भरदुपारी मी औरंगाबादच्या गजबजाटी चौकात...गाडीत...उजव्या हाताला railway station तर डाव्या हाताला
bus stand. कालचं दुपारी प्रचंड पाऊस झालेला...आज चटचट ऊन...potholes...चिखल...अन सिग्नलच्या इथली
जाम गर्दी व गोंगाट...सिग्नलची वाट पहात मी...गाडीच्या काचा बंद...AC चालू...
radio Mircheeवर ‘Bobby` मधलं दिलखुश romantic गाणं...हमतुम...एक कमरेमे बंद हो...और.......
खुदकन हसून मन भुतकाळात गेलं...७०च्या मध्यावरची ( त्याकाळची) little bit bold teenage love story.....
सिनेमा..गाणी...स्टार कास्ट..डायलॊग्जनी तरुणांमधे धुम केलेली...पण ह्याच ‘Bobby’ने आई-वडिलांची
झोप उडवलेली...आपल्या पोरींना ‘ह्या’ सिनेमाला पाठवायचं का नाही, ह्याचा खल आया आपापसात करायच्या...‘हा’ सिनेमा बघून अमक्याची मुलगी, तमक्या बरोबर पळाली अश्या वावडयांनी पालकांच्या
पोटात खड्डे पडायचे...
‘हा’ सिनेमा बघण्या / न बघण्याने घराघरात त्याकाळी शोभेलसे रणकंदन होत असे...वगैरे...वगैरे...
Now when I tell this to my teenage daughter, she just laughs and discards the whole euphoria and
the movie like a chocolate wrapper !
तर ह्या ‘हमतूम’ ने माझ्या भोवती चांगलाच फेर धरलेला...
तितक्यात खिडकीच्या काचेवर टकटक...भारतातल्या तमाम सिग्नलच्या शिरस्त्या प्रमाणे
एक अस्ताव्यस्त बाई/मुलगी एका रोगट मुलाला कडेवर घेऊन माझं लक्ष वेधून घेऊन भिक मागत होती...
मी आपलं artistsच्या धर्माला जागत दोघांच्याही (माय-लेक?) चेहर्यातलं साम्य शोधत निरखुन बघत होते.
बहुदा तिला वाटलं बाई विरघळल्या...मग तर तिने अजुनचं पोराचं पोट..आपलं पोट...
भुक....परमेश्वर.....आशिर्वाद......असं mimes द्वारे मला पुन्हा-पुन्हा सांगायला, दाखवायला सुरवात केली...
जरा जास्तचं भावनावेगाने...ते मुलंही बिचारं कावरं-बावरं झालेलं...
मी देखील ‘हमतुम’ विसरुन गाडीच्या काचेच्या अल्याड-पल्याडच्या ‘हम’ ‘तुम’ ने खंतावले...
अस्ताव्यस्त केस..अस्वच्छ शरीर...नेमकं फाटकं ब्लाऊज...साडी कम जुनेरं...पोरगंही उघडं- नागडं...
सोनेरी केसांच...उन्हानी रापलेलं...कोमेजलेलं...अंगावर माश्या... गलबलून आलं.
आईची नजर मात्र बेडर..भिक देऊ ईच्छीणार्यांना बरोबर जोखणारी..
वेळ प्रसंगी समोरच्याला हुकमी लिनता, तुच्छता दाखवणारी...
खरचं ह्या जगात परिस्थिती सारखा गुरु नाही !
काय असेल ह्या बायका-पोरांच आयुष्य...भविष्य ?
सिग्नलच्या फेर्यात आणी चौका-चौकातून भिरभिरणारं...
हताश परीस्थितीच्या चीरेबंदीमधे ह्यांची कुठल्याही भावनेची कोवळी पालवी कधीच घुसमटून जात असेल.
जेमतेम एकवेळच्या अपुर्या जेवणासाठी सतत असं आपल्या शारीरिक स्त्रीत्वाचं
व मातृत्वाचं भावनिक भांडवल करत भिक मागायची......
सोप्प नाही आहे हे !
खरंतर स्त्रीत्वाचा आदर करणारा जोडीदार व
निखळ मातृत्व, ही कोणत्याही स्त्रीची प्राथमीक व आदिम ईच्छा असते.
पण असंख्य जणींच्या नशिबी त्याचाच आगतिक बाजार मांडायची वेळ येते...
आणी सगळेच जणं नाही परीस्थितीशी दोन हात करून लढू शकत !
जे लढून यशस्वी होतात त्यांची आयुष्य सावलीत सुरक्षीत राहतात...
तर हारलेल्यांची पार बाहेरच्या उन्हानी करपून..करपून जातात !
ती बाई/आई कंटाळून निघून गेली...‘हमतुम’ कधी संपल कळलंही नाही...
सिग्नल मिळाला... मीही निघाले.

No comments:
Post a Comment