हे भरतकामाचे वेड मला कुठे कुठे पोहोंचवेल सांगता येत नाही.
आज भर दुपारी मी बुढी लेन ( औरंगाबादचा जुना व मुस्लीम भाग) मधे पोचले.
एक मुस्लीम कुटुंब (वडील-आई व ५ मुली) आरी वर्कचे भरतकाम करण्यात expert !
कारागिरीची व्यवस्थित मजुरी (?) मिळत नसल्यामुळे वडील हातगाडीवर चाळण्या,गाळण्या,घासण्या,पोळपाट-लाटणी ई. वस्तु दारोदार फिरुन विकण्याच्या धंद्याकडे वळलेले.
पण पाचही मुलींना आरीवर्कमध्ये तरबेज करण्याचे सत्कर्म त्यांनी केलेले.
मोठया गल्लीतल्या शेवटा कडील एका उताराच्या चिंचोळया गल्लीतील १२*१२ची पत्र्याची खोली,बाजुला मी न पाहीलेलं छोटं स्वैपाकघर... दरवाजे,खिडक्या व कोनाडयांना जुन्या साडया,ओढण्यांचे झालरवाले जीर्ण पडदे... कबाडखान्यातुन उचललेला लोखंडी सोफा,खड्खड कुलर,पॊलीथीन बॆगमधे स्टेपल केलेले उर्दू वचनांचे पुठ्ठे हिरव्या भिंतीवर लटकवलेले...छताला टांगुन ठेवलेला लोखंडी पाळणा...त्या खाली आरी वर्कचा ५०-६० वर्षांपुर्वीचा ३*६ फुटांचा लाकडी स्टॆन्ड...त्यावर एक मोतीकामाची साडी लावलेली...शेजारच्या कोनाडयात
गंजलेली,झाकण तुटकी ट्रंक...त्यात सुया, मोती,कुंदन,रेशिम,जरीच्या रिळांच रंगीत भांडार...
आई-वडील,२ अविवाहित मुली व २ नातवंडांनी घर भरलेलं.
कारिगीरीसे बेकदर जमाना...महंगाई...लडकियोंके रिश्ते...जिव्हाळ्याच्या गप्पा...चहा...
थोडीफार घासाघीस करुन फायद्याचं माप त्यांच्याच पदरात टाकून एक साडी आरीवर्क साठी दिली.
होता होईल तेवढे customer मिळवून दयायचे आश्वासन व माझ्या घरी यायचे आमंत्रण देउन मी निघाले...
नुकतीच ईद झालेली त्यामुळे चिंचोळया गल्ल्यांमधील घरांना white-wash दिलेला...अरुंद बोळकांडी घरं...
दारं जराशी किल-किली...रांजण,कपडे धुवायचे दगड,मोर्या,बारकी पोरं ओझरती दिसताहेत...
खिडक्यातुन फळकुटं बाहेर काढुन अंडी,टोस्ट,खारी,नरडे, चॊकलेट्स,चिप्सची दुकानं थाटलेली...
दारासमोर हातगाडया, सायकली...आसपासच्या घाणीत कुर्रेबाज कोंबडे फिरताहेत.
पुढे जराशी मोठी गल्ली...दार-खिडक्या हिरव्या oil paint नी नव्हाळलेली...नविन झुळझुळीत पडदे...
दारासमोर एखाद दुसरी बाईक, माना खाली घालुन मुकाट चरणार्या बकर्या... झगझगीत बुरखेवाले पाहुणे रिक्षातुन उतरताहेत...
आता मेन रोडला टच करणारी मोठी गल्ली...२-३ मजली घरं...x y z मंझील, महलच्या पाट्या...अंगणात cars,
बहरलेल्या जाईचा मांडव...भक्कम दारं,खिडक्या, लोखंडी गेट... कडेकोट बंद...पांढरे शुभ्र कपडे- दाढी,
सोनेरी चष्मा असलेली एक बुजुर्ग करडी नज़र मला निरखते आहे...नक्कीच ही घरं आतुन मखमली असणारं !
मेन रोड.....
मशीद...पिठाची गिरणी...गॆरेज...शाळा...रिक्षा स्डॆन्ड...दुकानं...दवाखाना...सगळ्याचीच सरमिसळ !

No comments:
Post a Comment