पिवळे धम्मक झेंडू व हिरव्यागार आंब्याच्या पानांचे सुवासिक तोरण...झटपट अख्ख्या घराची
आवरा- आवरी...प्रशस्त नाश्ता...शुभेच्छांचे फोन...असा साग्रसंगीत सुरु झालेला
दसर्याच्या सकाळचा ऊत्साह दुपारपर्यंत हमखास सुस्तावला.....
...आणी मग संध्याकाळी घराच्या-स्वतःच्या तयारीची एकचं गडबड झाली.....
घरी भेटायला येणार्यांना गोड खाऊ म्हणुन अंजीर, काजू,बदाम,किसमीस,अक्रोडचे तुकडे
करायला घेतले.....लहाणपणी दर हिवाळ्यात आई-बाबा असे तुकडा ड्राय फ्रुटस २-३ किलो आमच्यासाठी नेहमी आणायचे.( गुलमंडीवरच्या ‘रुपाली’ ड्राय फ्रुट्स मधून).
देवाच्या दुधाच्या वाटीभर हा खाऊ आई आम्हाला रोज द्यायची.....
आईच्या ‘आईपणाच्या’ आठवणींनी मन भरुन आलं व माझा बाऊल कधी भरला कळलंच नाही !
येणार्यांच्या स्वागतासाठी झटपट festival effect म्हणुन २-३ उदबत्या लावल्या.....
very typical of my father.....त्यांच्या आठवणींच्या सुगंधाने घर भरुन गेले !
दारासमोर रांगोळी काढायला बसले.....
आनंदाच्या अनेक दसर्याच्या आठवणींबरोबर एक सुन्न दसरा पण आठवला...
६ वर्षांपुर्वीचा दसरा..... the last festival food we had with my late brother .....
त्याच्या मृत्युच्या गडद छायेनी झाकोळलेला...जडावलेला.....
सर्वांनाच विषण्ण करून गेलेला दसरा...विसरू म्हणता विसरता येत नाही !
त्याच्या आठवांच्या गलबल्याने डोळे भरून आले...रांगोळीचे रंग दिसेनासे झाले.....
एवढयात त्याचीच बायको व मुली भेटायला म्हणून आल्या...
धाकटीला रांगोळीत रंग भरायला सांगीतले...तिनेही आनंदाने जमेल तसे रंग भरले !
चला एक सिमोल्लंघन तर झाले.

No comments:
Post a Comment