Monday, 11 November 2013

पोकळ......

निमीत्याने वेरुळच्या घृष्णेश्वर मंदीरात....मेन रोड पासुनचं माफक गर्दी सुरु....जास्त करुन साऊथ इंडियन्स....( आंध्र प्रदेश )....शिर्डीच्या साईबाबांची कृपा त्या महादेवावर !
मेन रोड पर्यन्त दुकानं थाटलेली....शंख,वाघनखं,कस्तुर्या,कैक प्रकारचे अनेक मुखी रुद्राक्ष, शिवलिंग,क्रिस्टल्स,यंत्र,सेमी प्रेशियस स्टोन्सच्या माळा,अंगठ्या ईत्यादी....बहुदा परप्रांतीय पारध्यांची दुकानं.....भाषा, रुप वेगळं....एकजात धटिंगण बायका विक्रेत्या....चिवटपणे पाठलाग करणार्या !
मंदिर परिसरात तरतर्हेच्या लाकडी,रंगीत जपमाळा...मोसमी फुलं,बेल,केळफुलं ! अभिषेका साठी म्हणुन पाणीदार दुधाच्या पिशव्या सुध्दा.....

गाडीतुन उतरल्या-उतरल्या २ लहान मुलांनी पेनासाठी २ रु. वही साठी १० रु. द्या असा स्वागत गीता सारखा धोशा लावला...आलटुन-पालटुन हिंदी-मराठीत...थोडं पुढे फुलं-परड्या विकणार्या बायकांनी दोन्ही बाजुनी फुलं-नारळ-प्रसादाचा ५रु.-१०रु.२५रु. असा हल्ला केला. प्रवेशदाराशी  विक्रेत्यांचा चपला-बुट सांभाळणे+फुलं+नारळ+दुध अश्या combinationsच्या घाऊक किमतींचा मारा ....
आत जायचा, बाहेर जायचा मार्ग वेगळा...
आत मध्ये भुलभुलैया सारखी बॆरिकेड्स लावुन दर्शन रांग फिरवलेली...अख्खं मंदिर पहार्यात....
मधे एका जाळीदार शेड मधे काही Senior भटजी/ब्राह्मण पावती पुस्तकं व एक-दोन हवालदार सोबतीला घेउन बसलेले...ब्राह्मणांचे Juniors आसपास फिरत भाविक दानींना हेरताहेत....
नेहमीपेक्षा गर्दी कमी म्हणुन लगेच सभामंडपात....बेल,फुलं,दुध,नारळपाणी,तिर्थपाण्याचा ओलसर वास....
बरेच भटजी पुजा-रुद्र-अभिषेकाची सामग्री घेऊन पथार्या टाकुन बसलेले...नवरा-बायकोच्या जोड्या भटजी सांगतील तसं करताहेत....
झाडुन सगळे भटजी वेरुळवासीचं पण सर्वांचा पेहेराव व ललाटभर चंदन वगैरे एकदम दाक्षिण्यात्य पध्दतीचे ! काळाचा महिमा दुसरं काय ?

नऊवार..गोलसाडी..पंजाबी ड्रेस..घागरे..घुंगट..जिन्स..मिनी स्कर्टस..शॊर्ट्स...
हर कोई एक कतार मे... प्रशाद की टोकरी हाथ मे लेके...एकदम भक्तीभावसे... मंत्रों का उदघोष करते हूये....
मुख्य गाभारा कोंदट..अंधारा..गर्दी...अडचणीच्या पायर्या...वेगवेगळ्या amountचे छोटे-मोठे अभिषेक...
त्यातला गोंधळ...आणी ह्या गोंधळात शिवलिंगाचे दर्शन हुकु नये म्हणुन दुरुनच दर्शन होईल असा गाभार्यात लावलेला तिरपा मोठा आरसा !
चितोडच्या राणीचे खानाला दाखवलेले आरसा रुप व लग्नातील आरश्यातील सुनमुख दर्शन आठवले.

आम्ही सभामंडपातच थांबलो...आमचं मराठी बोलणं ऐकुन no one approached us ! Everybody was running after non marathi tourist.
समोरच्याची भक्ती..ऐपत...व घाई बघुन सटासट १००-५००-१०००रु.च्या चढया हिशेबात पुजेचे व्यवहार होत होते...
गर्दीचा अंदाज घेत चट -चट अभिषेक उरकले जाताहेत....

बाहेर पडतांनाच्या दारा बाहेरचं भजनी मंडळाच्या बायकांसारख्या १०-१५ म्हातार्या पायर्यांवर....  बाहेर पडणार्यांना दानधर्मासाठी उद्य़ुक्त करण्याचा केवीलवाणा मूक प्रयत्न करताहेत...( काहींची नातवंड मांडीवर, काही आसपास खेळताहेत ) परीणाम न झाल्यास राष्ट्रीय-राज्यीय भाषेत विनवण्या चालू आहेत....
खाली उतरलं की instant photo..maps...cds...आरत्यांची पुस्तकं...मकबर्याच्या प्रतिकृती...पर्सेस..बांगड्या...
असा संसारी बाजार भरलेला....लोकल्स आहेत हे कळल्यावर सर्वांनीच आमचा नाद सोडलेला !

निघालो....कुठुन तरी पार्किंगवाला उगवला व १०ची नोट घेउन गेला....
वही-पेन-फुलं-परड्यावाले दुसर्या सावजांमागे....
हुश्श्य.....सुटलो एकदाचे त्या देवदर्शन व धर्माच्या बाजारातुन !

खरंतर या भक्तीच्या व्यवहारात माझ्याच १००-२०० गाववाल्यांच पोट भरतयं...
भाविक पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येताहेत....पैसा हस्ते पर हस्ते फिरतोय...infrastucture सुधारतयं...
तरी पण धार्मिक स्थळांच हे बाजारीकरण व भाविकतेचं भांडवल करणं बघुन मन आणी डोकं सुन्न होतं !
मुर्ती नसलेल्या गाभार्याला प्रदक्षीणा घालण्या सारखं आहे हे ! अगदी पोकळ.....
आत्मीक नाळ तर कुठेही जोडली जात नाही उलट मनस्ताप मात्र होतो !

हा असला अनुभव घेण्यापेक्षा गरजुला सढळ मदत करावी व छान पैकी एखादा डोंगर चढुन यावा !

बाहेर पडेस्तोवर झडझडून पावसाची सर आलेली...कैलास मंदिर नखशिखान्त निथळलेलं....
झाडीतला सुंदर घाट रस्ता....ढगांचा पाठलाग करत हिरण्यला परत !

Who says god is in temples only ?

No comments:

Post a Comment