At Goa with Martins family ( French RYE student who is staying with us since last 10 months)
enjoyed the little crowded continental dinner at sea beach.....
मुलं मस्ती करताहेत...बाकी मंडळी तु- मी करत बिल सेटल करताहेत...आल्यापासुन समुद्र दुरुनचं
बघीतल्यामुळे मी मात्र समुद्राकडे निघाले...अंधारामुळे जरा जपुनचं... !
पाठीमागच्या अनेक restaurantsच्या खुपणार्या झगझगाटात अख्या आसमंताला कवेत घेणारं चांदणं
पार निष्प्रभ...ठेकेदार म्युझिकमुळे समुद्राची धडकी भरवणारी गाज कुठल्या कुठे हरवलेली...
ओली वाळु चाचपडत मी अजुन पुढे...जशी जशी समुद्राच्या जवळ जात आहे तशी तशी
उसळणार्या लाटांची गाज व शुभ्रपण जाणवत आहे...
दबकत सावकाश पुढे आहे की नाही अश्या वाळु आणी पाण्याच्या सीमेवर मी उभी...
भरती का ओहोटी ?....बघु.....
एखादी लाट उसळुन येते..पावलं भिजवेल असं वाटतयं...पण नाही ! न भिजवताचं माघारी.....
ही तिरपी लाट तरी आता नक्की भिजवणार...but no...मला शिवे-शिवे पर्यंतच ती विरुन गेली...
एक गमतीचा खेळंच मी मनात मांडला...भिजवणार का नाही ?
भरती आहे...त्यामुळे लाटा आता धाडसाने झेपावत आहेत...छोटया- मोठया लाटा संगनमताने मला
माझा अंदाज चुकवत स्पर्श करताहेत...चुबकुन जाताहेत...पायाखालची वाळु निर्दयतेने खेचताहेत.....
मी घट्ट उभी...आता बघुचं या... करा काय करायचं ते !
लाटा माझी जिद्द समजल्या सारख्या जोमाने थडकताहेत...मला अस्थिर करताहेत...
एक लाट झेपावत...फेसाळत...ताकदीने येते...मी भेलकांडते...अरेव्वा.... हि तर दादागिरीच झाली !
मागुन आवाज...
आमचा लुटु-पुटुचा खेळ संपवून मी परतते.....
माझ्या असण्या-नसण्याची दखलही न घेता शुभ्र.. रोरांवणार्या लाटा किनारा काबीज करताहेत...
किनार्याची so called सीमारेषा नामषेश करण्यासाठी पुन्हा-पुन्हा ऊसळुन एकजुटीने धडकताहेत.......
सीमाबध्द आयुष्य जगणार्या मला अंतर्मुख करताहेत !

No comments:
Post a Comment