दुपारचे १२ वाजलेले...मी औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर...पुन्हा एकदा college-mateच्या शोध मोहीमेवेर.
स्टेशनवरची शोधाची पायपीट वाचावी म्हणुन स्टेशनवरचं काम करणार्या ओळखीच्या व्यक्तीला मेनगेट पाशी बोलावले...तो येईपर्यन्त उन फारचं वाटलं म्हणुन सावलीत थांबले...तर तो सावलीतला कोपरा नेमका
शनिमंदीराजवळील निघाला ! इथे नेहेमीचं बरेच भिकारी बसतात. शनिवारी तर ही भली मोठी रांग असते...
प्रवास आणी शनिवारचं साटं-लोटं...त्यामुळे त्यांना बर्यापैकी प्राप्ती होते.
आत्त्ता सुध्दा काहीजणं आहेतचं...पण उशाखाली गाठोडं, वाडगा, हात घेऊन झोपलेले...बहुदा रेल्वेच्या वेळापत्रकातील मध्यंतर असावे. एक बाई पदराने तोंड झाकुन येणार्या-जाणार्यांकडे पाठ करुन झोपलेल्या...
शेजारीचं त्यांची लहान मुलं खेळत होती...कानोसा घेतला तर तिघांच नाटक- नाटक चाललं होतं...
६-७ वर्षांची एक मुलगा-मुलगी जमिनीवर बसुन भिक मागायची acting करत होते... व त्यांच्यातलाचं
एक ४-५ वर्षांचा छोटा मुलगा डोक्यावर cap,हातात काठी, अंगावर मळकट t-shirt व खाली पार नागोळा...
असा त्यांच्या समोरुन येरझारा घालत होता....‘साहेबा’सारखा !
आणी ती बसलेली मुलगी त्याला उद्देशुन " सायेब.....वो सायेब...ह्या लेकराला काई द्यावो " असं शेजारी बसलेल्या मुलाला दाखवुन ‘साहेबा’ला हसत-हसत विनवत होती.
" सायेब..वो सायेब.. द्या ना वो काई...द्येव तुमचं लई कल्यान करील बगा "......
.....लगेच तो capवाला पण नागडा साहेबही हातातली काठी आपटतं थोडा दूर जाई...एक दगड उचलुन आणी
व त्या मुलीला भिक म्हणुन देई......परत येरझारा सुरुचं ‘साहेबा’च्या......
हिचंही खुदु-खुदु हसत "सायेब...वो सायेब..." परत सुरु......
साहेबही परत-परत खड-खड काठी आपटत दुर जाऊन दगड आणुन त्यांना भिक देई.
बसलेला दुसरा मुलगा मात्र दिग्दर्शका सारखा बारकाईने निरीक्षण करून या नाट्यामधे काही बदल सुचवत होता.
३-४वेळा ही नाटकी व दगडी भिक देऊन होई पर्यन्त त्यांच्या लक्षात आले की कोणी तरी त्यांच निरीक्षण करतयं.....‘साहेब’ भलतेच बावरले...काठी टाकून देउन लगेच बहीणीच्या पाठी लपले.....
माझाही परिचीत आला...आम्ही officeकडे निघालो.....
मला या मुलांच्या निरीक्षण शक्तीचे खूपचं कौतुक वाटले....
सृजनशिलतेच्या या कोवळ्या रोपटयाचा वटवृक्ष ही मुलं करू शकतील का ?
तश्या संधी ह्या मुलांना मिळतील का? अनेक प्रश्नांच्या भोवर्यातही ‘साहेब’ आठवून हसु आले....
What a perfect living caricature of `SAHEB' he was portraying ! and that to so innocently !
`साहेबा’चीच इतकी वाट लावली....टक-टक हायहिल्स वाल्या कट-कट ‘madam’चं तर काय करतील ही पोरं ?

No comments:
Post a Comment