Sunday, 4 August 2013

The Sale.....sold-out @ 50% off !

जुलैची अखेर...ह्या वर्षी पाऊस अगदी वेळेवर व शिस्तीत...पाहिजे तेवढा, पाहिजे तितकाचं !
हवामान छान...ढगाळ वातावरण...सगळीकडे हिरवाई...mood is up-beat ! त्यात आज छान उघडीप...

जुलै-ऒगस्ट म्हणजे बाजारपेठेत सेलचा नुसता धुमधडाका...जिथे-तिथे upto, flat 30-40-50% saleच्या पाटया...जाहिराती. कीतीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी कधीतरी मोह होतोच होतो. ( आपण सर्वसामान्य नां)

मी, माझ्या नवर्याने एक शाळा काही ठरावीक कामांसाठी दत्तक घेतली आहे, त्यामुळे मी बरेचदा त्या शाळेच्या (JVM-ज्योती विद्या मंदिर) कार्यक्रमांना जात असते. आज एका शिक्षीकेच्या निरोप समारंभासाठी म्हणुन गेले तर येता-येता रस्त्यावरच आहे म्हणुन व flat 50% off saleचा feel व pull बघावा म्हणुन मी औरंगाबादच्या प्रोझोन मॊल मध्ये डोकावले...( We- ( HIRANYA ) are thinking of giving some discount coupens to
LUCKY buyers ).

वातावरणात ऊत्साह...सळसळती माणसं...मॊलच्या पोर्च मध्ये २-३ कुटुंब काबीला घेउन आलेल्या Duster, Innova, Xylo, Tavera अश्या गाडया एकामागे एक थांबताहेत... आया..मावश्या..बहिणी..मैत्रीणी..मुलं..पुरुष..पटापटा उतरुन आवडीची दुकानं गाठताहेत...गर्दी करताहेत !
पहिलं दुकान म्हणुन Shoppers stopला गेले...ऐस-पैस दोन मजली शोरुम...सगळीकडे western musicचा तोच तो ठेका...स्त्री-पुरुष-मुलांचे कपडे,चपला बुट,खरीखोटीज्वुलरी,कॊस्मेटीक्स,पर्सेस,फर्निशिंग,क्रोकरी,भांडी,
गिफ्ट आयटम्स अश्या अनेक प्रकारच्या एकसे एक सुंदर वस्तुंनी दुकान अगदी खचाखच भरलेलं...
व्यवस्थित सेल %चा टॆग लावलेल्या वस्तु डिसप्लेवर..आपलं बजेट बघायचं नी आवडलेली वस्तु घ्यायची !

Flat 50% off म्हणजे अगदी कुठल्याही वस्तुच्या प्रेमातचं पडायला होतं खरं ! एकत्र आलेले असले तरी प्रत्येकाने वेगवेगळया सेक्शनमध्ये ठाण मांडलेलं...येता-जाता एकमेकांना कन्सल्ट करुन shopping bags भरणं चालू आहे. Very much sure men..impatient kids..dual minded women...जत्रा भारीच रंगली आहे पण खरं राज्य बायकांचच !
सहजपणे ४-४,५-५हजारांच्या चपला, पर्सेस बघता बघता खरेदी करतात या बायका...
आवडलं ना ? टाका घेऊन. ह्या बायकांना इतक्या पर्सेस का लागतात कळत नाही ? दरवेळेस मिरवायच्या त्या वेगवेगळ्या matching and trendy purses...पण एकीच्याही पर्स मधे कधीही पेन किंवा डायरी-कागद सापडेल तर शपथ ! (Actually "रिकामी पर्स" हा माझा ब्लोगचा विषय मी कधीचा निवडुन ठेवला आहे)

चपलांचही तसच...३-४ बुरखे निवान्त बसुन खरेदी करताहेत (अब्बा बाहर बच्चोंको popcorn, ice-creamखिला रहे है) सोनेरी- चंदेरी, flat-hills- stilettos...बुरख्याखाली सगळं सारखं पण आहे ना सेल घ्या ४ जोड! cat walk करके...इनको दिखाके...फिर तय होगा.
हा बघा सगळ्यात मोठ्ठा सेक्शन...अर्थात कपडयांचा !
जिन्स,पॆन्टस,शर्टस,टी-शर्टस,सुटस,ब्लेझर्स.टाईज,टॊपस...फ़ोर्मल-इन्फोर्मल-स्पोर्टी-पार्टी वेअर...बा..बा...बा !
आधी दुनिया इस तरफ़ ही है !
कपडे...कपडे...कपडे......कपडे  तर इतके घ्यायचे की कुणाला वाटेल इतके दिवस हे सर्व लोकं *** -*** (बिनकपडयाचे) होते की काय ? झिरो फिगरवाल्या फिल्म स्टार..मॊडेल्सचे दिलखेचक फ़्लेक्स बघुन या ८०-९०-१०० किलोच्या बायका वाट्टेल त्या फॆशनच्या कपडयांची बेदम खरेदी प्रचंड चिकाटीने करतात व नवर्याच्या तोंडाला फेस आणतात. (कीती जणींना /जणांना करिना, कत्रीना,बिपाशाचं १००-९०-८० सुर्य नमस्कार घालायचं daily routine माहीत असेल?)
अरेच्या...नवर्यांचीही strength बरीच आहे की इथे ! लोकांनाच बरे असे जोडीदार मिळतात बायकोच्या बरोबर आनंदाने हिंडून shopping करणारे ! चपला, पर्स,कपडे...परत-परत चालुन,लटकवुन,गिरकी घेउन दाखवून सोबत आलेल्यांना ह्या बायका - मुलींनी पार भंडावून  टाकलं आहे.
तो पर्यंत खेळण्याच्या भागात मुलांनी प्रचंड उलथा-पालथ केलेली...नक्की ह्यांचे (बेजबाबदार) वडील शिताफीने बाहेर गेले असतील नाहीतर कुठल्या तरी कोपर्यात मोबाईल मधे डोकं घालुन बसले असतील !

