गणपति बसल्यापासुन रोज छान पाऊस पडत आहे.
ह्या वर्षी गणपति-गौरीचे आगमन खुपचं लागोपाठ आलेले त्यामुळे घरोघर- बाजारात एकचं धांदल...
आज गौरींचे आगमन त्यामुळे सर्व महिला सुटटीवर !
पावसामुळे मी सुध्दा घरी व निवान्त. झाडून सगळ्या मैत्रीणी व परिचीत सणा-वारांमुळे busy, त्यामुळे कुणाहीकडे सहज म्हणुन जायची सोय नाही.
मुझ जैसे काफ़र के लीये ये २-३ दिन किसके पास भी टैम नही है.....असो.
तर मी आपली शिवणाचे मशिन ठीक कर...भरतकाम कर...jewelry बनव...अशी ठेवणीतली कामं
संपवत आहे. दरम्यान हिनाचे आरीवर्कची साडी तयार असल्याचे २-३ फोन आलेले...म्हटलं आज जाऊनचं येऊ व बाजारातुन रंगीत चीडे(मणी) पण आणू...
औंरंगाबादचा जुना भांडीबाजार,जव्हेरी बाजार,केळी बाजार व सुपारी हनुमान परिसर...
संध्याकाळचं आभाळ पुन्हा भरुन आलेलं त्यामुळे प्रचंड नाही पण भरपूर गर्दी...
फुलं-पानं-फळांच्या दुकान कम पथार्यांनी रस्ता तुडुंब भरलाय...
अख्खा रस्ता झेंडूच्या पिवळ्या फुलांनी धम्मकलाय तर केवड्याच्या सुवासाने घमघमलाय !
जरतारी साडीवाल्या मनाजोगी खरेदी करुन खुश, तर ठसठशीत कुंकूवाल्या विक्रेत्या जास्तीचे चार पैसे
कडसरीला म्हणुन खुश.
हया सुगंधी चौका पुढचा रस्ता भाजीवाल्यांनी काबीज केलेला. प्रत्येकाने १६ भाज्यांच्या पथार्या मांडलेल्या...
ह्या १६ भाज्यांच्या नेमामुळे चुका, करडई, अंबाडी, पडवळ,गिलके,चक्री असल्या कायम वाळीत टाकलेल्या
भाज्यांनाही तेजी आलेली. पावसाच्या धाकामुळे जो तो पटकन व्यवहार संपवायच्या मागे...
पुढे भांडी बाजार...दुकानांच्या ओट्यावर लखलखीत पितळी समया,दिवे,तांब्याची ताम्हणं,ई. हारीने मांडून
ठेवलेले. छोट्या दुकानांसमोर लटकवलेले खोटे पण सोनेरी व मोत्यांचे असंख्य दागीने चमकताहेत...
पुतळा माळ, बोर माळ, लिंबोळी,जोंधळा माळ, चिंच पेटी,ठुशी,वज्रटीक, मंगळसुत्र, नथ,कर्णफुलं,अंगठ्या, कंबरपट्टे,पाटल्या, बांगड्या, तोडे....भारतीय स्त्रीयांच्या स्वतःच्या व गौरी नटवण्याच्या हौसेला तोड नाही !
हा चौकचं सुवर्ण प्रकाशात उजळुन निघाला आहे.
सगळीकडे सुगंधी, रंगीत,चैतन्याची सुरेख सळसळ आहे, पण चौका चौकातील गणपति मंडपांनी मात्र
कहर केला आहे. कर्कश्य आवाज, सिनेगीतांच्या चालीवरच्या आरत्या,ढोल, माईक वरच्या टीपेच्या annoucements हिरीरीने चालू आहेत. भरीस भर बाजुच्या प्रत्येक दुकानात मालकाच्या श्रध्दे प्रमाणे
साई, शंकर,गणपति,जगादंबा अश्या देवतांच्या आरत्या, स्तोत्र, गाणी repeatedly वाजत आहेत...
वाहनांच्या trafficचा तर पार बोर्या वाजलेला...
हे सगळंच जरा जास्तचं सार्वजनिक होतय नाही का?
सुख असो दुःख असो, प्रत्येक वेळेस असे ठणठणपाळी वृत्तीनेच express झाले पाहिजे का?
Meditationचा आपला प्राचीन वारसा आहे.
कुठून कुठे जात आहोत आपण?
Seriously its high time that as a responsible society, we need to introspect and change accordingly !
कुठल्याही रेखीव- कोरीव मुर्तीला जर सतत शेंदूर( लेप) लावला तर कालांतराने ती मुर्ती रेखीव न राहता ओळखु येणार नाही इतकी बदलते. तसचं काहीसं ह्या सण-वारांच झालेलं आहे. सगळ्यांनी मिळून जर हा नकोसा खरवड काढला ना
तर I am sure we will find the real treasure !
काम आटोपून मी निघाले...
पाऊस सुरु...एकच धांदल...
कोपर्यावर एक ९-१० वर्षांची लुकडी-सुकडी मुलगी पावसात भिजत-कुडकुडत केवडा विकते आहे...
Nostalgic सूगंधासाठी म्हणुन एक केवडा घेतला...पैसे देतांना तिचे डोळे पाहिले तर दोन्ही डोळ्यात टिक पडलेली...केवड्याचे ३० रु. व डॊक्टरकडे जाऊन यायचा आग्रही सल्ला देऊन मी परतले.
फुलं-पानं- बाजार-गणपति...घर येईस्तोवर सगळं विसरले...पण ह्या हाडामांसाच्या बाल गौराईच्या डोळ्यांनी
मात्र माझा पिच्छाचं पुरवला ! काही केल्या ती काही मनातुन जाईना.
का मी तीला असा कोरडा सल्ला दिला?
माझ्या भंपकापणापुढे मीच खजील झाले.
Damn it !

No comments:
Post a Comment