाळत...मित्रांसोबत जरा जास्त गप्पा, हास्य-विनोद....
walk साठी बरेच जण जोडीने ( नवरा-बायको) फिरतात...तर काही स्त्री-पुरूष एक-एकटे तर काही groupsने...
अर्थातच पुरूषांचे groups जास्त व ते सुध्दा वया प्रमाणे झालेले....५०च्या आस-पासचे धंदा-नोकर्यांच्या गप्पा मारत भराभर चालतात तर...६५-७०च्या पुढचे सावकाश चालुन एखाद्या बंद दुकानाच्या पायर्यांवर, चहाच्या टपरी जवळ बसुन गप्पा मारत...निवान्त...येणार्या - जाणार्यांना निरखत... comments करत...
कुटुंब...आरोग्य...राजकारणाच्या चर्चा करत.....बाजुलाच बायका ही छोटे groups करुन कोपरे धरून बसतात, पण त्या आपल्या सैपाक, वयापरत्वे होणार्या दुखण्यांचे घरगुती रामबाण उपाय,साड्या,टेलर अश्या व्यावहारिक परिघातचं असतात.
पण आता दिवाळी इतकी तोंडावर आलेली आहे की बहुतांश फिरणार्या बायका साफसफाई,फराळाची तयारी म्हणुन घरीचं. त्यामुळे आस-पास परिचीत बायका नसल्या मुळे पुरूषांच्या गप्पा जरा जास्तचं मोकळ्या- ढाकळ्या....
गेल्या काही वर्षांपासुन एकत्र बसणार्या नेहमीच्या ६-७ जणांची आज दिवाळीची मैफलचं रंगलेली...शारिरीक वय आणी कौटुंबीक ‘आजोबा’पण विसरून चहाटळपणाला ऊत आलेला.....नेहमी प्रमाणे विनूभाऊ जोरात....
" काहो.. सुधीरराव, आज ती तुमची योगवर्गवाली सिंधीण आली नाही वाटतं... walk ला ? "
" अस्सं का ? ती सिंधीण माझी ? आणी तुमची ती प्रोफेसरीण... गाववाली मैत्रीण...ती तर फार दिवसात नाही भेटली...कॊलेजला अजुन सुट्ट्या लागल्या नाही वाटतं ? ...ह्यॆ...ह्यॆ...तुम्ही बसा रिकामी वाट बघत पायर्यांवर... काय?"
" सुधीरराव .....ह्या नाईकांची बंगाली झुमका ही गायब आहे नवरात्रा पासून....ह्यॆ..ह्यॆ.....ह्यॆ...अनंतरावांना विचारा...त्यांची शेजारीण आहे ती."
बंगाल मधील ३० वर्षांची नोकरी ह्या एकाच qualification वर गावातल्या तमाम ‘भालो’ बंगाल्या’
ह्या टोळीने त्या बिचार्या नाईकांच्या कनवटीला बांधलेल्या........ आता आहे का काही logic ?
पण स्त्रीयांच्या बाबतीत logic वापरेल तो पुरूष कुठला ?
" या..या.. माधवराव...बसा...कशी झाली नागपूर ट्रिप ?"
" छान...अरे हे काय, सगळे निवान्त दिसताय ? फराळाला आहे की काय आज इथे ? "
" तर काय ? फराळ आणी मैत्रीणी ! वाटचं बघतोय आम्ही...यायला लागतील बघा एकएक जणी....
आत्ता येईलचं बघा तुमची ती......."
" माझी ? कोण हो..? "
" अहो ती नाही का...पांढर्या केसांचा Bobcut...गाणी ऐकत जाते ती...ताड...ताड..... "
"हां आलं लक्षात..ती बॆंकवाली..हे काही तरीचं हं तुमचं विनूभाऊ..माझी ..क..का." माधवराव कावरे बावरे.
" कसे हो तुम्ही माधवराव ?...नाही तर हे बघा आपले सुधीरराव...एकदम शार्प आणी स्मार्ट !
‘त’ म्हटलं की ‘तपेलं’... ‘ब’ म्हटलं की ‘बुडालं’...लगेचं त्यांच्या लक्षात आली...