किचन section ही ह्या धाडीतून न सुटलेलं...
plastic, glass, ceramic, microwave proof, induction, non stickच्या सुरेख वस्तुंनी शेल्फस तुडुंब भरलेली.
पण बायकांच्या गराडयात दिसेनाशी झालेली. आवडले trendy mugs घेउन टाका...आवडला latest कुकर
घेऊन टाका...आवडला fashionable toaster घ्या...घ्या...आणी घ्याच. ह्या गॄहिणी जुन्या व चांगल्या पण out of fashion च्या खुपसार्या वस्तुंच काय करत असतील बरं ? १५-२० वर्ष संसार होऊनही भांडी-कुंडी जमवायची, नवी घ्यायची - जुनी टाकायची हौस कशी फिटत नाही गंमतच आहे. खरं तर गरजा कमी करत( आपोआप कमी होत) कीती स्थिरता आली पाहिजे एव्हाना . ह्यातल्या बर्याच जणींची हातुन फूटलेल्या भांडयाचे पैसे कामवाली कडुन कापुन घ्यायची तयारी असते हे विषेश !

ही बघा समोरच्या झगझगीत कोपर्यातील दागीन्यांची रेलचेल ...
हिर्यांचे(?) कानातले,अंगठ्या,पेंडन्टस,बांगड्या,bracelets...etc.किंमती ५००००च्या पुढच्याच!
आता येता-जाता करण्याच्या खरेदीच्या वेळी अशी महागडी खरेदी कोणी करेल का?
माझ्या मते औरंगाबादचा तरी एवढा जीव नाही.पण ह्या बायका आपल्या चौकश्या करतात...
"coral और diamondमे pendant है क्या"? "Do you have anything in pearls n diamonds to match my cream coloured लखनवी लेहेंगा "?
हे Matchingच वेड तर इतकं अफाट आणी अन-आकलनीय आहे की बस!
चमच्याला वाटी matchingचं हवी..वाटीला-प्लेट...प्लेटला-ट्रे...ट्रेला-टेबल...टेबलाला-सोफा...सोफ्याला-पडदे...
पडदयाला-कार्पेट...कार्पेटला-चप्पल...चपलेला-नेलपेंट.....हुश्य! नशीब अजुन काळा-सावळा नवरा matching वाटतोय ते.
उत्पादक गरजा निर्माण करतात...प्रलोभनं दाखवतात व आपण त्याला बळी पडतो.गरजेसाठी किंवा उत्तम म्हणुन काही वस्तु खरेदी करणं वेगळं पण खोट्या प्रतीष्ठेसाठी,fashion-trendसाठी सारासार विचार बाजुला ठेऊन खरेदीच्या नावाखाली दुकानातली रास घरात आणणं ह्यात काही तथ्य नाही.
Fashion ही गाजरा सारखी असते(गाढवाच्या गोष्टीतल्या)You are never done with it!

मी एकटी असल्यामुळे शांतपणे निरीक्षकाच्या नजरेने फिरत होते...
sales boys/girls ऊत्साही धावपळ करताहेत... तमाम स्त्रीवर्गावर 50% off saleच गारुड राज्य करतयं.
कंटाळलेल्या पुरुष-मुलांना food-courtने आश्रय दिलेला आहे. कोणाची बाजु घ्यावी या संभ्रमात असतांनाच
एक ओळखीचे डॊक्टर+साहित्यीक+कवी असलेले गृहस्थ भेटले.. न राहवुन मी त्यांना विचारले की ही अशी खरेदी करणं आवडतं का तुम्हाला? " छे..हो...आवडण्या सारखं काय आहे यात? मी आपला बायकोसाठी म्हणुन आलो..यावं लागतं असं अधुन-मधुन !"
ते काहीही असो...flat 50% off sale is pulling the crowd like magnet...buyers and sellers are absolutely happy with this Win-Win situation.


No comments:

Post a Comment