Monday, 31 December 2012

ताप.... उपासाच्या तपासाचा !

December च्या मध्यापासूनच जो-तो नविन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागतो...नातेवाईक व मित्रांच्या सोबतीने हॊटॆल, घर, गच्ची, फार्म हाउस..इत्यादी ठिकाणी celebrationचे निरनिराळे बेत ठरु लागतात.

पण ह्याच वळेला आमचा हुरडा फेस्टिव्हल full swingमधे सुरु असतो, त्यामुळे 31st dec & 1st jan ला हिरण्यला
भरपुर काम करणे व जमेल तेवढी झोप घेणे एवढेचं मी करू शकते. ( तसाही खाउन-पिउन,नाचुन काही celebrate करण्याचा माझा पिंड नाही) . मला आपलं डोंगरावर जा...सुर्योदय बघ...टेकडीवर जा चांदण्या बघ...भक्तीभावे कैलासाला जा... सकाळी-सकाळी bird watching ला जा...असं काहीतरी मनापासून करावसं वाटतं, पण गेल्या ९-१० वर्षांपासुन हिरण्यमुळे असले उद्योग करणं अशक्य होतं मग मी नवीन वर्षाच्या resolutionsच्या पर्यायांच्या मागे लागते.

जसा जसा १ जानेवारी जवळ येऊ लागतो तसे तसे माझ्या मनातले कैक resolutions मी पत्ते पिसावे तसे पिसु
लागते...हाती आलेल्या हुकमाच्या पानांसारखे ४-५ पक्के होतात. ( त्यांच पुढे काय होतं ते मलाच माहित ! )
पण दरवर्षीचा हुकमाचा ईसपिक एक्का म्हणजे आठवडी उपासाचा !
गेल्या अनेक वर्षांपासुन उपासाच्या अनेक versions मी try केलेल्या आहेत पण थंडी संपली की झालं गेलं गंगेला मिळालं असं होतं...

उपास म्हणजे काय तर कधी बिन मीठाचे, कधी बिन साखरेचे तर कधी बिन तेला-तुपाचे अल्पोपहार...
तेवढाच शरिराला आराम व मनोनिग्रहाची नियमीत परीक्षाच ! आणि आतातर वाढते वय आणि वजन यामुळे
हे उपास अत्यंत गरजेचे झालेले.

सगळयात पहिला प्रयोग ज्या वारी माझा जन्म झाला तो वार उपासाचा म्हणुन झाला ( हो उगाचचं एका देवाचा वार धरायचा व दुसर्याला नाराज करायचं ...मला नाही पटत ) दिवसभराच्या उपासाचा ताण...मुलं लहान...चिडचिड...आणि रात्रीचं जेवण एकादशी दुप्पट खाशी सारखं दुप्पट..पुन्हा दर आठवडयाला हाच वैताग....काही अर्थ नव्हता...दिला सोडून !

मग भेटले एक गुरु...त्यांच निर्मळ मन व त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केलेली असणं हे आमच्या स्नेहाचं खरं कारण...त्यांना म्हटलं देव-बिव सोडुन द्या cosmic significance असलेला व मला पटणारा सोईचा दिवस सांगा...
ते म्हणाले ताई... पौर्णिमा करा...बुध्दी तेज होते ! पण बरेचसे हिंदु सण पौर्णिमेचेच...
भर सणावारी कोण उपाशी राहाणार ? तेही घरात चारीठाव स्वैपाक करुन...परत महिन्यातुन एकदाच...म्हणजे सांगायला उपास पण result शुन्य! नको बुवा आपल्याला नाही जमणार. म्हटलं अमावस्या करते...ते म्हणाले करा...पण english calenderच्या व्यवहारात अमावस्या आली कधी गेली कधी कळायचंच नाही...
कालांतराने तेही बारगळलं.

मग विचार केला माझी आई ज्या वारी गेली तो वार करावा, तो नेमका रविवार...म्हणजे जो-तो विचारणार अग तु रविवारी कसा उपास करतेस? दिवंगत झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला स्वतःच्या व्यावहारीक जगात असं सतत आठवत राहणं मला रुचेना...तेही माझ्या आईची आठवण जागृत ठेवण्यासाठीचे अनेक सृजनशील पर्याय माझ्यासमोर असतांना !

मग आता काय?
मध्यंतरी एक ओळखीचे काका( पेटीवाले देशपांडे) त्यांच्याकडे मी गेले होते तर त्यांना पत्रीका बनवायचा व पाहुन भविष्य (?) सांगायचा जुना छंद...१९५० पासुनच्या पंचांगाच्या थप्प्या घरात...मी लगेच माझी व मुलांच्या जन्म तारखा व बाकी तपशील दिले...१५ दिवसांनी परत गेले तर दोन्ही मुलांच्या पत्रीका तयार...माझी नाही...."अहो madam पंचांगातील नेमकं जानेवारी १९६३ चंच पान फाटलेलं आहे बघा त्यामुळे तुमची पत्रीका राहिली..."
अरे... देवा... माझ्या डोक्यावर मागे ६६६ तर लिहीलेलं नाही ना?
( माझ्याच बाबतीत नेहमी असं कसं होतं? )
नवर्याला बघायला सांगावे का ? नको...तो न पहाताचं म्हणेल "अग मेधा खरचं तुझ्या डोक्यावर ६६६ लिहीलेलं आहे " ...you just cant rely on certain species in specific roles !
असो ! थोडक्यात काय तर कुंडली- ग्रह बघुन ठरावीक वारी उपास धरायची शक्यता मावळली.
काय ताप आहे... चांगल्या कामाला कीती ती विघ्न !

प्रश्न कायम...
मध्यंतरी PETसाठी कलेचा अभ्यास करतांना सिंधु संस्कृती परत वाचली...तिथे सापडलेल्या मोहरांमधे एक मोहर सध्याच्या पशुपतीनाथा सदृश्य आहे...बैठकीवर बसलेला मनुष्य...त्याच्या आस-पास काही शिकार योग्यतेचे प्राणी...पशुपतीनाथाचं...शंकराच्या देव ह्या कल्पनेचं हे पहिलं व प्राथमिक रुप मानलं जातं...
माझ्या वडिलांच मुळ गाव परमेश्वराच्या( शंकर) मंदिरासाठी प्रसिध्द आहे...माझा जन्म १.१ असा आहे...
म्हटलं चला.... एकदाचं उत्तर मिळालं !

तार्किकतेची व अतार्किकतेची मोळी बांधुन येत्या वर्षापासुन दर महीन्याच्या २ एकादश्या करायचा निर्णय पक्का करुन एकदाची मी शंकराला पावले !
 So wish me best :)

P.S. एकादशीची आठवण द्यायची जबाबदारी कामवाल्यांवर..." विसराल तर पगार कापीन "!

No comments:

Post a Comment