भले वहिनींनी आणायला सांगीतलेली शेपूची भाजी रोज विसरतील व घरी जाऊन शिव्या खातील!" सामुहिक ह्यॆ...ह्ये....ह्यॆ.......
" आणी लक्षात राहीलं तर ठरलेल्याचं भाजीवाली कडे जातील, मग तीच्याकडची भाजी चांगली नसली म्हणून काय झालं ? काय विनूभाऊ..बरोब्बर ना ? द्या टाळी !" इति अनंतराव...परत एकदा हशा !
अनंतरावांना टाळी देत विनुभाऊ..." अरे ओ चायवाले..... छे चाय...बिना शक्कर .....
....ही बघा आली प्रोफेसरीण..... ओ....ऐसा करो शक्कर के साथ ही दे दो सबको चाय....!
* * * ला... डायबेटीस गेलं * * * तं !"
थट्टा मस्करी करत कोंडाळं एकाच्या घरी फराळाला.....अर्थातचं घरी परतायला सर्वांना उशीर.
आता नाईकांच्या घरचा त्याच सकाळचा सीन.......
" अगं तनु...हे अजुन घरी नाही आले...८.२० झाले...जरा बघ बरं फोन करुन...कर्म माझं mobile घरीच विसरले वाटतं....जरा मोहितला ( नातवाला ) पाठव बरं ह्यांना शोधायला...
मारुती मंदिरा कडुन जातात...राम मंदिरा कडून येतात....उठवं बरं त्याला..."
नाईक आजोबांची मागच्या वर्षीच ऎन्जियोप्लास्टी झालेली..हल्ली दम पण लागतोय. आजीची काळजी मुळीच अनाठायी नाही.
" अगं आई...येतील बाबा...तु फारंच कासाविस होतेसं बघ नेहमी...dont worry...येतील ते "
तो पर्यंत आईने पायात चपला सरकवलेल्या.....
" आई....थांब तू... मी पाठवते मोहितला....मोहित अरे..मोहित ...."
आतमधे आई-मुलाची दबक्या आवाजात हमरी-तुमरी...बाहेर आजी कानकोंडी...
डोळे चोळत...तुमचं हे नेहमीचचं असं नजरेनीच सांगणारा एक कटाक्ष आजीकडे टाकत...झोपमोडीचा सगळा राग बाईकवर काढत मोहित जोरात निघतो.
"अरे...राम मंदिराजवळील जाखेटेंकडे पण बघ "
राम मंदिर व्हाया मारुती मंदिर करुन जाखेटेंच्या अपार्टमेंट खाली मोहितचे जोर जोरात पिप...पिप....पि..प....
आता तुम्हीच सांगा, गाडीचा हॊर्न ऐकून बाहेर डोकावायला आजोबा काही तरुणी आहेत का ?
पण common sense वापरेल तो तरुण कुठला ?
तेवढ्यात जाखेटेंच्या गॆलेरीतुन दोन विझलेल्या फुलबाज्या खाली...दोन पोरी हसत खाली बघताहेत....
" ए...दिसत नाही का मी खाली उभा आहे ते ? फटाके काय टाकताय वरून आं ? जा....माझे आजोबा आहेत का बघा घरात "
दहावी पर्यंत मराठीत जेमतेम पास झालेल्या मोहितच्या वाच्यीक मराठीला झोपमोड झाल्यामुळे चांगलीच धार आलेली.
" हो... आजोबांचे मित्र आले आहेत..पण आमाला नाई माहित तुझे आजोबा कोणते ते "
"अगं ए... हातात काठी व मानेला पट्टा असलेले...नाईक आजोबा... सांग त्यांना मोहित खाली उभा आहे म्हणुन "
मोहित ( मनातल्या मनात ) हे आजोबा सुध्दा ना... अख्खा दिवस उताणा असतो पण ह्यांना आपलं सकाळीच कुठे कुठे फिरायचं असतं..ती आज्जी एक उठसुठ डोकं खाते...emotional black mail करते...काळजी म्हणे....
रोजचं कोपर्यापर्यंत जाणार्याची काय काळजी ? ह्या म्हातार्यांचे फंडेच वेगळे असतात...वैताग * * !
