अधुन मधुन आई आठवत राहते..... !
देखण्या तिचं विशीच्या आतलं लग्न...
चार मुलांच आईपण...
तरी पण टापटीप.. रेखीव.. सुखी घरटं...
तिच्या चाळीशीच्या मध्यावर जाण्यानं पार विस्कटलेलं...
अपघाती निधनाच्या बातम्या वाचल्या की...
अधुन मधुन आई आठवत राहते..... !
मी माझ्या संसारात तुडुंब...
नवरा.. मुलं..शाळा..खेळ..वाढदिवस..ऊत्सव..
आला-गेला..आजारपणं..व्यवसाय..चढ-उतार...
कधी कधी ही भंबेरी उडते...
चार मुलांच करुन..मराठवाडी संसार सांभाळतांना..
अडचणींनी कावलेली ही कधीच कशी आपल्याला दिसली नाही ?
पदोपदी आश्चर्य वाटत राहते...
अधुन मधुन आई आठवत ... ..... !
तिच्या रंगाची सर मला नाही...
हसतमुखाने आल्या गेल्यांच करण्याची तर मुळीच नाही !
तरी पण माझी कलासक्त नजर...सफाईदार भरतकाम...
सदैव कार्यमग्न राहण्याची असोशी...नेमकी लकब...
अचानक एखादी तिची मैत्रीण भेटते...
पाठीवर थाप देउन म्हणते...तु तर तिच्याही पुढे गेलीस मुली...
अधुन मधुन आई .... ... ..... !
पन्नाशीतली मी...
मागे वळुन पहायलाही सवड नसावी
इतकं रसरसून जगतेयं मी...
कुटुंब..व्यवसाय.. फुललेला समाधानाने बघतेय...
अनेक स्वप्नांचे मनसुबे रचतेय मी...
रंगलेला डाव अर्धवट सोडुन जाणारी ती...
विस्कटलेली घडी बसवतांना दमलेले एकाकी बाबा...
वाटतं...कसली स्वप्न अन कसलं काय...
अधुन मधुन .. .... ... ..... !
माझा मुलगा-मुलगी.. माझे आनंदाचे ठेवे...
जुन्या फोटोंवर बोट ठेवत विचारतात...
" आई.. ही तुझी आई का ? "
हा अनोळखीपणा डाचून जातो...
" आज्जी कीत्ती तुझ्या सारखी दिसायची आई "
निखळलेला दुवा अंतर कापुन पुन्हा आम्हाला जोडुन जातो...
अधुन ... .. .... ... ..... !
मरणाचेही वरदान वाटावे असा विकल होऊन तरुण भाऊ गेला...
जबाबदार्या पार पाडुन, कृतकृत्य होऊन बाबा गेले...
परंतु...
पुढचे सगळे मृत्यु सह्य वाटावेत असं तीचं जाणं होतं...
जणु काही आईपणाच्या कर्तव्याला तीचं जागणंच होतं !
... ... .. .... ... ..... !

No comments:
Post a Comment