Tuesday, 27 August 2013

.......... ?

एखादी सकाळ हातुन का निसटते कळत नाही ?

अचानक एखादा फ्युज उडतो...खटक्यांच्या फुलबाज्या तडतडतात...
सगळी कडुन अंधारुन येते...ओठांची महिरप आकसुन जाते...
आठया जास्तचं कोरीव होतात....
उद्वीग्नतेच्या भरात गाडी सणसणुन हाणली जाते...
उन-पाउस,ढग-वारा,डोंगर-झाडं असुन नसल्या सारखी होतात...
सैर-भैर विचारांच्या गाठी-गाठींचीही एक अंतहीन साखळी बनते...

"जसा उगवेल तसाचं मावळेल तर तो दिवस कसला?" ही एकच आशा
शुन्यात हरवलेल्या जीवाला दिलासा देते. 

No comments:

Post a Comment