एवढयात जाखेटे आजी गॆलेरीतुन " अरे मोहित येना वर...सगळे फराळ करताहेत...मी गरम-गरम चकल्या करते आहे... अरे ये..लाजु नको..आमची चारूता तुझ्याच बरोबर बारावीला आहे की...अगं चारू....."
चकल्या...चारू....चुळ सुध्दा न भरता येण्याच्या स्वतःच्या मुर्खपणा बद्दल मोहित चुकचुकला...! पण मग तमाम वडीलधार्यांना गप्प करणारं ब्रम्हास्त्र मोहितने काढलं..." नको आजी मला टयुशन आहे! आजोबांनाच पाठवा खाली, आजी काळजीत आहे...मी थांबतो खाली ५ मिनीटं "
परत वरुन लवंग्या फुटत खाली.
" ए भवान्यांनो... एकदा सांगीतलेलं कळत नाही का ? दिसत नाही मी खाली ऊभा आहे ते ?
डोळे आहेत का खाचा ? "
मोहितचं मराठी अजुनचं ‘चरचरलं’....तेजाळलं! आणी का नाही तेजाळणार ? २४ तासांची हसत खेळत शाळा म्हणजेचं घर....त्यात पुन्हा आजी-आजोबा, आई-वडिल, अशी चौघांची तालीम आहे त्याला.
काही वेळातचं आजोबा काठी टेकत खाली...हातात आजीसाठीचे चिवडा-लाडूचे पाकिट...
" असे कसे नेहमी mobile विसरता हो तुम्ही ? बसा गाडीवर..."
"तुझ्या गाडीवर ? नको रे बाबा....मी येतो चालत-चालत...तु जा आजीला सांग "
घरी आजी संचीत चेहर्यानी दारातचं....
" सापडले...जाखेटेंकडे फराळ सुरू होता....दिवाळीचा !"
नातवाच्या बोचर्या टोन कडे दुर्लक्ष करत आजीचे मनोमन हुश्श्य !
शाळेची बस चुकु नये म्हणुन सैपाकघरात लगबगीत असलेल्या आईला उद्देशुन मोहित..."सापडले एकदाचे, सकाळी-सकाळी ह्यांचे फराळ चकल्यांचे...आणी आमच्या झोपेचं मात्र कडबोळं...आता मी झोपायला चाललो ... धुणंवाली..कामवाली..मला काही माहित नाही " फटाके फोडत मोहितने बेडरूमचा दरवाजा लावला.
आता ह्याच दिवसाची रात्र, त्याच घरातली .....
आजोबा " तनू...दार लावतो गं... "
" बाबा latch लावा फक्त...मोहित ऊशीरा घरी येणार आहे...तुम्ही झोपा..मी बघते "
मोहित मध्यरात्री घरी...सारं घर चिडीचुप !
आज धनतेरस...मोहित सोडून अख्खं घर सकाळीच उठलेलं.
आजी- आजोबा चिंतीत चेहर्याने डायनिंग टेबलाजवळ..." अगं तनु..मोहित रात्री बारापर्यन्त घरी नव्हता !
दिवसभर भटकायचं आणी रात्री जागुन आभ्यास करायचा...ह्या पोरांच तंत्रच कळत नाही. जरा लक्ष ठेव त्याच्या कडे....पेपरात आपण काय काय वाचतो...ह्या वयात पाय घसरायला वेळ नाही लागत "
नातवाच्या-मुलाच्या भविष्याच्या चिंतेने माय -लेकी दोघीही कानकोंड्या...पेपरातुन डोकं बाहेर काढून जावई..." बाबा..ह्या वयात मुलं अशीच वागतात !
तुमची काळजी मी समजू शकतो...पण आमचं लक्ष आहे...तुम्ही त्याला सारखं टोचू नका..अश्याने मुलं बिथरतात..." सासर्यांजवळ झुकुन दबक्या आवाजात..." अहो मी काय तुम्ही सुध्दा ह्या वयात असेचं वागले असाल .... dont worry...घ्या चहा... आज दिवाळी निमित्य साखरेचा...हं !
Happy Diwali !"
समजूतदार जावयाकडे कौतुकाने बघत...खुदकन हसत..चहाचे घोट घेत...तारुण्यातील आठवणींच्या फेरफटक्याला आजोबा निघाले सुध्दा !

No comments:
Post a Comment